मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Viral Video: ‘बेशरम रंग’ची क्रेझ... भर रस्त्यातच तरुणीने धरला ताल! इंटरनेटवर व्हिडीओचा धुमाकूळ

Viral Video: ‘बेशरम रंग’ची क्रेझ... भर रस्त्यातच तरुणीने धरला ताल! इंटरनेटवर व्हिडीओचा धुमाकूळ

Dec 30, 2022, 11:46 AM IST

    • Viral Video: बॉलिवूड कलाकारांनंतर आता सोशल मीडिया स्टार्सदेखील ‘पठाण’ चित्रपटातील बेशरम रंग’ या गाण्यावर व्हिडीओ बनवत आहेत.
Besharam rang Viral Video

Viral Video: बॉलिवूड कलाकारांनंतर आता सोशल मीडिया स्टार्सदेखील ‘पठाण’ चित्रपटातील बेशरम रंग’ या गाण्यावर व्हिडीओ बनवत आहेत.

    • Viral Video: बॉलिवूड कलाकारांनंतर आता सोशल मीडिया स्टार्सदेखील ‘पठाण’ चित्रपटातील बेशरम रंग’ या गाण्यावर व्हिडीओ बनवत आहेत.

Viral Video: बॉलिवूड किंग अर्थात अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांचा पठाण’ हा चित्रपट नव्या वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील ‘बेशरम रंग’ आणि ‘झुमे जो पठाण’ ही दोन गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. मात्र, यातील ‘बेशरम रंग’ या गाण्याने बराच गदारोळ माजवला आहे. दीपिकाने परिधान केलेल्या भगव्या बिकिनीमुळे वाद सुरू असतानाच, दुसरीकडे हे गाणे सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. अनेक लोक ‘बेशरम रंग’ या गाण्यावर रील्स आणि व्हिडीओ बनवत आहेत. आता एका तरुणीने तर भर रस्त्यातच या गाण्यावर ठेका धरला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

‘बस करा आता... बंद करा मालिका’; अप्पी आणि अर्जुनवर का वैतागले प्रेक्षक? थेट मालिकाच संपवायला म्हणतायत...

काय होतास तू... काय झालास तू.... ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम गुरुचरण सिंहची अवस्था बघून चाहते हळहळले!

मानधन मिळालं नाही म्हणून प्रॉडक्शन हाऊसमध्ये रोज जेवून पैसे वसूल केले! नवाजुद्दीन सिद्दीकीचा किस्सा ऐकलात?

२५ दिवसांनंतर ‘सोढी’ घरी परतला! नक्की कुठे गेला होता अभिनेता गुरुचरण सिंह?

बॉलिवूड कलाकारांनंतर आता सोशल मीडिया स्टार्सदेखील ‘पठाण’ चित्रपटातील बेशरम रंग’ या गाण्यावर व्हिडीओ बनवत आहेत. सोशल मीडिया इन्फ्लुएंसर सहेली रुद्र हिने भर रस्त्यात ‘बेशरम रंग’ या गाण्यावर डान्स केला आहे. सहेलीचा हा धमाल डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तर, चाहते देखील तिच्या या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. सहेलीने सार्वजनिक ठिकाणी डान्स करताना लोकांची प्रतिक्रिया कशी असेल, हे जाणून घेण्यासाठी भर रस्त्यातच ठेका धरला आहे.

सहेली रुद्रचा हा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये काळ्या रंगाचा जॅकेट परिधान करून सहेली भर बाजारात लोकांच्या गर्दीत ‘बेशरम रंग’वर डान्स करताना दिसत आहे. शाहरुख खानच्या आगामी 'पठाण' चित्रपटातील ‘बेशरम रंग’ या गाण्यावर तिने लिप-सिंक करत डान्स केला आहे. सहेली डान्स करत असताना आजुबाजूला उभे राहून लोक तिच्या नृत्यावर प्रतिक्रिया देत आहेत.

शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांचा ‘पठाण’ हा चित्रपट २५ जानेवारी २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात जॉन इब्राहिम देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या अॅक्शन थ्रीलर चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केले आहे.

पुढील बातम्या