मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  SSR Birthday: डान्सर म्हणून केली होती करिअरची सुरुवात; सुशांत सिंह राजपूतबद्दल ‘या’ गोष्टी माहितीयेत?

SSR Birthday: डान्सर म्हणून केली होती करिअरची सुरुवात; सुशांत सिंह राजपूतबद्दल ‘या’ गोष्टी माहितीयेत?

Jan 21, 2023, 07:31 AM IST

    • Sushant Singh Rajput Birthday: ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतील ‘मानव’ या व्यक्तिरेखेने सुशांत सिंह राजपूत याचे आयुष्य बदलून टाकले. या मालिकेमुळेच त्याला बॉलिवूडमध्येही एन्ट्री मिळाली होती.
Sushant Singh Rajput

Sushant Singh Rajput Birthday: ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतील ‘मानव’ या व्यक्तिरेखेने सुशांत सिंह राजपूत याचे आयुष्य बदलून टाकले. या मालिकेमुळेच त्याला बॉलिवूडमध्येही एन्ट्री मिळाली होती.

    • Sushant Singh Rajput Birthday: ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतील ‘मानव’ या व्यक्तिरेखेने सुशांत सिंह राजपूत याचे आयुष्य बदलून टाकले. या मालिकेमुळेच त्याला बॉलिवूडमध्येही एन्ट्री मिळाली होती.

Sushant Singh Rajput Birthday: दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा आज (२१ जानेवारी) वाढदिवस. आज जरी अभिनेता या जगात नसला तरी, प्रेक्षकांच्या आणि चाहत्यांच्या मनात आजही त्याच्या आठवणी जिवंत आहेत. सुशांतचा जन्म २१ जानेवारी १९८६ रोजी झाला होता. बिहारमध्ये जन्मलेल्या आणि दिल्लीत वाढलेल्या या मुलाने रुपेरी पडद्यावर येण्याचे स्वप्न पाहिले आणि ते पूर्ण देखील केले होते. केवळ अभिनयच नव्हे, तर आपल्या स्वभावानेदेखील प्रेक्षकांची मने जिंकली होती.

ट्रेंडिंग न्यूज

आख्या महाराष्ट्राचा बिहार करुन टाकला; गौतमी पाटील-उत्कर्ष शिंदेच्या गाण्यावर नेटकरी संतापले

मतदान यादीतून नाव डिलिट झाल्यावरही करता येणार मतदान! मराठमोळ्या अभिनेत्रीने सांगितला उपाय

लीला आणि अभिरामच्या लग्नासाठी कालिंदीने केलंय खोटं नाटक! ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये येणार ट्वीस्ट

कलाने घेतला अद्वैतच्या खोलीचा ताबा, 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेच्या आजच्या भागात काय घडणार?

सुशांत सिंह राजपूत हा इंजिनीअरिंगचा विद्यार्थी होता. अभियांत्रिकीच्या प्रवेश परीक्षेत अव्वल झाल्यानंतर त्याने दिल्ली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश घेतला. या महाविद्यालयात तो केमिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत होता. पण, इंजिनीअरिंगला प्रवेश घेतल्यानंतर त्याची भेट प्रसिद्ध कोरिओग्राफर श्यामक डावर यांच्याशी झाली. त्यावेळी सुशांतने त्यांच्यासोबत डान्स ग्रुपमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला.

श्यामक डावर यांच्या साथीने सुशांतने नृत्यात हात आजमावला आणि २००६मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये त्याला ऐश्वर्या रायसोबत डान्स करण्याची संधी मिळाली. यानंतर मुंबईत त्याने मुंबईत येऊन नादिरा बब्बरसोबत थिएटर केले आणि अॅलन-अमिनकडून अॅक्शनही शिकला. यामुळे त्याचे कौशल्य आणखी वाढले. अभिनयासोबतच तो नृत्यात आणि अॅक्शनमध्येही पारंगत झाला. सुशांत नादिरा बब्बरसोबत एक नाटक करत होता. याच दरम्यान टीव्ही क्वीन एकता कपूरची नजर त्याच्यावर पडली. एकता कपूरने त्याला 'पवित्र रिश्ता’ या मालिकेत मुख्य अभिनेता साकारण्याची संधी दिली.

‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतील ‘मानव’ या व्यक्तिरेखेने सुशांत सिंह राजपूत याचे आयुष्य बदलून टाकले. या मालिकेमुळेच त्याला बॉलिवूडमध्येही एन्ट्री मिळाली. 'काई पो चे' हा सुशांतचा पहिला चित्रपट होता, जो प्रेक्षकांना खूप आवडला होता. त्यानंतर तो यशराज फिल्म्सच्या ‘शुद्ध देसी रोमान्स’मध्येही झळकला. यानंतर सुशांत सिंह राजपूत याने 'डिटेक्टिव ब्योमकेश बक्षी', 'एम.एस. धोनी’, ‘राबता’, ‘केदारनाथ’, ‘सोनचिडिया’ यांसारख्या चित्रपटातून चांगली लोकप्रियता मिळवली होती.

विभाग

पुढील बातम्या