Randeep Hooda: पारंपरिक मणिपुरी अंदाजात शोभून दिसली जोडी! रणदीप हुड्डाच्या लग्नाचा व्हिडीओ पाहिलात?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Randeep Hooda: पारंपरिक मणिपुरी अंदाजात शोभून दिसली जोडी! रणदीप हुड्डाच्या लग्नाचा व्हिडीओ पाहिलात?

Randeep Hooda: पारंपरिक मणिपुरी अंदाजात शोभून दिसली जोडी! रणदीप हुड्डाच्या लग्नाचा व्हिडीओ पाहिलात?

Published Nov 30, 2023 10:08 AM IST

Randeep Hooda Lin Laishram Wedding Video: रणदीप आणि लिन यांच्या या पारंपरिक लग्न सोहळ्यात त्यांचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित होते.

Randeep Hooda Lin Laishram Wedding Video
Randeep Hooda Lin Laishram Wedding Video

Randeep Hooda Lin Laishram Wedding Video: बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा आणि त्याची प्रेयसी लिन लैशराम आता विवाह बंधनात अडकले आहेत. बुधवारी २९ नोव्हेंबर रोजी मणिपूरमधील इंफाळमध्ये या दोघांनी पारंपारिक पद्धतीने विवाह रचला आहे. या लग्नसोहळ्यात दोघेही मणिपुरी पारंपरिक वधू-वरांच्या पोशाखात दिसले. या खास सोहळ्यासाठी रणदीप पांढऱ्या धोतर आणि कुर्त्यामध्ये मॅचिंग पगडी परिधान करून दिसला. तर, दुसरीकडे लिनही पारंपरिक मणिपुरी वधू वेशात दिसली. यासोबतच लिनने मेकअप आणि वजनदार दागिने घातले होते. या लूकमध्ये ती सुंदर दिसत होती.

लग्न सोहळा पार पडल्यानंतर लिन लैशराम आणि रणदीप हुड्डा याने त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर या सोहळ्यातील काही खास क्षण आणि लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव होत आहे. तसेच, चाहते दोघांनाही कमेंट्सच्या माध्यमातून लग्नासाठी आणि भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देत आहेत. त्यांच्या लग्नाचे सुंदर फोटो शेअर करताना दोघांनी एक सुंदर कॅप्शनही लिहिलं आहे.

रणदीप आणि लिन यांच्या या पारंपरिक लग्न सोहळ्यात त्यांचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित होते. दोघांनीही त्यांच्या इन्स्टाग्रामवर या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंना कॅप्शन देताना त्यांनी लिहिले की, 'आजपासून आम्ही एक आहोत. #JustMarried'. त्याचवेळी, दोघांचेही चाहतेही या पोस्टवर भरपूर कमेंट करत आहेत. चाहते दोघांना लग्नाच्या शुभेच्छा देत आहेत आणि दोघांचे खूप कौतुक करत आहेत.

नुकताच त्यांच्या लग्नाचा व्हिडीओही समोर आला आहे, ज्यामध्ये दोघेही मणिपुरी संस्कृतीनुसार लग्न करताना दिसले आहेत. या व्हिडीओलाही खूप पसंती मिळत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघेही मणिपूरमध्ये एक-दोन दिवस लग्नानंतरचे सर्व विधी पूर्ण करून मुंबईला परततील. यावेळी मुंबईत बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी रिसेप्शनचे आयोजन केले जाईल. याशिवाय अभिनेता रणदीप हुड्डा पत्नी लिनसह रोहतकमधील त्याच्या वडिलोपार्जित गावाला देखील भेट देऊ शकतो.

Whats_app_banner