मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Merry Christmas Review : प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरलाय का ‘मेरी ख्रिसमस’? वाचा रिव्ह्यू...

Merry Christmas Review : प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरलाय का ‘मेरी ख्रिसमस’? वाचा रिव्ह्यू...

Jan 12, 2024, 06:42 PM IST

  • Merry Christmas Review: ‘मेरी ख्रिसमस’ या चित्रपटाच्या निमित्ताने विजय सेतुपती आणि कतरिना कैफ ही नवी कोरी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Merry Christmas Movie Review

Merry Christmas Review: ‘मेरी ख्रिसमस’ या चित्रपटाच्या निमित्ताने विजय सेतुपती आणि कतरिना कैफ ही नवी कोरी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

  • Merry Christmas Review: ‘मेरी ख्रिसमस’ या चित्रपटाच्या निमित्ताने विजय सेतुपती आणि कतरिना कैफ ही नवी कोरी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Merry Christmas Review: बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि साऊथ सुपरस्टार विजय सेतुपती यांचा ‘मेरी ख्रिसमस’ हा चित्रपट आज प्रेक्षकांच्या भेटीला आहे. या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चा सुरू होती. अखेर प्रेक्षकांची हीच उत्सुकता आज शमणार आहे. ‘मेरी ख्रिसमस’ या चित्रपटाच्या निमित्ताने विजय सेतुपती आणि कतरिना कैफ हि नवी कोरी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. 'मेरी ख्रिसमस' थ्रिलर, मर्डर मिस्ट्री, सस्पेन्स ड्रामा आणि अनेक ट्विस्ट असे एक रंजक मिश्रण आहे. 'अंधाधुन'च्या श्रीराम राघवन यांनी 'मेरी ख्रिसमस' प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. श्रीराम राघवन यांचा हातखंड ‘मेरी ख्रिसमस’मध्ये देखील पाहायला मिळाला आहे. चला तर जाणून घेऊया कसा आहे हा चित्रपट...

ट्रेंडिंग न्यूज

सावनीने आखला नवा डाव! मुक्ता करेल का सागर आणि आदित्यला माफ? 'प्रेमाची गोष्ट'मध्ये काय होणार जाणून घ्या

उत्कर्ष शिंदे आणि गौतमी पाटील यांचा अल्बम पाहिलात का? सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ

अभिनेत्री मलायका अरोराने वांद्रे येथील घर दिले भाडे तत्त्वावर, जाणून घ्या किती आहे भाडे?

Cinema Hall Shut Down : मोठी बातमी! आजपासून दहा दिवस चित्रपटगृहे राहणार बंद, काय आहे कारण? जाणून घ्या

काय आहे कथानक?

'मेरी ख्रिसमस' या चित्रपटाची कथा २४ डिसेंबरच्या रात्री म्हणजेच नाताळच्या आदल्या दिवशी घडत आहे. ख्रिसमसच्या रात्री, अल्बर्ट (विजय सेतुपती) नावाचा मुलगा सात वर्षांनी मुंबईला परतून येतो. यावेळी तो त्याच्या शेजाऱ्याला भेटतो आणि नंतर काही वेळाने ख्रिसमस साजरा करण्यासाठी घराबाहेर पडतो. एका रेस्टॉरंटमध्ये अल्बर्टला मारिया (कतरिना कैफ) नावाची मुलगी तिच्या मुलीसोबत एकटी बसलेली दिसते. अल्बर्ट मारियाचा पाठलाग करतो आणि नंतर तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो. हळूहळू ते दोघे एकमेकांचे मित्र बनतात आणि मारिया त्याला ख्रिसमससाठी तिच्या घरी आमंत्रित करते. ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला, अल्बर्ट आणि मारिया खूप डान्स करतात, ड्रिंक्स करतात आणि आपल्या भूतकाळाबद्दल बोलतात. मात्र, या दरम्यान असे काहीतरी घडते, ज्यामुळे त्यांचे आयुष्य कायमचे बदलून जाते.

Shruti Marathe: ‘राधा ही बावरी’ फेम अभिनेत्री श्रुती मराठेने सांगितला कास्टिंग काऊचचा भयानक अनुभव! म्हणाली...

कसा आहा कलाकारांचा अभिनय?

‘मेरी ख्रिसमस’ हा चित्रपट पाहताना अभिनेता विजय सेतुपती एखादं पात्र साकारतोय असं अजिबात वाटत नाही. तो स्वतःच या कथेचा नायक असल्यासारखे वाटते. त्याचे डायलॉग्स, वन लाइनर्स, एक्सप्रेशन्स… सगळेच अप्रतिम आहे. विजयसोबत कतरिनानेही उत्कृष्ट काम केले आहे. पण, तिला विजयची बरोबरी करता आलेली नाही. याशिवाय संजय कपूर, टिनू आनंद, विनय पाठक, अश्विनी काळसेकर आणि प्रतिमा काझमी यांनीही आपापल्या भूमिका चांगल्या साकारल्या आहेत. चित्रपटाचं कथानक आणि त्यातील बारकावे प्रेक्षकांना शेवटपर्यंत खुर्चीला खिळवून ठेवणारे आहेत.

का बघाल चित्रपट?

तुम्हाला चांगला कंटेंट पाहायचा असेल, तर तुम्ही एकदा 'मेरी ख्रिसमस' नक्कीच पाहू शकता. या चित्रपटाची कथा तुम्हाला तुमच्या जागेवरून नक्कीच हलू देणार नाही. या चित्रपटाचा क्लायमॅक्स आउट ऑफ द बॉक्स आहे. तेव्हा या चित्रपटात नक्की काय आहे, हे जाणून घेण्यासाठी हा चित्रपट नक्की बघा.

पुढील बातम्या