मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Ramesh Sippy Birthday: ‘शोले’ बनवण्यासाठी रमेश सिप्पी यांना उधार घ्यावे लागले होते पैसे; ‘असा’ हिट झाला चित्रपट!

Ramesh Sippy Birthday: ‘शोले’ बनवण्यासाठी रमेश सिप्पी यांना उधार घ्यावे लागले होते पैसे; ‘असा’ हिट झाला चित्रपट!

Jan 23, 2023, 07:22 AM IST

    • Happy Birthday Ramesh Sippy: भारतीय चित्रपटसृष्टीला 'शोले' सारखा सुपरडुपर हिट चित्रपट देणारे निर्माते रमेश सिप्पी यांचा आज वाढदिवस.
Ramesh Sippy

Happy Birthday Ramesh Sippy: भारतीय चित्रपटसृष्टीला 'शोले' सारखा सुपरडुपर हिट चित्रपट देणारे निर्माते रमेश सिप्पी यांचा आज वाढदिवस.

    • Happy Birthday Ramesh Sippy: भारतीय चित्रपटसृष्टीला 'शोले' सारखा सुपरडुपर हिट चित्रपट देणारे निर्माते रमेश सिप्पी यांचा आज वाढदिवस.

Happy Birthday Ramesh Sippy: भारतीय चित्रपटसृष्टीला 'शोले' सारखा सुपरडुपर हिट चित्रपट देणारे निर्माते रमेश सिप्पी यांचा आज वाढदिवस. रमेश सिप्पी यांचा जन्म २३ जानेवारी १९४७ रोजी कराची पाकिस्तानमध्ये झाला. रमेश सिप्पी हे प्रसिद्ध निर्माते जीपी सिप्पी यांचे पुत्र आहेत. रमेश यांनी १९७५मध्ये 'शोले' चित्रपट बनवून हिंदी चित्रपटसृष्टीत नवा इतिहास रचला. मात्र, 'शोले' सारखा ब्लॉकबस्टर चित्रपट देणाऱ्या रमेश सिप्पी यांच्या नशिबात हिटपेक्षा जास्त फ्लॉप चित्रपट आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

निशी आणि नीरजला वेगळं करण्याचा मेघनाचा डाव सफल होणार? ‘सारं काही तिच्यासाठी’मध्ये येणार ट्वीस्ट

अभिरामच्या नावाची हळद अखेर लीलालाच लागणार! ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत आज काय घडणार?

ओटीटीवर पुन्हा 'स्कॅम' होणार! १९९२मध्ये हर्षद मेहता, २००३मध्ये तेलगी; आता २०१०च्या घोटाळ्याची फाईल उघडणार!

‘मंजू माई’ निघाली कान्सला! मराठी चित्रपट ते थेट कान फिल्म फेस्टिव्हलचा प्रवास करणारी छाया कदम!

पद्मश्री विजेते निर्माते-दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी चित्रपट निर्मितीची प्रक्रिया समजून घेण्यासाठी चित्रपटाच्या सेटला भेट देणे सुरू केले होते. रमेश सिप्पी हे हिंदी चित्रपटसृष्टीतील 'शोले', 'सीता-गीता', 'शान' सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांसाठी ओळखले जातात. पण, याशिवाय त्यांचे असे अनेक चित्रपट आहेत जे बॉक्स ऑफिसवर विशेष स्थान मिळवू शकले नाहीत. या फ्लॉप चित्रपटांमध्ये 'सोनाली केबल', 'नौटंकी साला', 'चांदनी चौक टू चायना', 'टॅक्सी नंबर ९२११' यांचा समावेश आहे. याशिवाय रमेश सिप्पी यांनी 'बुनियाद' या मालिकेसह टीव्हीच्या दुनियेतही हात आजमावला होता. त्यांची ‘बुनियाद’ ही मालिका खूप गाजली होती.

सुपरहिट चित्रपट देणाऱ्या रमेश सिप्पी यांच्याकडे कधीकाळी आर्थिक तंगी देखील होती. ‘शोले’ चित्रपट करण्यासाठी त्यांच्याकडे पैसेच नव्हते. अशावेळी त्यांनी वडील जीपी सिप्पी यांच्याकडून पैसे उधार घेतले होते. या चित्रपटासाठी रमेश सिप्पी यांना अवघे ३ कोटींचे बजेट मिळाले. यातून कलाकारांना केवळ २० लाख रुपये मानधन देण्यात आले. चित्रपटातील सर्वात प्रसिद्ध असलेल्या गब्बर सिंहची भूमिका अभिनेता डॅनी डेन्झोंगपा यांना देण्यात आली होती. पण, तारखांचा घोळ झाल्याने हे पात्र अमजद खान यांच्या पदरी पडले.

असे अनेक चित्रपट आहेत ज्यांनी रमेश सिप्पी यांना उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून ओळख मिळवून दिली. या चित्रपटांमध्ये १९७१मध्ये रिलीज झालेला 'अंदाज', १९७२ मध्ये रिलीज झालेला 'सीता और गीता', १९८० मध्ये आलेला 'शान' आणि १९८२ मध्ये आलेल्या 'शक्ती'चा समावेश आहे.

विभाग

पुढील बातम्या