मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Ghar Banduk Biryani: नागराज मंजुळेंच्या ‘घर बंदूक बिर्याणी’ची उत्सुकता वाढली; चार भाषांमध्ये रिलीज होणार चित्रपट!

Ghar Banduk Biryani: नागराज मंजुळेंच्या ‘घर बंदूक बिर्याणी’ची उत्सुकता वाढली; चार भाषांमध्ये रिलीज होणार चित्रपट!

Dec 30, 2022, 09:15 AM IST

    • Ghar Banduk Biryani Shoot Warped up: टीझरवरून 'घर बंदूक बिर्याणी' या चित्रपटात काहीतरी नवीन पाहायला मिळणार असल्याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.
Ghar Banduk Biryani Team

Ghar Banduk Biryani Shoot Warped up: टीझरवरून 'घर बंदूक बिर्याणी' या चित्रपटात काहीतरी नवीन पाहायला मिळणार असल्याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.

    • Ghar Banduk Biryani Shoot Warped up: टीझरवरून 'घर बंदूक बिर्याणी' या चित्रपटात काहीतरी नवीन पाहायला मिळणार असल्याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.

Ghar Banduk Biryani Shoot Warped up: सैराट’, ‘नाळ’ आणि ‘झुंड’च्या यशानंतर दिग्दर्शक-निर्माते नागराज पोपटराव मंजुळे यांनी 'घर बंदूक बिर्याणी' या आगामी चित्रपटाची घोषणा काही महिन्यांपूर्वी केली होती. ‘घर बंदूक बिर्याणी’ची घोषणा झाल्यापासूनच या चित्रपटात काय पाहायला मिळणार, याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र, आता प्रेक्षकांना जास्त प्रतीक्षा करावी लागणार नाही, कारण या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून, आता लवकरच 'घर बंदूक बिर्याणी' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

ओटीटीवर पुन्हा 'स्कॅम' होणार! १९९२मध्ये हर्षद मेहता, २००३मध्ये तेलगी; आता २०१०च्या घोटाळ्याची फाईल उघडणार!

‘मंजू माई’ निघाली कान्सला! मराठी चित्रपट ते थेट कान फिल्म फेस्टिव्हलचा प्रवास करणारी छाया कदम!

अर्जुन सायली कॉन्ट्रॅक्ट मॅरेज वाढवून घेणार? मधुभाऊंची केस ठरेल का कारण? ‘ठरलं तर मग’ रंजक वळणावर!

दिवंगत आईच्या आठवणीत अभिनेत्री तेजश्री प्रधान झाली भावूक! सोशल मीडियावर पोस्ट लिहित म्हणाली...

झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे हे नेहमीच प्रेक्षकांसाठी काहीतरी भन्नाट विषय घेऊन येतात. यापूर्वी त्यांनी एकत्र येऊन ‘फॅंड्री’, ‘सैराट’, ‘नाळ’ यांसारखे सुपरहिट आणि वेगळ्या धाटणीचे चित्रपट मराठी सिनेसृष्टीला दिले आणि आता ‘घर बंदुक बिर्याणी’ हा एक वेगळा विषय ते आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत.

या चित्रपटाचा टीझर देखील काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. टीझरवरून 'घर बंदूक बिर्याणी' या चित्रपटात काहीतरी नवीन पाहायला मिळणार असल्याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. पोलीस आणि डाकूंची चकमक यात दिसत असून हा पाठलाग कशासाठी आहे आणि यातून काय निष्पन्न होणार आहे, हे चित्रपट पाहिल्यावरच कळणार आहे.

हेमंत जंगल अवताडे दिग्दर्शित या चित्रपटात सयाजी शिंदे, आकाश ठोसर आणि नागराज पोपटराव मंजुळे यांच्या प्रमुख भूमिका असून, येत्या नवीन वर्षात ‘घर बंदुक बिर्याणी’ प्रदर्शित होणार आहे. एकाच वेळी हा चित्रपट मराठी, हिंदी, तामिळ आणि तेलुगु भाषेत प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटाबद्दल निर्माते नागराज मंजुळे म्हणतात, ‘नुकतेच आमच्या ‘घर बंदुक बिर्याणी’चे चित्रीकरण संपले असून, एका बाजूला काम पूर्ण झाल्याचे समाधानही आहे आणि इतके दिवस एकत्र राहिल्याने थोडा भावनिकही झालो आहे. यात मी एका पोलिसाची भूमिका साकारत आहे. सयाजी शिंदे सारख्या अष्टपैलू अभिनेत्यासोबत काम करताना मजा आली. आकाशसोबत मी याआधीही काम केले असून तो एक उत्तम कलाकार आहे. एखादी भूमिका साकारताना तो त्यात स्वतःला झोकून देतो. आता चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून लवकरच आम्ही प्रदर्शनाची तारीखही जाहीर करू.’

पुढील बातम्या