मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Jubin Nautiyal:'माझी आई...', देशद्रोहाच्या आरोपानंतर जुबिन नौटियालची प्रतिक्रिया

Jubin Nautiyal:'माझी आई...', देशद्रोहाच्या आरोपानंतर जुबिन नौटियालची प्रतिक्रिया

Aarti Vilas Borade HT Marathi
Sep 13, 2022 12:09 PM IST

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर #ArrestJubinNautiyal ट्रेंड होताना दिसत होतं. आता जुबिनने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

जुबिन नौटियाल
जुबिन नौटियाल (HT)

बॉलिवूडमधील लोकप्रिय गायकांपैकी एक गायक म्हणजे जुबिन नौटियाल. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर त्याच्यावर देशद्रोहाचा आरोप करुन अटकेची मागणी केली जात होती. त्यासोबतच #ArrestJubinNautiyal ट्रेंड होताना दिसत होता. आता जुबिनने यावर प्रतिक्रिया दिली आहे. या सर्वामुळे त्याच्या आईवर परिणाम झाला असल्याचे त्याने सांगितले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

जुबिनने नुकतीच 'आजतक'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. सध्या सोशल मीडियावर सुरु असलेल्या गोष्टींमुळे त्याच्या कुटुंबावर देखील परिणाम झाला. जुबिनची आई नैराश्याचा सामना करत आहे.
आणखी वाचा : माणसाच्या कर्माचा जाब देवीबी विचारते; श्रेयस तळपदेच्या आपडीथापडीचा टीझर प्रदर्शित

'मी अनेक वर्षे मेहनत करुन नाव, ही प्रसिद्धी मिळवली आहे. लोकांना एका झटक्यात त्यावर पाणी फिरवले. अनेक खोट्या गोष्टींवर ते विश्वास ठेवू लागले. त्यांच्या माहितीनुसार, माझा शो ऑगस्टमध्ये रद्द करण्यात आला. कॉन्सर्ट त्यांच्या मॅनेजमेंट किंवा प्रमोटर हरजिंदर सिंह यांच्यामध्ये होता. त्यांनी या अफवा कशा सुरु झाल्या याची चाचणी केली नाही' असे जुबिन नौटियाल.

पुढे मुलाखतीमध्ये आईविषयी बोलताना जुबिन म्हणाला, 'या सर्व गोष्टींचा माझ्या आईवर खूप परिणाम झाला आहे. ती नैराश्याचा सामना करत आहे. काहींनी पैसे देऊन हे ट्विटरवर करुन घेतले आहे. त्यांना कोणीही जाब विचारला नाही. मला देशद्रोही असल्याचे ठरवले.'

जुबिनने ट्वीट देखील केले. 'हॅलो ट्विटर कुटुंबीय आणि माझ्या मित्रांनो. मी पुढचा संपूर्ण महिना शुटिंगमध्ये व्यग्र असणार आहे. सर्वांना विनंती करतो की अफवांवर विश्वास ठेवू नका. माझे माझ्या देशावर खूप प्रेम आहे आणि तुमच्या सर्वांवर सुद्धा' या आशयाचे ट्वीट जुबिनने केले आहे.

IPL_Entry_Point

विभाग