मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Pathaan Collection: ‘पठाण’चा धुमाकूळ! ‘आरआरआर’ला मागे टाकत गाठणार १००० कोटींचा टप्पा?

Pathaan Collection: ‘पठाण’चा धुमाकूळ! ‘आरआरआर’ला मागे टाकत गाठणार १००० कोटींचा टप्पा?

Feb 08, 2023, 01:29 PM IST

    • Pathaan Box Office Collection: लवकरच ‘पठाण’ हा चित्रपट १००० कोटींचा टप्पा पार करू शकतो. या आधी ‘आरआरआर’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच कल्ला केला होता.
Pathaan Box

Pathaan Box Office Collection: लवकरच ‘पठाण’ हा चित्रपट १००० कोटींचा टप्पा पार करू शकतो. या आधी ‘आरआरआर’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच कल्ला केला होता.

    • Pathaan Box Office Collection: लवकरच ‘पठाण’ हा चित्रपट १००० कोटींचा टप्पा पार करू शकतो. या आधी ‘आरआरआर’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच कल्ला केला होता.

Pathaan Box Office Collection:पठाण’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. २५ जानेवारीला हा चित्रपट जगभर प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवसापासून या चित्रपटाने धमाकेदार यश मिळवले आहे. दोन आठवड्यांनंतरही बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाचा गाजावाजा आहे. शाहरुख खानने पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर धमाकेदार पुनरागम केले आहे. चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर झळकलेला शाहरुख प्रेक्षकांचे भापूर मनोरंजन करत आहे. आता लवकरच हा चित्रपट ‘आरआरआर’ला मात देण्याच्या तयारीत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

‘बस करा आता... बंद करा मालिका’; अप्पी आणि अर्जुनवर का वैतागले प्रेक्षक? थेट मालिकाच संपवायला म्हणतायत...

काय होतास तू... काय झालास तू.... ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम गुरुचरण सिंहची अवस्था बघून चाहते हळहळले!

कान्स फिल्म फेस्टिव्हलमधून परतताच ऐश्वर्या रायच्या हातावर शस्त्रक्रिया होणार! अभिनेत्रीला नेमकं काय झालंय?

मानधन मिळालं नाही म्हणून प्रॉडक्शन हाऊसमध्ये रोज जेवून पैसे वसूल केले! नवाजुद्दीन सिद्दीकीचा किस्सा ऐकलात?

‘पठाण’ या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर ४०० कोटींचा आकडा पार केला आहे. जगभरात 'पठाण' दुप्पट वेगाने कमाई करत आहेत. या चित्रपटाने १४व्या दिवशी भारतीय बॉक्स ऑफिसवर ८ कोटींची कमाई केली आहे. अशा प्रकारे पठाणने आतापर्यंत ४०० कोटींचा टप्पा पार केला आहे.

तर, मीडिया रिपोर्टनुसार, जगभरात 'पठाण' या चित्रपटाने १३व्या दिवशी ८५५ कोटींचा आकडा पार केला आहे. लवकरच हा चित्रपट १००० कोटींचा टप्पा पार करू शकतो. या आधी ‘आरआरआर’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच कल्ला केला होता. या चित्रपटाला जगभरात चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता ‘आरआरआर’ला मागे टाकत ‘पठाण’ ही जागा पटकावण्याची शक्यता आहे.

११व्या दिवशीच ‘पठाण’ने आमिर खानच्या सुपरहिट चित्रपट ‘दंगल’चा विक्रम मोडला आहे आणि सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट बनला आहे. आमिर खानचा ‘दंगल’ २०१६मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाने एकूण ३८७.३८ कोटींची कमाई केली आहे. त्याचवेळी ‘पठाण’चे कलेक्शन ११ दिवसांत सुमारे ४०० कोटी रुपये झाले आहे. त्याचवेळी, ‘पठाण’ लवकरच ‘बाहुबली २’ आणि ‘KGF २’चा रेकॉर्ड मोडेल अशी अपेक्षा आहे.

‘पठाण’ चित्रपटातून शाहरुखने प्रेक्षकांची वाहवा मिळवली आहे. तर, अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या ग्लॅमरस स्टाईलनेही धुमाकूळ घातला आहे. जॉन अब्राहम देखील खलनायकाच्या भूमिकेत हिट ठरल्याचे सिद्ध झाले आहे. त्याचबरोबर सलमान खानच्या कॅमिओनेही या चित्रपटाला चार चाँद लावले आहेत.

विभाग

पुढील बातम्या