मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Sasubai Jorat: सुनेशी वैर झालं जूनं, ‘सासूबाई जोरात’मध्ये आता रंगणार सासू-जावयाची धमाल गोष्ट!

Sasubai Jorat: सुनेशी वैर झालं जूनं, ‘सासूबाई जोरात’मध्ये आता रंगणार सासू-जावयाची धमाल गोष्ट!

Sep 25, 2023, 01:52 PM IST

  • Sasubai Jorat New Marathi Movie: सासू आणि जावयाच्या नात्यातील प्रेमळ कुरबुरी आता प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहेत.

Sasubai Jorat New Marathi Movie

Sasubai Jorat New Marathi Movie: सासू आणि जावयाच्या नात्यातील प्रेमळ कुरबुरी आता प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहेत.

  • Sasubai Jorat New Marathi Movie: सासू आणि जावयाच्या नात्यातील प्रेमळ कुरबुरी आता प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहेत.

Sasubai Jorat New Marathi Movie: घर म्हटलं की, भांड्याला भांड लागतंच. त्यातही जर सासू आणि सून एकत्र नांदत असतील, तर मात्र ही गंमत निराळीच असते. सासू सूनेच नातं म्हणजे अगदीच विळी आणि भोपळ्यासारखं असतं. या धमाल नात्यावर आजपर्यंत चित्रपट-मालिका सगळ्यातूनच विविध अंगाने भाष्य केले गेले आहे. या नात्यावर अनेक चित्रपट बनले आहेत. मात्र, आता प्रेक्षकांना सासू आणि जावयाच्या नात्यातील धमाल बघायला मिळणार आहे. सासू आणि जावयाच्या नात्यातील प्रेमळ कुरबुरी आता प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. मराठी मनोरंजन विश्वात हा एक आगळा वेगळा प्रयोग या चित्रपटाच्या निमित्ताने पाहायला मिळणार आहे. ‘सासूबाई जोरात’ असे या आगामी चित्रपटाचे नाव असून, यात ही धमाल पाहायला मिळणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

नेमकी काय आहे ‘हीरामंडी’तील आदिती राव हैदरीने केलेली ‘गजगामिनी चाल’? कामसूत्राशी आहे कनेक्शन

‘बस करा आता... बंद करा मालिका’; अपर्णा आणि अर्जुनच्या ‘अप्पी आमची कलेक्टर’वर का वैतागले प्रेक्षक?

काय होतास तू... काय झालास तू.... ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम गुरुचरण सिंहची अवस्था बघून चाहते हळहळले!

कान्स फिल्म फेस्टिव्हलमधून परतताच ऐश्वर्या रायच्या हातावर शस्त्रक्रिया होणार! अभिनेत्रीला नेमकं काय झालंय?

‘सासूबाई जोरात’ या चित्रपटात सासू आणि जावयाच्या धमाल नात्याचं चित्रण करण्यात आलं आहे. सिद्धार्थ प्रभाकर ढगे यांनी लेखन-दिग्दर्शन केलेला हा दमदार चित्रपट येत्या २९ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात मराठी मनोरंजन विश्वातील अनेक मातब्बर कलाकार पाहायला मिळणार आहे. तगडी स्टारकास्ट असलेला हा चित्रपट आता लवकरच प्रदर्शित होणार आहे.

OTT Release: घरबसल्या बघता येणार समंथाचा 'कुशी'; जाणून घ्या कधी आणि कुठे प्रदर्शित होणार...

‘सासुबाई जोरात’ ही गोष्ट आधुनिक सासू आणि तिच्या आधुनिक जावयाची आहे. या चित्रपटाच्या कथेतल्या सासूला तिच्या पतीची जराही चिंता नाही. मात्र, जावयाच्या मागे ती हात धुवून लागली आहे. ती जावयाशी अत्यंत कठोरपणे वागते. या सासू आणि जावई यांच्या अनोख्या नात्यात काय होतं याची धमाल गोष्ट ‘सासूबाई जोरात’ या चित्रपटात मांडण्यात आली आहे. सासू-सुनेच्या एकमेकींवरच्या कुरघोडी, अनेक प्रकारच्या लढाया आजवर चित्रपट आणि मालिकांतून आपण पाहिल्याच आहेत. मात्र, आता सासू-जावयाची धमाल गोष्ट चित्रपटात पाहणं हा मनोरंजक अनुभव ठरेल, यात शंकाच नाही. त्याशिवाय चित्रपटात उत्तम स्टारकास्ट असल्यानं हा चित्रपट अभिनयाची मेजवानीच ठरेल.

या आगामी मराठी चित्रपटात सयाजी शिंदे, संदीप पाठक, विजय पाटकर, मोहन जोशी, सुनील गोडबोले, उषा नाईक, आशा बिराजदार, विधी कुडिया, सिमरन क्षीरसागर, मिलिंद ढगे, सुयश लातूरे आदींच्या प्रमुख भूमिका आहेत. प्रभू शांती फिल्म प्रॉडक्शनने ‘सासूबाई जोरात’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. सिद्धार्थ प्रभाकर ढगे यांनी या चित्रपटाच्या लेखन, दिग्दर्शन, गीतलेखन आणि निर्मितीची धुरा सांभाळली आहे. तर, तेजस काळोखे यांनी संगीत, कुमार डोंगरे यांनी छायांकन केलं आहे.

विभाग

पुढील बातम्या