मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  OTT This Week: ओटीटीवर सस्पेन्स अन् रोमान्सचा दुहेरी तडका! वीकेंडला नक्की बघा ‘हे’ नवे चित्रपट आणि सीरिज

OTT This Week: ओटीटीवर सस्पेन्स अन् रोमान्सचा दुहेरी तडका! वीकेंडला नक्की बघा ‘हे’ नवे चित्रपट आणि सीरिज

Jan 12, 2024 10:42 AM IST

OTT Releases This Week: नेटफ्लिक्स, हॉटस्टार आणि प्राईम व्हिडीओसारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे नवेकोरे चित्रपट आणि वेब सीरिज पाहू शकता.

OTT Releases This Week
OTT Releases This Week

OTT Releases This Week: या आठवड्यात ओटीटीवर पाच नवीन चित्रपट आणि वेब सीरिज रिलीज झाल्या आहेत. यातील काही थ्रिलर आहेत, तर काही रोमँटिक कॉमेडी आहेत. या छान गुलाबी थंडीच्या वातावरणात तुम्हाला कुठेही बाहेर जायची इच्छा नसेल, तर तुम्ही मस्त तुमच्या बेडवर लोळत या नव्या चित्रपटांचा आणि वेब सीरिजचा आनंद घेऊ शकता. नेटफ्लिक्स, हॉटस्टार आणि प्राईम व्हिडीओसारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे चित्रपट आणि वेब सीरिज पाहू शकता.

किलर सूप

नेटफ्लिक्सची वेब सीरिज 'किलर सूप'ची कथा स्वाती शेट्टी (कोंकणा सेन शर्मा) भोवती फिरते. या डार्क कॉमेडी क्राईम थ्रिलर सीरिजमध्ये मनोज बाजपेयी दुहेरी भूमिकेत दिसत आहे. यात त्याने स्वाती शेट्टीचा पती प्रभाकर आणि तिचा प्रियकर उमेश अशा दुहेरी भूमिका साकारल्या आहेत. मात्र, या कथेत ट्विस्ट येतो, जेव्हा प्रभाकरचा मृत्यू होतो. पुढे ही कथा अधिक रंजक होते.

द लीजेंड ऑफ हनुमान सीझन ३

'द लीजेंड ऑफ हनुमान सीझन ३' आज म्हणजेच १२ जानेवारीला डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रसारित होणार आहे. हा या सीरिजचा तिसरा सीझन आला आहे. या अॅनिमेटेड वेब सीरिजमध्ये रावण आणि भगवान हनुमान यांची कथा दाखवण्यात आली आहे. 'द लीजेंड ऑफ हनुमान' पहिला आणि दुसरा सीझन जगभरात गाजला होता.

ट्रेंडिंग न्यूज

Merry Christmas Movie: ‘मेरी ख्रिसमस’ ठरणार कतरिना कैफचा सगळ्यात कमी ओपनिंग करणारा चित्रपट?

इको

मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्स टीव्ही सीरिजचा १०वा भाग डिस्ने प्लस हॉटस्टारवर नुकताच रिलीज झाला आहे. या भागाचे नाव 'इको' आहे. सीरिजचा हा १० भाग मेरिकन माया लोपेझवर आधारित आहे. माया लोपेझ ही तिच्या भूतकाळाशी जुळवून घेताना, अनेक आव्हानांना सामोरी जाणार आहे.

रोल प्ले

‘रोल प्ले’ हा प्राईम व्हिडीओवरील अमेरिकन अ‍ॅक्शन कॉमेडी चित्रपट आहे. एम्मा (कॅली कुओको) आणि डेव्ह (डेव्हिड ओयेलोवो) हे त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रोल प्ले करण्याचे ठरवतात. पण, रोल-प्ले दरम्यान डेव्हला एम्माबद्दल अशा अनेक गोष्टी कळू लागतात, त्यामुळे कथेत पुढे अनेक ट्विस्ट येतात.

किलर्स ऑफ द फ्लॉवर मून

अमेरिकन चित्रपट 'किलर्स ऑफ द फ्लॉवर मून' अ‍ॅप्पल टीव्ही प्लसवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची कथा १९२०च्या ओक्लाहोमावर आधारित आहे.

WhatsApp channel