मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Salman Khan: सलमानला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यांविरोधात मुंबई पोलिसांनी जारी केली लुकआउट नोटीस!

Salman Khan: सलमानला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यांविरोधात मुंबई पोलिसांनी जारी केली लुकआउट नोटीस!

May 09, 2023, 11:43 AM IST

  • Salman Khan Death Threat Case: मुंबई पोलिसांनी बॉलिवूड अभिनेता सलमान खानला मार्चमध्ये धमकीचे ईमेल पाठवल्याचा आरोप असलेल्या एका व्यक्तीविरुद्ध लुकआउट नोटीस जारी केली आहे.

Salman Khan

Salman Khan Death Threat Case: मुंबई पोलिसांनी बॉलिवूड अभिनेता सलमान खानला मार्चमध्ये धमकीचे ईमेल पाठवल्याचा आरोप असलेल्या एका व्यक्तीविरुद्ध लुकआउट नोटीस जारी केली आहे.

  • Salman Khan Death Threat Case: मुंबई पोलिसांनी बॉलिवूड अभिनेता सलमान खानला मार्चमध्ये धमकीचे ईमेल पाठवल्याचा आरोप असलेल्या एका व्यक्तीविरुद्ध लुकआउट नोटीस जारी केली आहे.

Salman Khan Death Threat Case: बॉलिवूडचा ‘भाईजान’ अर्थात अभिनेता सलमान खान याला गेल्या काही दिवसांपासून सतत जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. त्यामुळे त्याची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे. मुंबई पोलीस या प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत. आता अलीकडेच मुंबई पोलिसांनी बॉलिवूड अभिनेता सलमान खानला मार्चमध्ये धमकीचे ईमेल पाठवल्याचा आरोप असलेल्या एका व्यक्तीविरुद्ध लुकआउट नोटीस जारी केली आहे. हा ईमेल गोल्डी ब्रारच्या नावाने पाठवण्यात आला होता आणि त्यात अभिनेत्याला जीवे मारण्याच्या धमक्या होत्या.

ट्रेंडिंग न्यूज

२५ दिवसांनंतर ‘सोढी’ घरी परतला! नक्की कुठे गेला होता अभिनेता गुरुचरण सिंह?

‘बाजीराव मस्तानी’साठी संजय लीला भन्साळी यांनी अलका कुबल यांना का नाकारलं? अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा!

पुन्हा एकदा ‘सायली’ आणि ‘कला’ने मारली बाजी! पाहा या आठवड्याचा मराठी मालिकांचा TRP Report

‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णी हिला कसा मिळाला होता पहिला चित्रपट? वाचा अभिनेत्रीविषयी काही भन्नाट गोष्टी!

मुंबई पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत असून, अभिनेत्याच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना केल्या आहेत. भारतीय चित्रपट उद्योगातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक, सलमान खान याला यापूर्वी देखील अशाच प्रकारच्या धमक्या मिळाल्या होत्या. आत त्याला पोलिसांकडून अतिरिक्त सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे.

The Kerala Story Collection: ‘द केरळ स्टोरी’ने अवघ्या ४ दिवसांत केलं बजेट वसूल; पाहा आतापर्यंतचे कलेक्शन

एका टीव्ही शोमध्ये, सलमानने जीवे मारण्याच्या धमक्यांदरम्यान मुंबई पोलिसांकडून मिळालेल्या Y+ श्रेणीच्या सुरक्षेबद्दलही सांगितले. याबाबत सलमान म्हणाला होता की, ‘बेसावध राहण्यापेक्षा सुरक्षा चांगली असते. मला सुरक्षा पुरवण्यात आली आहे. आता रस्त्यावर सायकल चालवून एकट्याने कुठेही जाणे शक्य होत नाही. रस्त्यावरून जाताना वाहनांचा ताफा सोबत असतो. यामुळे ट्रॅफिक जाम होते. माझ्या चाहत्यांना याचा त्रास होतो याचे वाईट देखील वाटते. सलमान खानला सतत मिळणाऱ्या या धमक्यांमुळे त्याच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे. याशिवाय सुरक्षेचा विचार करून सलमानने नुकतीच निसानची नवी बुलेटप्रूफ कार खरेदी केली आहे. त्याचबरोबर अभिनेत्याला मिळणाऱ्या धमक्यांवरही पोलिस तातडीने कारवाई करत आहेत.

सलमानला जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर त्याचे कुटुंब सध्या प्रचंड चिंतीत झालं आहे. सगळ्यांनाच सलमान खानची काळजी वाटत आहे. त्यामुळे सलमान खानने सध्या शांत राहण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात सलमानच्या एका जवळच्या मित्राने सांगितले की, सलमान या धमकीला घाबरलेला नसून, तो सगळ्या गोष्टी अगदी सामान्य पद्धतीने घेत आहे.

विभाग

पुढील बातम्या