मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  नियंत्रण सुटल्यामुळे सुपरस्टार अजित कुमार याच्या गाडीचा भीषण अपघात, व्हिडीओ आला समोर

नियंत्रण सुटल्यामुळे सुपरस्टार अजित कुमार याच्या गाडीचा भीषण अपघात, व्हिडीओ आला समोर

Aarti Vilas Borade HT Marathi
Apr 05, 2024 12:05 PM IST

दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता अजित कुमार याचा अपघात झाला आहे. त्याच्या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

नियंत्रण सुटल्यामुळे सुपरस्टार अजित कुमार याच्या गाडीचा अपघात, व्हिडीओ आला समोर
नियंत्रण सुटल्यामुळे सुपरस्टार अजित कुमार याच्या गाडीचा अपघात, व्हिडीओ आला समोर

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेता अजित कुमारच्या अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओपाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. व्हिडीओपाहून अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे. पण सुदैवाने या अपघतामध्ये अजितला फारशी दुखापत झाली नाही. त्याला किरकोळ लागले असून तो ठिक आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ हा 'विदा मुयार्ची' चित्रपटाच्या वेळचा आहे.

ट्रेंडिंग न्यूज

कसा झाला अपघात?

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात अजित कुमार ‘विदा मुयार्ची’ या चित्रपटासाठी अजरबायजान या ठिकाणी चित्रीकरण करत होता. ॲक्शन सीनचे चित्रीकरण करण्यासाठी अजितने कोणत्याही बॉडी डबलचा वापर केला नव्हता. त्याने स्वत: गाडी चालवून हा स्टंट असेला सीन शूट करण्याचे ठरवले होते. मात्र हा सीन शूट करत असताना अजितचे गाडीवरचे नियंत्रण सुटले आणि गाडी पलटी झाली. सुदैवने यामध्ये अजितला काही दुखापत झाली नाही.
वाचा: चला हवा येऊ द्या आमच्यासाठी भावनिक शो; ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’चा प्रोमो पाहून नेटकरी भावूक

गुरुवारी अजित कुमारचे पब्लिसिस्ट सुरेश चंद्र यांनी एक्स अकांऊटवर हे तीन व्हिडीओ शेअर केले आहेत. त्यांनी हे व्हिडीओ टाकताच सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. शेअर केलेल्या एका क्लिपमध्ये अजित कार चालवत असल्याचे पाहायला मिळते. त्याच्या शेजारी बिग बॉस तमिळचा स्पर्धक आरव किझार बसला आहे. अचानक दोघांची गाडी पलटी होते. एडिटिंगद्वारे ज्याप्रकारे चित्रपटात दाखवण्यात जाते की कार दोन-तीन वेळा पलटताना दिसते. त्याप्रकारे या व्हिडीओत अजितची कार दोन-तीन वेळा पलटते. मात्र हे कोणतेही एडिटिंग नसून खरच असे घडले होते. गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ती अचानक पलटते आणि तेथे उपस्थित असलेले लोक गाडीच्या दिशेने मदतीसाठी धावून जातात.
वाचा: मी जास्तीत जास्त २ हजार रुपये खर्च करते; कपड्यांवर वायफळ खर्च करण्यावर मृणाल ठाकूरची प्रतिक्रिया

दुसऱ्या व्हिडीओमध्ये गाडीच्या आत असलेली दृश्य पाहायला मिळतात. गाडी पलटी झाल्यानंतर अजित आणि आरव जीव वाचवण्याचा प्रयत्न करतात. हा व्हिडीओ शेअर करत, ‘धाडसाला कोणतीही सीमा नसते. स्टंट सीक्वेन्स शूट करण्यासाठी कोणत्याही स्टंट डबलशिवाय (स्टंट करणारी दुसरी व्यक्ती) अजित कुमार यांनी निर्भयपणे शूटिंग केले आहे’ असे कॅप्शन देण्यात आले आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांनी काळजी व्यक्त केली आहे. अनेकांनी यावर कमेंट करत अजितचे कौतुकही केले आहे.

IPL_Entry_Point

विभाग