मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Viral Video: प्रेमावरचा विश्वास उडून गेला होता, पण...; पूजा सावंतने हटके अंदाजात होणाऱ्या पतीला केला प्रपोज!

Viral Video: प्रेमावरचा विश्वास उडून गेला होता, पण...; पूजा सावंतने हटके अंदाजात होणाऱ्या पतीला केला प्रपोज!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Feb 19, 2024 03:51 PM IST

Pooja Sawant Engagement Viral Video: सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या या व्हिडीओमध्ये पूजा आपल्या होणाऱ्या पतीला अर्थात सिद्धेश चव्हाण याला हटके अंदाजात प्रपोज करताना दिसली आहे.

Pooja Sawant Engagement Viral Video
Pooja Sawant Engagement Viral Video

Pooja Sawant Engagement Viral Video: मराठी मनोरंजन विश्वाची ‘कलरफुल गर्ल’ अर्थात अभिनेत्री पूजा सावंत हिने आधी रिलेशनशिप जाहीर करून, आणि आता साखरपुडा करून चाहत्यांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला आहे. नुकताच पूजा सावंत हिचा साखरपुडा पार पडला आहे. या साखरपुडा सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आपल्या साखरपुड्याची झलक फोटोंच्या माध्यमातून शेअर केल्यानंतर आता तिने या सोहळ्यातील खास क्षणांचा एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये पूजा आपल्या होणाऱ्या पतीला अर्थात सिद्धेश चव्हाण याला हटके अंदाजात प्रपोज करताना दिसली आहे.

काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री पूजा सावंत हिने होणाऱ्या पतीसोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोंमध्ये पूजा सावंत हिच्या होणाऱ्या पतीचा चेहरा दिसला नव्हता. मात्र, तिने या फोटोतून आपले लग्न ठरले असल्याचे म्हणत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती. या बातमीनंतर पूजा लग्न कधी करणार अशी आतुरता सगळ्यांनाच लागली होती. मात्र, यावरही अभिनेत्रीने भाष्य करणं टाळलं होतं. वैयक्तिक आयुष्याविषयीच्या सगळ्याच गोष्टी पूजाने नेहमी कॅमेरापासून दूर ठेवल्या होत्या. यानंतर पुन्हा एकदा पूजाने चाहत्यांना आश्चर्यचकित केलं. तिने आपल्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आणि पुन्हा एकदा सगळ्या चाहत्यांना धक्का दिला.

पाहा खास व्हिडीओ

आता पूजा सावंत हिने तिच्या साखरपुडा सोहळ्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये पूजा सगळ्यांसमोर सिद्धेश चव्हाण याला लग्नासाठी प्रपोज करताना दिसली आहे. यावेळी तिने आपल्या मनातील भावना देखील बोलून दाखवल्या. या व्हिडीओमध्ये पूजा सावंत, सिद्धेश चव्हाण याला प्रपोज करताना म्हणते की, ‘मिस्टर सिद्धेश चव्हाण, जेव्हा कुठे प्रेमावरचा विश्वास उडून चालला होता, तेव्हा मला कधीच वाटलं नव्हतं की, मी कुणावर कधी इतकं प्रेम करु शकेन. पण, तुझ्या येण्याने माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं मला मिळाली. जर तू मला विचारलं नसतं, तर कदाचित मीच तुला विचारलं असतं. पण, आज देवाचा आणि आपल्या सर्व कुटुंबीयांच्या समोर मी तुला विचारते, माझ्याशी लग्न करशील?’

पूजाने सगळ्यांसमोर केलेला प्रपोज पाहून सिद्धेश चव्हाण देखील भारावून गेला. त्याने तिला लगेच होकार देत, तिच्या हाताला व कपाळाला किस केले. यानंतर व्हिडीओमध्ये त्यांच्या साखरपुडा सोहळ्यातील काही खास क्षण दिसत आहे.

IPL_Entry_Point