मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Sridevi Death Anniversary : मनोरंजन विश्वाची पहिली ‘लेडी सुपरस्टार’; श्रीदेवीबद्दल ‘या’ गोष्टी माहितीयेत का?

Sridevi Death Anniversary : मनोरंजन विश्वाची पहिली ‘लेडी सुपरस्टार’; श्रीदेवीबद्दल ‘या’ गोष्टी माहितीयेत का?

Feb 24, 2023, 08:23 AM IST

  • Sridevi Death Anniversary: श्रीदेवीला बॉलिवूडची पहिली ‘लेडी सुपरस्टार’ म्हटलं जातं. २४ फेब्रुवारी २०१८ या दिवशी श्रीदेवीच्या आकस्मिक निधनाने अवघ्या मनोरंजन विश्वालाच मोठा धक्का बसला होता.

Sridevi

Sridevi Death Anniversary: श्रीदेवीला बॉलिवूडची पहिली ‘लेडी सुपरस्टार’ म्हटलं जातं. २४ फेब्रुवारी २०१८ या दिवशी श्रीदेवीच्या आकस्मिक निधनाने अवघ्या मनोरंजन विश्वालाच मोठा धक्का बसला होता.

  • Sridevi Death Anniversary: श्रीदेवीला बॉलिवूडची पहिली ‘लेडी सुपरस्टार’ म्हटलं जातं. २४ फेब्रुवारी २०१८ या दिवशी श्रीदेवीच्या आकस्मिक निधनाने अवघ्या मनोरंजन विश्वालाच मोठा धक्का बसला होता.

Sridevi Death Anniversary: बॉलिवूडची ‘हवाहवाई’ अर्थात अभिनेत्री श्रीदेवी हिचा आज (२४ फेब्रुवारी) स्मृतिदिन आहे. आज भलेही श्रीदेवी आपल्यात नसेल, पण चाहत्यांच्या हृदयात ती आजही जिवंत आहेत. श्रीदेवीने केवळ आपल्या अभिनयानेच नव्हे, तर सौंदर्यानेही लोकांना घायाळ केले होते. आजही तिचे चित्रपट प्रेक्षक आवडीने आवर्जून बघतात. श्रीदेवीला बॉलिवूडची पहिली ‘लेडी सुपरस्टार’ म्हटलं जातं. २४ फेब्रुवारी २०१८ या दिवशी श्रीदेवीच्या आकस्मिक निधनाने अवघ्या मनोरंजन विश्वालाच मोठा धक्का बसला होता.

ट्रेंडिंग न्यूज

दिवाळीच्या मुहूर्तावर होणार पैशांची बरसात! ‘ये रे ये रे पैसा ३’ पुन्हा बॉक्स ऑफिसवर धमाल उडवणार

विनोदाची पातळी इतकी खाली गेलीये? कुशल बद्रिके आणि हेमांगी कवीच्या ‘मॅडनेस मचायेंगे’वर संतापले प्रेक्षक

तेजश्री प्रधानच्या मालिकेने पुन्हा मारली बाजी! जुई गडकरी ठरली नंबर वन! पाहा मराठी मालिकांचा टीआरपी रिपोर्ट

एक-दोन नव्हे, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चा ‘सोढी’ वापरत होता १० बँक अकाऊंट! पोलिसांनी केला नवा खुलासा

हिंदी चित्रपटसृष्टीत तसे नेहमीच पुरुषांचे वर्चस्व राहिले आहे. बहुतेक चित्रपट हे पुरुष कलाकारांना केंद्रस्थानी ठेवून बनवले जातात. ८०च्या दशकांतही केवळ अभिनेत्याच्या जोरावर चित्रपट चालत असत. पण, त्यावेळी श्रीदेवीने आपल्या अभिनयाने सगळ्यांनाच थक्क केले. श्रीदेवी अशी अभिनेत्री होती, जिला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक थिएटरमध्ये गर्दी करायचे. या अभिनेत्रीने आपल्या अभिनयाच्या जोरावर पहिली महिला सुपरस्टार होण्याचा किताबही पटकावला होता. इतकंच नाही तर. त्या काळात श्रीदेवी अभिनेत्यापेक्षा जास्त मानधन घेत असत.

बॉलिवूडच नव्हे तर, श्रीदेवीने साऊथ चित्रपटांमध्ये काम करून खूप प्रसिद्धी मिळवली. साऊथ सिनेसृष्टीतील एक दिग्गज अभिनेत्री अशी श्रीदेवीची ओळख होती. ‘मंद्रू मुदिचू’, ‘सिगप्पू रोजकल’, ‘कल्याणरामन’, ‘जोनी’, ‘मीन्दुम कोकिला’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार अभिनया करत श्रीदेवीने दक्षिणात्य मनोरंजन विश्वात वेगळे स्थान मिळवले होते.

हिंदी चित्रपटसृष्टीत श्रीदेवी एक व्यावसायिक नायिका म्हणून प्रसिद्ध होती. श्रीदेवीने ‘चालबाज’, ‘चांदनी’, ‘सीता-गीता’, ‘जुदाई’, ‘खुदा गवाह’, ‘नगीना’, ‘मिस्टर इंडिया’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार अभिनय केला. मात्र, यानंतर काहीकाळ अभिनेत्री चित्रपटसृष्टीपासून दूर झाली होती. जवळपास १५ वर्षांच्या मोठ्या ब्रेकनंतर तिने २०१३मध्ये 'इंग्लिश विंग्लिश' या चित्रपटाद्वारे दमदार पुनरागमन केले. यानंतर २०१८मध्ये 'मॉम' या चित्रपटात श्रीदेवीने सावत्र आईची सकारात्मक भूमिका साकारली होती.

विभाग

पुढील बातम्या