मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Ranveer Singh: अरे स्क्रिप्ट तरी बदल ना भाऊ! जे दीपिकासाठी तेच अनुष्कासाठी कसं ?; रणवीर सिंह झाला ट्रोल!

Ranveer Singh: अरे स्क्रिप्ट तरी बदल ना भाऊ! जे दीपिकासाठी तेच अनुष्कासाठी कसं ?; रणवीर सिंह झाला ट्रोल!

Oct 27, 2023 05:17 PM IST

Ranveer Singh Viral Video: 'कॉफी विथ करण ८' या शोमध्ये अभिनेता रणवीर सिंह याच्याकडून एक अशी चूक झाली आहे, जिच्यामुळे तो जबरदस्त ट्रोल होत आहे.

Ranveer Singh Viral Video
Ranveer Singh Viral Video

Ranveer Singh Viral Video: बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण ही जोडी 'कॉफी विथ करण ८'मध्ये सहभागी झाल्यापासून चांगलीच चर्चेत आली आहे. या शोच्या मंचावर रणवीर आणि दीपिकाने त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. त्यांनी कॅमेरासमोर सांगितलेल्या काही गोष्टी तर, त्या एकमेकांसाठी देखील नव्या होत्या. मात्र, आता या शोमध्ये अभिनेता रणवीर सिंह याच्याकडून एक अशी चूक झाली आहे, जिच्यामुळे तो जबरदस्त ट्रोल होत आहे. नेटकऱ्यांनीच रणवीर सिंह याची ही चूक पकडली आहे. रणवीर सिंह यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये रणवीरसोबत अनुष्का शर्मा दिसत आहे.

'कॉफी विथ करण ८'च्या मंचावर रणवीर आणि दीपिका यांनी आपल्या प्रेमकहाणीची सुरुवात कशी झाली याबद्दल सांगितलं. यावेळी रणवीर सिंह याने एक खास किस्सा सांगितला. दीपिकाशी पहिली भेट झाली तेव्हा नेमकं काय घडलं हे सांगताना रणवीर म्हणालेला की, 'आमची पहिली भेट ही संजय लीला भन्साळी यांच्या घरी झाली होती. त्यावेळी मी आणि दीपिका संजय लीला भन्साळी यांच्या घरी जाणार होतो. मी आधीच त्यांच्या घरी जाऊन बसलो होतो. त्यावेळी दीपिकाने पांढऱ्या रंगाचा चिकनकारी कुर्ता परिधान केला होता. संजय लीला भन्साळी यांचे घर अगदी समुद्राशेजारी आहे. त्यामुळे दीपिकाने दरवाजा उघडताच तिचे केस हवेने भुरुभुरु उडू लागले होते. तिला असं पाहताच मनात लाडूच फुटले.' हा प्रसंग रणवीरने सांगताच अनेकांनी त्याचं कौतुक केलं.

ट्रेंडिंग न्यूज

Koffee with Karan: 'रामलीला'मध्ये किस करताना रणवीर-दीपिकाकडून झाली चूक! एकमेकांत इतके हरवले की...

मात्र, दुसऱ्याच दिवशी तो ट्रोल होऊ लागला. याला कारण ठरला रणवीर सिंहाचा एक जुना व्हिडीओ... यावेळी 'कॉफी विथ करण ८'मध्ये दीपिकाबद्दल सांगताना जे रणवीर म्हणाला तेच त्याने याआधी आणखी एका अभिनेत्रींसाठी म्हटलं होतं. 'कॉफी विथ करण'च्या एका जुन्या भागात रणवीर सिंह अनुष्का शर्मा हिच्यासोबत आला होता. त्यावेळी अनुष्काची चित्रपटासाठी निवड कशी झाली हे सांगताना त्याने हाच किस्सा सांगितला होता. यामध्ये दीपिकाच्या ऐवजी अनुष्का शर्मा होती आणि संजय लीला भन्साळी यांच्याऐवजी यशाचे ऑफिस होते. यामुळे आता रणवीर सिंह चांगलाच ट्रोल होत आहे.

रणवीर अनुष्कासाठी जे बोलला तेच दीपिकासाठी कसं बोलला? असं म्हणत नेटकाऱ्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. तर, रणवीरने किमान स्क्रिप्ट तरी बदलायला हवी होती, असे काही नेटकरी म्हणत आहेत. मात्र, ही चूक पकडली गेल्याने आता रणवीर सिंह ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे.

WhatsApp channel