मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  बॉलिवूड अभिनेता संजय दत्त लढणार लोकसभा निवडणूक? स्वत: प्रतिक्रिया देत केला खुलासा

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त लढणार लोकसभा निवडणूक? स्वत: प्रतिक्रिया देत केला खुलासा

Aarti Vilas Borade HT Marathi

Apr 08, 2024, 08:42 PM IST

    • सध्या बॉलिवूड अभिनेता संजय दत्त हा निवडणूकीच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. आता स्वत: संजय दत्तने माहिती देत यावर पूर्णविराम दिला आहे.
बॉलिवूड अभिनेता संजय दत्त लढणार निवडणूक? स्वत: प्रतिक्रिया देत केला खुलासा

सध्या बॉलिवूड अभिनेता संजय दत्त हा निवडणूकीच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. आता स्वत: संजय दत्तने माहिती देत यावर पूर्णविराम दिला आहे.

    • सध्या बॉलिवूड अभिनेता संजय दत्त हा निवडणूकीच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. आता स्वत: संजय दत्तने माहिती देत यावर पूर्णविराम दिला आहे.

आगामी लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना राज्यातील जवळपास सर्वच मतदारसंघात उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. काही मतदारसंघातील एक उमेदवार ठरला आहे तर विरोधी उमेदवार ठरणे अद्याप बाकी आहे. अशातच बॉलिवूड अभिनेता संजय दत्त निवडणूकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा रंगली आहे. यावर स्वत: संजय दत्तने प्रतिक्रिया देत चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

२५ दिवसांनंतर ‘सोढी’ घरी परतला! नक्की कुठे गेला होता अभिनेता गुरुचरण सिंह?

‘बाजीराव मस्तानी’साठी संजय लीला भन्साळी यांनी अलका कुबल यांना का नाकारलं? अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा!

पुन्हा एकदा ‘सायली’ आणि ‘कला’ने मारली बाजी! पाहा या आठवड्याचा मराठी मालिकांचा TRP Report

‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णी हिला कसा मिळाला होता पहिला चित्रपट? वाचा अभिनेत्रीविषयी काही भन्नाट गोष्टी!

काही मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की, संजय दत्त हा हरियाणामधून लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे. माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या विरोधात काँग्रेस पक्षातून संजय दत्त निवडणूक लढण्याची शक्यता आहे. यावर संजय दत्तने कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. नुकताच त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.
वाचा: 'या' नाटकाच्या १००व्या प्रयोगासाठी अभिनेत्री प्रिया बापट हिने गायले गाणे, पाहा व्हिडीओ

काय आहे संजय दत्तचे ट्विट?

'मी एखाद्या राजकीय पक्षात प्रवेश करत असल्याच्या चर्च मला संपवायच्या आहेत. मी राजकारणात प्रवेश करत नाही. जर मला राजकारणात प्रवेश करायचा असेल तर मी त्याबाबत नक्की घोषणा करेन. माझ्याविषयी ज्या चर्चा सुरु आहेत कृपया त्यावर विश्वास ठेवू नका' या आशयाची पोस्ट संजय दत्तने सोशल मीडिया अकाऊंटवर केली आहे.
वाचा: नियंत्रण सुटल्यामुळे सुपरस्टार अजित कुमार याच्या गाडीचा भीषण अपघात, व्हिडीओ आला समोर

संजय दत्तचे राजकारणाशी संबंध

संजय दत्तचे कुटुंबीय हे राजकारणात अनेकदा सहभागी झाले आहेत. त्यामुळे पुढे जाऊन संजय दत्त देखील राजकारणात प्रवेश करु शकतो असे म्हटले जात आहे. संजय दत्तचे वडील सुनील दत्त हे यूपीए सरकारमध्ये मंत्री होते. काँग्रेस पक्षातून त्यांनी उत्तर आणि पश्चिम मुंबईतून जवळपास ५ वेळा निवडणूक लढवली आहे. या निवडणूकांमध्ये त्यांना योग्य ते यश देखील मिळाले आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांची मुलगी प्रिया दत्तने राजकारणात प्रवेश केला होता. त्यामुळे संजय दत्त देखील राजकारणात प्रवेश करणार अशा चर्चा रंगल्या होत्या.
वाचा: शाहरुख, सलमान आणि आमिरही आम्हाला घाबरतात; पाकिस्तानी अभिनेत्रीचे खळबळजनक वक्तव्य

संजय दत्तच्या कामाविषयी

संजय दत्त लवकरच बाप आणि वेलकम टू द जंगल या दोन चित्रपटांमध्ये दिसणार आहे. हे दोन्ही चित्रपट कॉमेडी आहेत. त्यापूर्वी तो जवान या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसला होता.

विभाग

पुढील बातम्या