मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Shivrayancha Chhava Collection: ‘शिवरायांचा छावा’ने बॉक्स ऑफिस गाजवलं! चार दिवसांत बक्कळ कमाई

Shivrayancha Chhava Collection: ‘शिवरायांचा छावा’ने बॉक्स ऑफिस गाजवलं! चार दिवसांत बक्कळ कमाई

Feb 20, 2024, 02:36 PM IST

  • Shivrayancha Chhava Box Office Collection: ‘शिवरायांचा छावा’ या चित्रपटाला प्रदर्शित होऊन आता चार दिवस उलटले आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

Shivrayancha Chhava Box Office Collection

Shivrayancha Chhava Box Office Collection: ‘शिवरायांचा छावा’ या चित्रपटाला प्रदर्शित होऊन आता चार दिवस उलटले आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

  • Shivrayancha Chhava Box Office Collection: ‘शिवरायांचा छावा’ या चित्रपटाला प्रदर्शित होऊन आता चार दिवस उलटले आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

Shivrayancha Chhava Box Office Collection: महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांचा दैदीप्यमान इतिहास आपण शाळेपासूनच वाचत आलो आहोत. पुढे चित्रपटांच्या माध्यमातूनही तो अनुभवायला मिळाला. छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले सुपुत्र आणि स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज यांचा ज्वलंत इतिहास देखील काही चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला. असाच क चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘शिवरायांचा छावा’ या चित्रपटातून शंभू राजांची कथा मोठ्या पडद्यावर मांडण्यात आली आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. ‘शिवरायांचा छावा’ या चित्रपटाचे कलेक्शन नुकतेच समोर आले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

'रानू मंडल झालाय बिचारा', ट्रोल करणाऱ्या यूजर्सला अभिनेता गौरव मोरेचे सडेतोड उत्तर

मुक्ताला कळाले माधवीच्या अपघाताचे सत्य? 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत सागरला बसणार मोठा धक्का

विकेंडला दिसला 'श्रीकांत' चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर जलवा, तीन दिवसात सिनेमाने कमावले इतके कोटी

क्रिकेटवेड्या कपलची गोष्ट! जान्हवी आणि राजकुमारच्या 'माही' या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

‘शिवरायांचा छावा’ या चित्रपटाला प्रदर्शित होऊन आता चार दिवस उलटले आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. गेल्या चार दिवसांत या मराठी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ३ कोटींपेक्षा अधिकाची कमाई केली आहे. यावरून चित्रपटाला प्रेक्षकांच्यापसंतीची पावती मिळाली असल्याचे लक्षात येते. या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास दाखवण्यात आला आहे. या चित्रपटाला चार दिवसांत प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. दिग्पाल लांजेकर यांच्या या चित्रपटातून पुन्हा एकदा प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर इतिहास अनुभवायला मिळाला आहे. सॅकनिल्कच्या अहवालानुसार, चौथ्या दिवशी या चित्रपटाने ६४ लाखांची कमाई केली आहे.

Tharala Tar Mag 20th Feb: खोटं नाटक रचून प्रिया मोडणार साखरपुडा; ‘ठरलं तर मग’मध्ये रंजक वळण

‘शिवरायांचा छावा’ चित्रपटाची एकूण कमाई

पहिला दिवस- ६० लाख

दुसरा दिवस- ९० लाख

तिसरा दिवस- १.३ कोटी

चौथा दिवस- ६४ लाख

चार दिवसांची एकूण कमाई- ३.४४ कोटी

इतिहासाच्या पानांवर सुवर्णाक्षरांत कोरले गेलेले स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे संपूर्ण आयुष्य एक धगधगते अग्निकुंडच होते. मोठ्या पडद्यावर संभाजी महाराजांचा जीवनपट उलगडण्याचे शिवधनुष्य दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी उचलले होते. 'शिवरायांचा छावा' हा चित्रपट १६ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. संभाजी महाराजांच्या धगधगत्या अजेय पराक्रमाची कथा दिग्पाल लांजेकर यांनी लिहिली असून, पटकथा-संवाद आणि गाणी देखील त्यांचीच आहेत. या गाण्यांना साजेसे संगीत युवा संगीतकार देवदत्त मनीषा बाजी यांनी दिले आहे. तर, पार्श्वसंगीत अमर मोहिले यांचे आहे.

अभिनेता भूषण पाटील याने या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारण्याचे शिवधनुष्य पेलले आहे. यासोबतच या चित्रपटात अभिनेत्री तृप्ती तोरडमल, विक्रम गायकवाड, बिपीन सुर्वे, रवी काळे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

पुढील बातम्या