मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Rocky Aur Rani Ki Prem Kahani: 'रंधावा पॅरेडाईज'मध्ये घडला मोठा गुन्हा; गोळी झाडून एका व्यक्तीची हत्या

Rocky Aur Rani Ki Prem Kahani: 'रंधावा पॅरेडाईज'मध्ये घडला मोठा गुन्हा; गोळी झाडून एका व्यक्तीची हत्या

Nov 30, 2023, 03:10 PM IST

  • Rocky Aur Rani Ki Prem Kahani Fame Bungalow: या आलिशान बंगल्यात एका व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने हा बंगला चर्चेत आला आहे.

Rocky Aur Rani Ki Prem Kahani Fame Bungalow

Rocky Aur Rani Ki Prem Kahani Fame Bungalow: या आलिशान बंगल्यात एका व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने हा बंगला चर्चेत आला आहे.

  • Rocky Aur Rani Ki Prem Kahani Fame Bungalow: या आलिशान बंगल्यात एका व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने हा बंगला चर्चेत आला आहे.

Rocky Aur Rani Ki Prem Kahani Fame Bungalow: बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांचा 'रॉकी रानी की प्रेम कहानी' हा या वर्षातील हिट चित्रपटांपैकी एक आहे. देशभरातील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या या चित्रपटातील 'रंधावा पॅरेडाईज' ही चर्चेत आला आहे. चित्रपटात दाखवण्यात आलेला हा आलिशान बंगला दिल्लीतील ग्रेटर नोएडा येथे स्थित आहे. आता हा बंगला एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. या आलिशान बंगल्यात एका व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने हा बंगला चर्चेत आला आहे. काय आहे हे प्रकरण जाणून घेऊया.

ट्रेंडिंग न्यूज

२५ दिवसांनंतर ‘सोढी’ घरी परतला! नक्की कुठे गेला होता अभिनेता गुरुचरण सिंह?

‘बाजीराव मस्तानी’साठी संजय लीला भन्साळी यांनी अलका कुबल यांना का नाकारलं? अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा!

पुन्हा एकदा ‘सायली’ आणि ‘कला’ने मारली बाजी! पाहा या आठवड्याचा मराठी मालिकांचा TRP Report

‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णी हिला कसा मिळाला होता पहिला चित्रपट? वाचा अभिनेत्रीविषयी काही भन्नाट गोष्टी!

मीडिया रिपोर्टनुसार, सोमवारी संध्याकाळी ग्रेटर नोएडातील 'रंधावा पॅराडाईज'मध्ये एका ५५ वर्षीय व्यक्तीची हत्या करण्यात आली. लग्नात सहभागी होण्यासाठी आलेल्या या व्यक्तीवर त्याच्याच व्याह्याने गोळ्या झाडल्याचे सांगितले जात आहे. 'रॉकी और रानी की प्रेमकहानी' या चित्रपटाची प्रेमकहाणी या 'रंधवा मॅन्शन'मध्ये शूट करण्यात आली होती. हे घर चित्रपटातील रणवीर सिंहचे पात्र 'रॉकी रंधवा'चे होते. मात्र, आता या आलिशान बंगल्यात एका व्यक्तीची हत्या झाल्याने आता हा बंगला चर्चेत आला आहे.

Chiranjeevi: तेलुगु सुपरस्टार चिरंजीवी मतदानासाठी अनवाणी का आला? व्हिडीओ होतोय व्हायरल!

नोएडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रेटर नोएडा पश्चिम येथील या 'गौर मलबेरी फार्म हाऊस'मध्ये एक लग्न सोहळा आयोजित करण्यात आला होता. याच लग्नसोहळ्यात गाझियाबादचा रहिवासी असलेल्या शेखरने सोमवारी रात्री ९.३०च्या सुमारास अशोक नावाच्या व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या केली आहे. अशोकचा मुलगा आणि शेखरची मुलगी यांच्यात घटस्फोटाचे प्रकरण सुरू होते. यावरून दोन्ही कुटुंबात वाद सुरू होता.

पोलिसांच्या चौकशीत असे समोर आले आहे की, शेखर आणि अशोक यांच्यात जोरदार भांडण झाले आणि त्यानंतर शेखरने अशोक यांच्या डोक्यात दोन गोळ्या झाडल्या. गोळीबारानंतर घटनास्थळी प्रचंड गोंधळ उडाला. या गोंधळात शेखर घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाला. शेखरने या हल्ल्यासाठी परवानाधारक रिव्हॉल्व्हर वापरल्याचे समोर आले आहे.

पुढील बातम्या