मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Jubin Nautiyal: रुग्णालयातून फोटो शेअर करत जुबिन नौटियालने दिली हेल्थ अपडेट; म्हणाला...

Jubin Nautiyal: रुग्णालयातून फोटो शेअर करत जुबिन नौटियालने दिली हेल्थ अपडेट; म्हणाला...

Dec 03, 2022, 09:06 AM IST

    • Jubin Nautiyal: घरात घसरून पडल्यामुळे जुबिन गंभीर जखमी झाला होता. त्याच्या हाताला, डोक्याला आणि बरगड्यांना गंभीर दुखापत झाली होती.
Jubin Nautiyal

Jubin Nautiyal: घरात घसरून पडल्यामुळे जुबिन गंभीर जखमी झाला होता. त्याच्या हाताला, डोक्याला आणि बरगड्यांना गंभीर दुखापत झाली होती.

    • Jubin Nautiyal: घरात घसरून पडल्यामुळे जुबिन गंभीर जखमी झाला होता. त्याच्या हाताला, डोक्याला आणि बरगड्यांना गंभीर दुखापत झाली होती.

Jubin Nautiyal: आपल्या सुमधुर गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा गायक जुबिन नौटियाल सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. घरातील शिड्यांवरून घसरून पडल्यामुळे जुबिन गंभीर जखमी झाला होता. त्याच्या हाताला, डोक्याला आणि बरगड्यांना गंभीर दुखापत झाली होती. या अपघातानंतर जुबिनला तत्काळ मुंबईतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मीडिया रिपोर्टनुसार जुबिनच्या हातावर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली आहे. मात्र, आता स्वतःचा एक फोटो शेअर करत गायक जुबिन नौटियालने चाहत्यांना आपल्या तब्येतीची माहिती दिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

२५ दिवसांनंतर ‘सोढी’ घरी परतला! नक्की कुठे गेला होता अभिनेता गुरुचरण सिंह?

‘बाजीराव मस्तानी’साठी संजय लीला भन्साळी यांनी अलका कुबल यांना का नाकारलं? अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा!

पुन्हा एकदा ‘सायली’ आणि ‘कला’ने मारली बाजी! पाहा या आठवड्याचा मराठी मालिकांचा TRP Report

‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णी हिला कसा मिळाला होता पहिला चित्रपट? वाचा अभिनेत्रीविषयी काही भन्नाट गोष्टी!

जुबिनला आता हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्याच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे. याची माहिती त्याने स्वतःच चाहत्यांना दिली आहे. जुबिनने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर नुकताच एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो हॉस्पिटलच्या बेडवर बसलेला दिसत आहे. त्याच्या एका हाताला पट्टा बांधण्यात आला असून, तो जेवताना दिसत आहे. हा फोटो शेअर करत आता आपण बरे असल्याचे त्याने म्हटले आहे.

या फोटोसोबत जुबिनने एक कॅप्शन देखील लिहिले आहे. यात त्याने म्हटले की, ‘तुम्हा सगळ्यांच्या प्रर्थानांसाठी खूप खूप आभारी आहे. इतक्या मोठ्या आणि गंभीर अपघातातून वाचलो, ही देवाचीच कृपा. मला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला असून, मी आता रिकव्हर होत आहे. तुमच्या प्रार्थना आणि प्रेम यासाठी मनापासून धन्यवाद’.

गायक जुबिन नौटियालच्या या फोटोवर चाहते आणि बॉलिवूड सेलेब्स कमेंट करून त्याला लवकर बरे वाटावे म्हणून प्रार्थना करत आहे. जुबिन नौटियाल हा बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक आहे. त्याने आपल्या गाण्यांनी रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आहे. ‘रातां लंबियां’, ‘लुट गए’, ‘हमनवा मेरे’, ‘तुझे कितने चाहने लगे हम’, ‘तुम ही आना’, ‘बेवफा तेरा मासूम चेहरा’ या त्याच्या गाण्यांनी जगभरात लोकप्रियता मिळवली आहे. नुकत्याच आलेल्या ‘थँक गॉड’ या चित्रपटाच्या गाण्यांमध्ये त्याचा आवाज ऐकायला मिळाला. तर, विकी कौशलच्या ‘गोविंदा नाम मेरा’मध्ये देखील जुबिनच्या आवाजातील गाणी असणार आहेत.

विभाग

पुढील बातम्या