मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  OTT Releases: धमाल कॉमेडीचा डबल डोस; या आठवड्यात ओटीटीवर पाहायला मिळणार ‘हा’ मराठी चित्रपट!

OTT Releases: धमाल कॉमेडीचा डबल डोस; या आठवड्यात ओटीटीवर पाहायला मिळणार ‘हा’ मराठी चित्रपट!

Sep 13, 2023, 12:33 PM IST

  • OTT Release Marathi Movie: घरी बसून संपूर्ण कुटुंबासोबत चित्रपट बघण्याचा आनंद देखील वेगळाच असतो. असाच आनंद आता मराठी प्रेक्षकांना देखील घेता येणार आहे.

OTT Release Marathi Movie

OTT Release Marathi Movie: घरी बसून संपूर्ण कुटुंबासोबत चित्रपट बघण्याचा आनंद देखील वेगळाच असतो. असाच आनंद आता मराठी प्रेक्षकांना देखील घेता येणार आहे.

  • OTT Release Marathi Movie: घरी बसून संपूर्ण कुटुंबासोबत चित्रपट बघण्याचा आनंद देखील वेगळाच असतो. असाच आनंद आता मराठी प्रेक्षकांना देखील घेता येणार आहे.

OTT Release Marathi Movie: मराठी मनोरंजन विश्व देखील आता ओटीटीवर विस्तारत आहे. घरी बसून संपूर्ण कुटुंबासोबत चित्रपट बघण्याचा आनंद देखील वेगळाच असतो. असाच आनंद आता मराठी प्रेक्षकांना देखील घेता येणार आहे. मराठीतील काही गाजलेले चित्रपट आता ओटीटीवर देखील पाहता येणार आहेत. या आठड्यात ‘अल्ट्रा झकास’ या ओटीटी माध्यमावर ‘बायको देता का बायको’ हा धमाल मराठी चित्रपट पाहायला मिळणार आहे. तुम्ही देखील संपूर्ण कुटुंबासोबत हा चित्रपट घरी बसून एन्जॉय करू शकता.

ट्रेंडिंग न्यूज

आख्या महाराष्ट्राचा बिहार करुन टाकला; गौतमी पाटील-उत्कर्ष शिंदेच्या गाण्यावर नेटकरी संतापले

मतदान यादीतून नाव डिलिट झाल्यावरही करता येणार मतदान! मराठमोळ्या अभिनेत्रीने सांगितला उपाय

लीला आणि अभिरामच्या लग्नासाठी कालिंदीने केलंय खोटं नाटक! ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये येणार ट्वीस्ट

कलाने घेतला अद्वैतच्या खोलीचा ताबा, 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेच्या आजच्या भागात काय घडणार?

‘बायको देता का बायको’ या चित्रपटाचा विषय देखील धमाल आहे. या चित्रपटात लग्नासारख्या मुद्द्यावर विनोदातून भाष्य करण्यात आलं आहे. ऐन तारुण्यात लग्नासाठी इच्छुक असणाऱ्या तरुणांना आजघडीला पत्नी मिळणं अगदी कठीण झालं आहे. पण असं का व्हावं? या मागचं नेमकं कारण काय असेल? हा गंभीर मुद्दा विनोदी ढंगात या चित्रपटात मांडण्यात आला आहे. येत्या १८ सप्टेंबरला ‘बायको देता का बायको’ हा चित्रपट ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर चॅनेलवर पाहायला मिळणार आहे.

Tharla Tar Mag: प्रियाचा खोटेपणा अर्जुन सिद्ध करू शकेल का? आश्रमच्या केसला मिळणार नवं वळण

जेव्हा योग्य वय येतं, तेव्हा प्रत्येकजण लग्न करण्याचा विचार करतो. कारण, लग्न हा प्रत्येकाच्याच आयुष्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. 'बायको देता का बायको' या चित्रपटात देखील असाच एक गंभीर मुद्दा मांडण्यात आला आहे. पुरूषांना योग्य नोकरी नसल्यामुळे बायको शोधण्यासाठी कसा आणि किती संघर्ष करावा लागतो, हे यातून चित्रित करण्यात आले आहे. सुरेश साहेबराव ठाणगे दिग्दर्शित ‘बायको देता का बायको’ या धमाल विनोदी चित्रपटात इरसाल विनोदी अभिनेते सुनील गोडबोले, सिद्धेश्वर झाडबुके, अभिलाषा पाटील, किशोर ढमाले, श्वेता कुलकर्णी, आरती तांबे, प्रतीक पडवळ इत्यादींच्या प्रमुख भूमिका आहेत.

एकीकडे मुली उच्च शिक्षण घेऊन पुढे जात आहेत. तर, दुसरीकडे काही मुलं मात्र शिक्षणाकडे दुर्लक्ष करून वाईट वळणावर जात आहेत. या वाईट वळणाने त्यांच्या आयुष्यालाही वाईट कलाटणी मिळते. नंतर पश्चाताप करण्याशिवाय त्यांच्याकडे काही उरत नाही. म्हणूनच मुलांना लग्नासाठी मुली मिळणं कठीण झालं आहे. हा गंभीर मुद्दा सर्वांपर्यंत पोहचावा याच उद्देशाने 'बायको देता का बायको' हा मराठी चित्रपटात हलक्या फुलक्या विनोदी ढंगात बनवण्यात आला आहे.

विभाग

पुढील बातम्या