मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  'या' नाटकाच्या १००व्या प्रयोगासाठी अभिनेत्री प्रिया बापट हिने गायले गाणे, पाहा व्हिडीओ

'या' नाटकाच्या १००व्या प्रयोगासाठी अभिनेत्री प्रिया बापट हिने गायले गाणे, पाहा व्हिडीओ

Aarti Vilas Borade HT Marathi
Apr 08, 2024 01:42 PM IST

अभिनेत्री प्रिया बापट हिची निर्माती असलेल्या नाटकाचे १०० प्रयोग पूर्ण झाले आहेत. त्यानिमित्ताने प्रिया बापट हिने गाणे गायले आहे. तिच्या गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

'या' नाटकाच्या १००व्या प्रयोगासाठी अभिनेत्री प्रिया बापट हिने गायले गाणे, पाहा व्हिडीओ
'या' नाटकाच्या १००व्या प्रयोगासाठी अभिनेत्री प्रिया बापट हिने गायले गाणे, पाहा व्हिडीओ

लाल मखमली पडदा, मोठा रंगमंच, स्पॉट लाइट, नेपथ्याची लगबग, संगीतय बॅकग्राऊंड, कलाकारांची लगबग, तिसरी घट्टा आणि नाटक पाहण्यासाठी आलेले मायबाप प्रेक्षक हे सुखद चित्र केवळ नाट्यगृहात पाहायला मिळते. गेल्या काही वर्षांपासून मनोरंजन व प्रबोधन यांची सांगड घालत नाटक संस्कृतीचा वारसा मनोरंजन विश्वात रुजत आहे. या सगळ्या रुजलेल्या बीजाची फांदी म्हणजे मराठी नाटक. मराठी रंगभूमीला अनेक शतकांचा इतिहास लाभला आहे. अनेक वेगवेगळी नाटके आजलाल येताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेले 'जर तर ची गोष्ट' या नाटकावर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केले. आता या नाटकासाठी अभिनेत्री प्रिया बापटने गाणे गायले आहे. हो तुम्ही बरोबर ऐकताय. प्रियाचे हे गाणे सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

जवर ‘जर तर ची गोष्ट’ या नाटकावर प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम केले आहे. प्रत्येकवेळी नाट्यगृहाबाहेर हा नाटकासाठी ‘हाऊसफुल्ल’चा बोर्ड लावण्यात आला. नाट्यरसिकांच्या या प्रेमामुळेच हे नाटक ‘शंभरी’ प्रयोगांचा पल्ला पार करताना दिसत आहे. नुकताच या नाटकाचा शतक महोत्सव साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने या नाटकातील गाणेही प्रदर्शित करण्यात आले आहे. प्रिया बापटच्या आवाजातील हे सुंदर गीत नात्यातील गुपित दर्शवणारे आहे. हे गाणे संगीतप्रेमींना कुठेही ऐकता येणार आहे.
वाचा: नियंत्रण सुटल्यामुळे सुपरस्टार अजित कुमार याच्या गाडीचा भीषण अपघात, व्हिडीओ आला समोर

‘जर तर ची गोष्ट’ नाटकाविषयी

अभिेत्री प्रिया बापट आणि अभिनेता उमेश कामत हे मराठी इंडस्ट्रीतील सर्वांचे आवडते कपल आहेत. त्यामुळे त्यांना एकत्र पाहाण्याची चाहत्यांची गेल्या काही दिवसांपासून इच्छा होती. सुमारे एका दशकानंतर प्रेक्षकांची ही इच्छा ‘जर तर ची गोष्ट’च्या निमित्ताने पूर्ण झाली. हे नाटक अतिशय लोकप्रिय आहे. या नाटकाने यशाचे शिखर गाठले असून सर्व वयोगटाला आवडणार हे नाटक ठरत आहे. हे एक कौटुंबिक नाटक असल्याने प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकवर्ग या नाटकाला लाभला आहे. खरं तर हीच या नाटकाची जमेची बाजू ठरत असल्याचे दिसत आहे. या नाटकात अभिनेत्री प्रिया बापट, उमेश कामत, आशुतोष गोखले, पल्लवी अजय हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. कथा, दिग्दर्शन, कलाकार हे सगळे उत्तम जुळून आल्यानेच ही सर्वोत्कृष्ट कलाकृती आज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
वाचा: शाहरुख, सलमान आणि आमिरही आम्हाला घाबरतात; पाकिस्तानी अभिनेत्रीचे खळबळजनक वक्तव्य

प्रियाने मानले चाहत्यांचे आभार

या नाटकाबद्दल प्रिया बापट मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. "खरंतर सांगताना मला खरंच खूप आनंद होतोय की, आज आमच्या नाटकाच्या शंभराव्या प्रयोगचा टप्पा गाठला आहे. इतर नाटकाच्या प्रयोगांप्रमाणेच हा प्रयोगही हाऊसफुल्ल होत आहे. एकाच वेळी अनेक भावना मनात आहेत. आनंद आहे, भारावले आहे, जबाबदारी आहे या सगळ्या गोष्टी शब्दांत मांडणे अशक्यच आहे. परंतु एक आवर्जून सांगेन, हा पल्ला गाठणे, रसिकप्रेक्षकांच्या प्रेमामुळेच शक्य झाले आहे. तुमचे प्रेम आमच्यावर असेच कायम राहू द्या. या नाटकातील आता गाणेही प्रदर्शित झाले आहे. त्यामुळे ही तुमच्यासाठी डबल ट्रीट आहे" असे प्रिया म्हणाली.

 

IPL_Entry_Point