मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  या म्हाताऱ्याला अडवून दाखवाच!; महेश मांजरेकर यांच्या 'जुनं फर्निचर' सिनेमाचा हृदयस्पर्शी ट्रेलर प्रदर्शित

या म्हाताऱ्याला अडवून दाखवाच!; महेश मांजरेकर यांच्या 'जुनं फर्निचर' सिनेमाचा हृदयस्पर्शी ट्रेलर प्रदर्शित

Aarti Vilas Borade HT Marathi

Apr 13, 2024, 08:49 AM IST

    • गेल्या काही दिवसांपासून अभिनेते महेश मांजरेकर यांचा 'जुनं फर्निचर' हा चित्रपट चर्चेत आहे. आता या चित्रपटाचा हृदयस्पर्शी ट्रेलर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर चर्चेत आहे.
या म्हाताऱ्याला अडवून दाखवाच!; महेश मांजरेकर यांच्या 'जुनं फर्निचर' सिनेमाचा हृदयस्पर्शी ट्रेलर प्रदर्शित

गेल्या काही दिवसांपासून अभिनेते महेश मांजरेकर यांचा 'जुनं फर्निचर' हा चित्रपट चर्चेत आहे. आता या चित्रपटाचा हृदयस्पर्शी ट्रेलर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर चर्चेत आहे.

    • गेल्या काही दिवसांपासून अभिनेते महेश मांजरेकर यांचा 'जुनं फर्निचर' हा चित्रपट चर्चेत आहे. आता या चित्रपटाचा हृदयस्पर्शी ट्रेलर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर चर्चेत आहे.

काय अपेक्षा आहेत आमच्या अशा त्यांच्याकडून... दिवसातून एकदा आमच्या खांद्यावरून हात फिरवून विचार ना की आई कशी आहेस तू? बाबा कसे आहात तुम्ही? मन सुन्न करणारे हे वाक्य नकळत डोळ्यांच्या कडा पाणावून टाकणारी आहेत. आपण अनेकदा पाहिले की वयस्कर व्यक्तींना आऊटडेटेड, अडगळीतले सामान अशी उपमा दिल्या जातात. परंतु याच सामानाची किंमत आणि ताकद काय आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न अभिनेते दिग्दर्शक मेहश मांजरेकर यांनी 'जुनं फर्निचर' या चित्रपटात केला आहे. या चित्रपटाचा हृदयस्पशी ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

नेमकी काय आहे ‘हीरामंडी’तील आदिती राव हैदरीने केलेली ‘गजगामिनी चाल’? कामसूत्राशी आहे कनेक्शन

‘बस करा आता... बंद करा मालिका’; अपर्णा आणि अर्जुनच्या ‘अप्पी आमची कलेक्टर’वर का वैतागले प्रेक्षक?

काय होतास तू... काय झालास तू.... ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम गुरुचरण सिंहची अवस्था बघून चाहते हळहळले!

कान्स फिल्म फेस्टिव्हलमधून परतताच ऐश्वर्या रायच्या हातावर शस्त्रक्रिया होणार! अभिनेत्रीला नेमकं काय झालंय?

काय आहे ट्रेलची कथा

'जुनं फर्निचर... या म्हाताऱ्याला अडवूनच दाखवा !" या चित्रपटाच्या २ मिनिटे ५४ सेकंदाच्या ट्रेलरमध्ये एक ज्येष्ठ नागरिक त्याच्या अस्तित्वावर भाष्य करताना दिसत आहे. मुलांप्रती असलेल्या कर्तव्यांमध्ये कधीही कमी पडणार याची चिंता सतत आईवडिलांना सतावत असते. परंतु तीच चिंता, काळजी, जबाबदारी आई वडिलांच्या म्हातारपणात मुले खरट बजावतात का? वृद्धापकाळात मुलांकडून चार प्रेमाचे शब्द ऐकण्याची इच्छा आई-वडिलांची असते. ती इच्छाही आजची पिढी पूर्ण करू शकत नसेल, तर आई वडिलांनी या वयात कोणाकडून प्रेमाची अपेक्षा करावी? लागणारी आर्थिक मदत कुठून मिळवावी? असे प्रश्न ट्रेलरच्या माध्यमातून विचारण्यात आले आहेत. आपल्या पोटच्या मुलावरच आईच्या मृत्यूचा आरोप गोविंद पाठक यांनी केला आहे. आता या प्रकरणाचा निकाल काय लागणार? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना चित्रपट पाहवा लागणार आहे.
वाचा: प्रेक्षकांना कसा वाटला अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांचा 'बडे मियां छोटे मियां' सिनेमा? वाचा रिव्ह्यू

कोणते कलाकार दिसणार

'जुनं फर्निचर' हा चित्रपट येत्या २६ एप्रिल रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. महेश वामन मांजरेकर दिग्दर्शित 'जुनं फर्निचर' या चित्रपटाची निर्मिती यतिन जाधव यांनी केली आहे. 'जुनं फर्निचर'सिनेमाची कथा, पटकथा, संवाद महेश वामन मांजरेकर यांनी लिहिले आहेत. तसेच सिनेमात महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर, भूषण प्रधान, अनुषा दांडेकर, समीर धर्माधिकरी, डॉ. गिरीश ओक, विजय निकम, संतोष मिजगर, अलका परब, शरद पोंक्षे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
वाचा: ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी सलमान खान याच्या घराबाहेर जमलेल्या चाहत्यांवर लाठीचार्ज

महेश वामन मांजरेकर दिग्दर्शित 'जुनं फर्निचर' या सिनेमाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच दिमाखात पार पडला. हा सोहळा अधिक रंगतदार होण्यासाठी वैभव जोशी यांच्या 'सोबतीचा करार' या संगीत मैफलचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी स्वप्नील बांदोडकर, केतकी माटेगावकर व पवनदीप राजन यांनी सहभाग घेतला होता. यावेळी महेश मांजरेकर यांनी स्वत: 'काय चुकले सांग ना?' या मनाला स्पर्शून जाणाऱ्या गाण्याच्या काही ओळी गायल्या आहेत.
वाचा: 'आजकाल केवळ दिखावा आणि फायद्यासाठी कलाकार लग्न करत आहेत', नोरा फतेही हिचे खळबळजनक विधान

पुढील बातम्या