मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Salman Khan: सलमान खानची जादू ओसरली? नव्या चित्रपटाच्या ट्रेलरची कुठे चर्चाच नाही!

Salman Khan: सलमान खानची जादू ओसरली? नव्या चित्रपटाच्या ट्रेलरची कुठे चर्चाच नाही!

Apr 11, 2023, 08:10 AM IST

  • Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Trailer Released: मागील काही वर्षात रिलीज झालेले सलमान खान याचे चित्रपट सातत्याने बॉक्स ऑफिसवर आपटताना दिसले आहेत.

Salman Khan in Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Trailer Released: मागील काही वर्षात रिलीज झालेले सलमान खान याचे चित्रपट सातत्याने बॉक्स ऑफिसवर आपटताना दिसले आहेत.

  • Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Trailer Released: मागील काही वर्षात रिलीज झालेले सलमान खान याचे चित्रपट सातत्याने बॉक्स ऑफिसवर आपटताना दिसले आहेत.

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Trailer Released: बॉलिवूडचा ‘दबंग’ अर्थात अभिनेता सलमान खान याच्या आगामी ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट बघत आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मात्र, या ट्रेलरमुळे प्रेक्षकांची निराशा झाली आहे. सलमानचा हा चित्रपट आता बॉक्स ऑफिसवर आपटू शकतो, अशी कुजबुज सुरू झाली आहे. ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. मात्र, या ट्रेलरची चर्चा कुठेच दिसत नाहीये.

ट्रेंडिंग न्यूज

नेमकी काय आहे ‘हीरामंडी’तील आदिती राव हैदरीने केलेली ‘गजगामिनी चाल’? कामसूत्राशी आहे कनेक्शन

‘बस करा आता... बंद करा मालिका’; अपर्णा आणि अर्जुनच्या ‘अप्पी आमची कलेक्टर’वर का वैतागले प्रेक्षक?

काय होतास तू... काय झालास तू.... ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम गुरुचरण सिंहची अवस्था बघून चाहते हळहळले!

कान्स फिल्म फेस्टिव्हलमधून परतताच ऐश्वर्या रायच्या हातावर शस्त्रक्रिया होणार! अभिनेत्रीला नेमकं काय झालंय?

ट्रेलर आधी या चित्रपटातील काही गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. मात्र, या गाण्यांना देखील तितकासा प्रतिसाद मिळाला नाही. उलट यातील काही गाण्यावर तर मिम्सचा अक्षरश पाऊस पडला. याच फटका आता ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाच्या ट्रेलरला देखील बसला आहे. अनेक चाहत्यांनी आणि प्रेक्षकांनी या चित्रपटाच्या ट्रेलर आपल्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहे. त्या प्रतिक्रिया पाहता या ट्रेलरने प्रेक्षकांची निराशा केली आहे, असे चित्र दिसत आहे.

एका यूजरने लिहिले की, 'किसी का भाई किसी की जान'चा ट्रेलर 'राधे' चित्रपटाचं भोजपुरी व्हर्जन असल्यासारखं वाटत आहे. आणखी एका यूजरने लिहिले की, 'अरे हा सलमान खान किती ओवरअॅक्टिंग करत आहे...’ तिसर्‍या एका यूजरने लिहिले की, 'बाय द वे, मला सलमान भाईचा स्वॅग खूप आवडतो, पण हा ट्रेलर खूपच वाईट आहे. इतका वाईट की, मी पूर्ण ट्रेलरही पाहू शकलो नाही'. एकीकडे काही निगेटिव्ह प्रतिक्रिया मिळत असताना मात्र, काही लोकांना सलमान खानची ही स्टाईल आवडली आहे.

मागील काही वर्षात रिलीज झालेले सलमान खान याचे चित्रपट सातत्याने बॉक्स ऑफिसवर आपटताना दिसत आहेत. ‘ट्यूबलाईट’, ‘भारत’, ‘राधे’, ‘अंतिम’ अशा चित्रपटांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली होती. मात्र, त्याच्या यंदा रिलीज होणाऱ्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाकडून प्रेक्षकांना भरपूर अपेक्षा होत्या. परंतु, एकंदरीत सध्याचं चित्र पाहता, या अपेक्षा कितपत पूर्ण होऊ शकतील यात शंकाच आहे. सलमान खानचा 'किसी का भाई किसी की जान' हा चित्रपट २१ एप्रिलला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. फरहाद सामजी दिग्दर्शित या चित्रपटात सलमान खान व्यतिरिक्त पूजा हेगडे, शहनाज गिल, व्यंकटेश दग्गुबाती, सिद्धार्थ निगम, राघव जुयाल, पलक तिवारी आणि जस्सी गिल महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

विभाग

पुढील बातम्या