मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  शाहरुख, सलमान आणि आमिरही आम्हाला घाबरतात; पाकिस्तानी अभिनेत्रीचे खळबळजनक वक्तव्य

शाहरुख, सलमान आणि आमिरही आम्हाला घाबरतात; पाकिस्तानी अभिनेत्रीचे खळबळजनक वक्तव्य

Aarti Vilas Borade HT Marathi
Apr 05, 2024 11:38 AM IST

एका पाकिस्तानी अभिनेत्री आणि गायिकने खळबळजनक वक्तव्य केले आहे. तिने शाहरुख, सलमान आणि आमिरही आम्हाला घाबरतात असे म्हणत सर्वाचे लक्ष वेधले आहे.

शाहरुख, सलमान आणि आमिरही आम्हाला घाबरतात; पाकिस्तानी अभिनेत्रीचे खळबळजनक वक्तव्य
शाहरुख, सलमान आणि आमिरही आम्हाला घाबरतात; पाकिस्तानी अभिनेत्रीचे खळबळजनक वक्तव्य

बॉलिवूडमध्ये आजवर अनेक पाकिस्तानी कलाकारांना काम करण्याची संधी दिली आहे. त्यामध्ये माहिरा खान, फवाद खान, सबा कमर आणि इमरान अब्बास अशा अनेक कलाकारांची नावे आहेत. इतकच नाही तर बॉलिवूडमध्ये कलाकरांसोबत गायकांनाही संधी देण्यात आली आहे. मात्र, २०१९मध्ये झालेल्या पुलवामा अटॅकनंतर ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशने पाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूडमध्ये काम करण्यावर बंदी आणली. त्यानंतर अनेक वादविवाद झाले. आता एका पाकिस्तानी अभिनेत्रीने खळबळजनक वक्तव्य केले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

पाकिस्तानी अभिनेत्री नादिया खान ही तिच्या बिनधास्त वक्तव्यांसाठी विशेष ओळखली जाते. तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती बोलताना दिसत आहे की, 'आमचे कलाकार भारतात लोकप्रिय आहेत. फवाद खानसारखे कलाकार तिकडे जाऊन काम करायला लागले तर तेथील कलाकार हे इनसिक्योअर झाले. त्यांनी हा राजकिय विषय म्हणत आमच्या कलाकारांवर बंदी आणली. यामध्ये राजकारणी फारसे सहभागी नव्हते. केवळ तेथील टॉप कलाकार घाबरले. त्यांना भीती होती की चित्रपट मिळणार नाहीत. कारण तेथील जनता आमचा अभिनय पाहून वेडी होणार हे नक्की होते. आम्ही चांगला अभिनय करतो ना की बॉडी दिखावा. त्यांना कळाले होते आम्हाला अभिनय जमतो, योग्य डायलॉग डिलिवरी जमते. त्यामुळे त्यांनी आम्हाला घाबरुन बॅन केले.'
वाचा: २० वर्षांत बायकोला किती पैठण्या दिल्या?; आदेश बांदेकर यांनी दिलेल्या उत्तराने वेधले सर्वांचे लक्ष

पाकिस्तानी कलाकारांमुळे खान इनसिक्युओर

पुढे या व्हिडीओमध्ये नादिया बोलत आहे की, "भारतीय जनता आमच्या कलाकारांवर प्रेम करते. ही गोष्ट वहाज अली आणि बिलाल अब्बास खानने सिद्ध करुन दाखवले. भारतीय प्रेक्षकांचे त्यांना प्रेम मिळत आहे. भारतात हे कलाकार व्हायरल होत आहेत. त्यांची फॅन फॉलोइंग किती आहे याचा अंदाज तुम्हाला येणार नाही. त्यामुळे बॉलिवूडमधील खान इनसिक्योओर झाले. त्यांना असे वाटते की हे तरुण कलाकार आमच्या चित्रपटात काम करायला लागले तर आम्ही काय करणार?"
वाचा: मी जास्तीत जास्त २ हजार रुपये खर्च करते; कपड्यांवर वायफळ खर्च करण्यावर मृणाल ठाकूरची प्रतिक्रिया

सध्या सोशल मीडियावर नादिया खानचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. अनेकांनी त्यावर कमेंट करत तिला ट्रोल केले आहे. तसेच अनेकांनी तिला सुनावले असल्याचे दिसत आहे.

IPL_Entry_Point

विभाग