मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Shivrayancha Chhava: ‘शिवरायांचा छावा’ चित्रपटात ‘हा’ अभिनेता साकारणार काकर खान! समोर आला लूक

Shivrayancha Chhava: ‘शिवरायांचा छावा’ चित्रपटात ‘हा’ अभिनेता साकारणार काकर खान! समोर आला लूक

Harshada Bhirvandekar HT Marathi
Feb 12, 2024 03:07 PM IST

Shivrayancha Chhava Kakar Khan First Look: ‘शिवरायांचा छावा’ या चित्रपटातील ‘काकर खान’ या पात्राचा फर्स्ट लूक समोर आला आहे.

Shivrayancha Chhava Kakar Khan First Look
Shivrayancha Chhava Kakar Khan First Look

Shivrayancha Chhava Kakar Khan First Look: मराठी मनोरंजन विश्वात सध्या ‘शिवरायांचा छावा’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटातून ‘शिवरायांचा छावा’ अर्थात छत्रपती संभाजी महाराजांची गाथा पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटातील कलाकारांचे फर्स्ट लूक समोर आले आहेत. आता या चित्रपटातील ‘काकर खान’ या पात्राचा फर्स्ट लूक समोर आला आहे. या भूमिकेत अभिनेता राहुल देव झळकणार आहे. नुकताच त्यांचा जबरदस्त लूक प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

अनेक हिंदी चित्रपट व मालिकांमध्ये ‘खलनायक’ म्हणून झळकलेले अभिनेते राहुल देव आता आगामी ‘शिवरायांचा छावा’ या चित्रपटात ‘काकर खान’ ही खलनायकी व्यक्त्तिरेखा साकारणार आहेत. ‘शिवरायांचा छावा’ हा भव्य ऐतिहासिक पट लवकरच रुपेरी पडद्यावर उलगडणार आहे. ए.ए. फिल्म्स आणि एव्हरेस्ट एंटरटटेंमेंट प्रस्तुत आणि दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित 'शिवरायांचा छावा' १६ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. औरंगजेबाने बुऱ्हाणपूरची पूर्ण जबाबदारी काकर खान या अनुभवी सरदारावर सोपवली होती. लोकांवर जिझिया कर लावत काकर खानने जनतेस वेठीस धरले होते. काकरखानच्या अन्यायी राजवटीपासून छत्रपती संभाजी महाराजांनी रयतेची सुटका केली होती.

Viral Video: ‘ही काय वागण्याची पद्धत झाली का?’; आदित्य नारायणचा ‘तो’ व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले!

आपल्या या भूमिकेविषयी बोलताना अभिनेते राहुल देव सांगतात की, ‘आजवरच्या अभिनय कारकिर्दीत अनेक खलनायकी भूमिका साकारल्या असल्या, तरी क्रूरकर्मा ‘काकर खान’ ही ऐतिहासिक भूमिका करण्यासाठी विशेष मेहनत घेतली आहे. एखादी विशेष भूमिका वठवताना अगदी भाषेपासून चालण्या-बोलण्याच्या सवयीपर्यंतचे बदल करावे लागतात. काकर खानची भूमिका असल्याने उर्दू भाषा आत्मसात करणं मला गरजेचं होतं. प्रत्येक भाषेचा स्वत:चा असा लहेजा असतो, तो लहेजा लक्षात घेत ही भाषा मी शिकून घेतली. भाषेनंतर प्रश्न होता तो लूक्सचा. त्यामुळे देहबोलीही तितकीच बोलकी असण्याची महत्त्वाची जबाबदारी माझ्यावर होती.’

मल्हार पिक्चर्स कं.चे वैभव भोर, किशोर पाटकर, मधू यांनी या ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर सह-निर्मिती भावेश रजनीकांत पंचमतीया यांनी केली आहे. कार्यकारी निर्माता प्रखर मोदी आहेत. कथा दिग्पाल लांजेकरांनी लिहिली असून, पटकथा-संवाद आणि गाणी देखील त्यांचीच आहेत. गाण्यांना साजेसं संगीत युवा संगीतकार देवदत्त मनीषा बाजी यांनी दिलं आहे. पार्श्वसंगीत अमर मोहिले यांचे आहे. चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी ए. ए.फिल्म्स सांभाळत आहे.

WhatsApp channel

विभाग