मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Maharashtra Shahir: सह्याद्रीचा सिंह आहे, पिंजऱ्यात अडकणार नाही... ‘महाराष्ट्र शाहीर’चा दमदार ट्रेलर पाहिला का?

Maharashtra Shahir: सह्याद्रीचा सिंह आहे, पिंजऱ्यात अडकणार नाही... ‘महाराष्ट्र शाहीर’चा दमदार ट्रेलर पाहिला का?

Apr 12, 2023, 10:50 AM IST

  • Maharashtra Shahir trailer released: ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटातून मराठी मनोरंजन विश्वातील अनेक दिग्गज कलाकारांची फौज मोठ्या पडद्यावर एकत्र पाहायला मिळणार आहे.

Maharashtra Shahir

Maharashtra Shahir trailer released: ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटातून मराठी मनोरंजन विश्वातील अनेक दिग्गज कलाकारांची फौज मोठ्या पडद्यावर एकत्र पाहायला मिळणार आहे.

  • Maharashtra Shahir trailer released: ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटातून मराठी मनोरंजन विश्वातील अनेक दिग्गज कलाकारांची फौज मोठ्या पडद्यावर एकत्र पाहायला मिळणार आहे.

Maharashtra Shahir: शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधरित चित्रपट ‘महाराष्ट्र शाहीर’ची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील काही गाणी या आधीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. यानंतर आता ‘महाराष्ट्र शाहीर’चा दमदार ट्रेलर देखील रिलीज करण्यात आला आहे. या ट्रेलरमध्ये चित्रपटाची एक झलक पाहायला मिळाली असून, आता हा चित्रपट मोठ्या पडद्यावर नक्कीच यश मिळवेल, असे प्रेक्षक म्हणत आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा पार पडला.

ट्रेंडिंग न्यूज

निशी आणि नीरजला वेगळं करण्याचा मेघनाचा डाव सफल होणार? ‘सारं काही तिच्यासाठी’मध्ये येणार ट्वीस्ट

अभिरामच्या नावाची हळद अखेर लीलालाच लागणार! ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत आज काय घडणार?

ओटीटीवर पुन्हा 'स्कॅम' होणार! १९९२मध्ये हर्षद मेहता, २००३मध्ये तेलगी; आता २०१०च्या घोटाळ्याची फाईल उघडणार!

‘मंजू माई’ निघाली कान्सला! मराठी चित्रपट ते थेट कान फिल्म फेस्टिव्हलचा प्रवास करणारी छाया कदम!

या चित्रपटातून मराठी मनोरंजन विश्वातील अनेक दिग्गज कलाकारांची फौज मोठ्या पडद्यावर एकत्र पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत चित्रपटातील प्रत्येक पात्र पोस्टरच्या माध्यमातून रिव्हील करण्यात आले होते. शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित या चीत्र्पाची निर्मिती त्यांचे नातू अर्थात प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक केदार शिंदे करत असून, या चित्रपटामध्ये अभिनेता अंकुश चौधरी शाहीर साबळे यांची भूमिका साकरताना दिसत आहे. ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाला अजय अतुल यांनी संगीत दिलं आहे.

‘,महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटातील अनेक गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. या चित्रपटाची गाणी जितकी श्रवणीय आहेत, तितकेच या चित्रपटातील संवाद देखील दमदार असल्याचे या ट्रेलरवरून लक्षात आले आहे. ‘सह्याद्रीचा सिंह आहे, पिंजऱ्यात नाही अडकवू शकत आपण...’, 'आम्ही कलाकार आहोत पण कुणाचे मिंधे नाहीत..' असे दमदार संवाद या ट्रेलरमध्ये ऐकू येत आहेत. या चित्रपटातून ‘येळकोट येळकोट जय मल्हार’, ‘जेजुरीच्या खंडेराया जागराला या या’, ‘आगंगंगं इंचू चावला...’ अशी विविध प्रकारातील शाहिरांनी गायलेली गाणी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. अजय-अतुल या संगीतकार जोडीने शाहिरांच्या संगीत कारकिर्दीला पूर्ण न्याय दिला आहे. त्यांची ही विविधांगी गाणी पडद्यावर रसिकांसाठी एक आगळी पर्वणीच ठरणार आहे.

शाहीर साबळे यांचे भारतीय स्वातंत्र्य चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मोठे योगदान होते. लोककलेच्या माध्यमातून त्यांनी राष्ट्र आणि राज्याभिमान जागविण्याचे काम केले. या कार्याच्या माध्यामतून ते अनेक जाज्ज्वल्य प्रतिभा असलेल्या मान्यवरांच्या सानिध्यात आले. ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाच्या निमित्ताने यातील काही व्यक्तिमत्त्वे रुपेरी पडद्यावर अवतरणार आहेत. २८ एप्रिल रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

पुढील बातम्या