मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Ghashiram Kotwal: घरबसल्या पाहता येणार ‘घाशीराम कोतवाल’चा प्रयोग; ‘इथे’ प्रसारित होणार नाटक!

Ghashiram Kotwal: घरबसल्या पाहता येणार ‘घाशीराम कोतवाल’चा प्रयोग; ‘इथे’ प्रसारित होणार नाटक!

Dec 16, 2022, 01:12 PM IST

    • Ghashiram Kotwal on YouTube : विजय तेंडुलकर यांच्या ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकाने रंगभूमी दणाणून सोडली होती. या नाटकाला आज ५० वर्षे पूर्ण होत आहेत.
Ghashiram Kotwal

Ghashiram Kotwal on YouTube : विजय तेंडुलकर यांच्या ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकाने रंगभूमी दणाणून सोडली होती. या नाटकाला आज ५० वर्षे पूर्ण होत आहेत.

    • Ghashiram Kotwal on YouTube : विजय तेंडुलकर यांच्या ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकाने रंगभूमी दणाणून सोडली होती. या नाटकाला आज ५० वर्षे पूर्ण होत आहेत.

Ghashiram Kotwal: मराठी मनोरंजन विश्वाच्या विकासात बहारदार नाटकांचा महत्त्वाचा अन् मोलाचा वाटा आहे. मराठी रंगभूमीने या मनोरंजन विश्वाला अनेक अजरामर नाटकं आणि उत्कृष्ट कलाकार दिले. अशाच एका अजरामर नाटकांपैकी एक म्हणजे ‘घाशीराम कोतवाल’. विजय तेंडुलकर यांच्या ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकाने रंगभूमी दणाणून सोडली होती. या नाटकाला आज ५० वर्षे पूर्ण होत आहेत. १६ डिसेंबर १९७२ रोजी ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकाचा पहिला प्रयोग सादर करण्यात आला होता. याच खास दिवसाचं निमित्त साधत ‘घाशीराम कोतवाल’ हे नाटक आता प्रेक्षकांना घरबसल्या पाहता येणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

ओटीटीवर पुन्हा 'स्कॅम' होणार! १९९२मध्ये हर्षद मेहता, २००३मध्ये तेलगी; आता २०१०च्या घोटाळ्याची फाईल उघडणार!

‘मंजू माई’ निघाली कान्सला! मराठी चित्रपट ते थेट कान फिल्म फेस्टिव्हलचा प्रवास करणारी छाया कदम!

अर्जुन सायली कॉन्ट्रॅक्ट मॅरेज वाढवून घेणार? मधुभाऊंची केस ठरेल का कारण? ‘ठरलं तर मग’ रंजक वळणावर!

दिवंगत आईच्या आठवणीत अभिनेत्री तेजश्री प्रधान झाली भावूक! सोशल मीडियावर पोस्ट लिहित म्हणाली...

मातब्बर कलाकारांच्या अभिनयाने नटलेलं ‘घाशीराम कोतवाल’ हे मूळ नाटक आता प्रेक्षकांना पाहता येणार आहे. मूळ संचातील नाटक आजपासून (१६ डिसेंबर) युट्यूबवर पाहता येणार आहे. मूळ संचातील नाटक पाहणे म्हणजे नाट्य रसिकांसाठी खास पर्वणी असणार आहे. १९८९मध्ये दिल्लीत झालेल्या प्रयोगादरम्यान या नाटकाचे चित्रण करून ठेवण्यात आले होते. संगीत नाटक अकादमीच्या संग्रहात असलेले हे नाटक आजपासून पुढील ३ दिवस ‘संगीत नाटक अकादमी’च्या युट्युब चॅनेलवर पाहता येणार आहे.

विजय तेंडुलकर लिखित ‘घाशीराम कोतवाल’ हे नाटक महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत पहिल्यांदा सादर करण्यात आलं होतं. यानंतर हे नाटक आणखी काही ठिकाणी सादर करण्यात आलं. मात्र, दरम्यान या नाटकावर बंदीची मागणी करण्यात आली होती. ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकामधून ब्राह्मणांची आणि नाना फडणवीस यांची बदनामी होत आहे, असा आक्षेप अनेकांनी घेतला होता. त्यामुळे हे नाटक पूर्णपणे बंद करण्यात आलं होतं. अशावेळी इतक्या सशक्त नाटकाची मेहनत वाया जाऊ नये, म्हणून काही कलाकारांनी पुढाकार घेतला.

दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्यासोबत या नाटकाची टीम, नृत्य दिग्दर्शक कृष्णदेव मुळगुंद, संगीतकार भास्कर चंदावरकर, मोहन आगाशे आणि सतीश आळेकर या सगळ्यांनी पुढाकार घेत एकत्रित येऊन ‘थिएटर अकादमी’ या संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकाचे प्रयोग पुन्हा सुरू झाले होते. ‘थिएटर अकादमी’ या संस्थेने १६ डिसेंबर १९७२ रोजी या नाटकाचा पहिला प्रयोग सादर केला होता. याच दिवसाला आज ५० वर्ष पूर्ण होत आहेत.

विभाग

पुढील बातम्या