मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Tharala Tar Mag 20th Feb: खोटं नाटक रचून प्रिया मोडणार साखरपुडा; ‘ठरलं तर मग’मध्ये रंजक वळण

Tharala Tar Mag 20th Feb: खोटं नाटक रचून प्रिया मोडणार साखरपुडा; ‘ठरलं तर मग’मध्ये रंजक वळण

Harshada Bhirvandekar HT Marathi
Feb 20, 2024 01:53 PM IST

Tharala Tar Mag 20 February 2024 Serial Update: तन्वीच्या घरात तिच्या साखरपुड्याची जोरदार तयारी सुरू आहे. तन्वीचा साखरपुडा विपुलशी होणार आहे.

Tharala Tar Mag 20 February 2024
Tharala Tar Mag 20 February 2024

Tharala Tar Mag 20 February 2024 Serial Update:ठरलं तर मग’ मालिकेच्या आजच्या भागात प्रेक्षकांना हाय व्हॉल्टेज ड्रामा पाहायला मिळणार आहे. एकीकडे साक्षीमुळे अर्जुन आणि चैतन्य यांच्या नात्यात दुरावा आला आहे. तर, आता प्रिया पुन्हा एकदा किल्लेदारांच्या घरात एक नवा तमाशा रचणार आहे. रविराज आणि सुमन यांच्या घरात म्हणजेच किल्लेदारांच्या घरात सध्या खोटी तन्वी म्हणजेच प्रियाच्या साखरपुड्याची जोरदार तयारी सुरू आहे. मात्र, याच साखरपुड्यात आता ट्वीस्ट येणार आहे. प्रिया तिचा हा साखरपुडा मोडणार आहे. यासाठी ती एक नाटक रचणार आहे.

तन्वीच्या घरात तिच्या साखरपुड्याची जोरदार तयारी सुरू आहे. तन्वीचा साखरपुडा विपुलशी होणार आहे. रविराज आणि सुमन यांनी आपल्या लेकीचा साखरपुडा लगेच करायचा ठरवला. मात्र, यामुळे प्रियाचा डाव फसणार होता. प्रियाला सायली आणि अर्जुन यांच्या नात्यात वितुष्ट आणून, अर्जुनसोबत संसार थाटायचा आहे. प्रियाचा साखरपुडा होणार असल्याचे कळताच आता अस्मिता तिला फोन करून खिजवणार आहे. तू आता विपुलशी साखरपुडा केलास, तर अर्जुनला कसं मिळवणार?, असा प्रश्न अस्मिता प्रियाला करणार आहे. यावर वैतागलेली प्रिया आता हा साखरपुडा होऊ नये, म्हणून एक नवा खेळ खेळणार आहे.

Tharala Tar Mag 19th Feb: राजीनाम्यासोबतच चैतन्यने तोडलं अर्जुनशी नातं! ‘ठरलं तर मग’ मालिकेत पुढं काय घडणार?

ठरल्याप्रमाणे किल्लेदारांच्या घरात साखरपुड्याची पूर्ण तयारी झाली आहे. विपुल आणि त्याचं कुटुंब देखील त्यांच्या घरी आलं आहे. आता दोघे एकमेकांना अंगठ्या घालणार, इतक्यात एका अनोळखी मुलाची तिथे एन्ट्री होणार आहे. प्रिया आणि विपुल यांच्या साखरपुड्यात येऊन हा मुलगा साखरपुडा रोखणार आहे. यावेळी तो आपण प्रियाचा बॉयफ्रेंड असल्याचे सगळ्यांना सांगणार आहे. तर, प्रिया देखील तो मुलगा म्हणजेच सँडी आपला बॉयफ्रेंड असून, आपलं त्याच्यावर प्रेम असल्याचं म्हणणार आहे. आई-बाबांनी न विचारताच आपला साखरपुडा आणि लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांचं मन मोडू नये, म्हणून आपणच मन मारून हे लग्न करण्याचा निर्णय घेतल्याचे प्रिया सांगणार आहे.

प्रियाच्या तोंडून हे ऐकून रविराज आणि सुमनसह विपुल आणि त्याच्या कुटुंबाला देखील धक्का बसणार आहे. तर, आता रविराज मान खाली घालून विपुल आणि त्याच्या कुटुंबाची माफी मागणार आहे. विपुल आणि त्याचे कुटुंब रविराज किल्लेदारांनी आम्हाला फसवलं असं म्हणत घरातून निघून जाणार आहेत. मालिकेच्या आगामी भागात हे पाहायला मिळणार आहे.

IPL_Entry_Point