मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  साऊथच्या प्रसिद्ध अभिनेत्याने संपवलं आयुष्य; ‘या’ चित्रपटामुळे मिळाली होती प्रसिद्धी!

साऊथच्या प्रसिद्ध अभिनेत्याने संपवलं आयुष्य; ‘या’ चित्रपटामुळे मिळाली होती प्रसिद्धी!

Jan 24, 2023, 07:25 AM IST

    • South Actor Death: तुनिषाच्या मृत्यूनंतर आणखी एका तरुण अभिनेत्याच्या मृत्यूने मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला आहे.
Sudheer Varma

South Actor Death: तुनिषाच्या मृत्यूनंतर आणखी एका तरुण अभिनेत्याच्या मृत्यूने मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला आहे.

    • South Actor Death: तुनिषाच्या मृत्यूनंतर आणखी एका तरुण अभिनेत्याच्या मृत्यूने मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला आहे.

Sudheer Varma Commits Suicide: प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता सुधीर वर्मा याने आत्महत्या करत आपले आयुष्य संपवले आहे. त्याच्या निधनाची बातमी ऐकताच चाहत्यांसह मनोरंजन विश्वाला देखील मोठा धक्का बसला आहे. आपल्या वैयक्तिक आयुष्यात सुरू असलेले तणाव आणि त्यातून आलेल्या नैराश्यामुळे अभिनेत्याने हे कठोर पाऊल उचलल्याचे म्हटले जात आहे. सदर घटना सोमवारी (२३ जानेवारी) घडली आहे. या घटनेमुळे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

२५ दिवसांनंतर ‘सोढी’ घरी परतला! नक्की कुठे गेला होता अभिनेता गुरुचरण सिंह?

‘बाजीराव मस्तानी’साठी संजय लीला भन्साळी यांनी अलका कुबल यांना का नाकारलं? अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा!

पुन्हा एकदा ‘सायली’ आणि ‘कला’ने मारली बाजी! पाहा या आठवड्याचा मराठी मालिकांचा TRP Report

‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णी हिला कसा मिळाला होता पहिला चित्रपट? वाचा अभिनेत्रीविषयी काही भन्नाट गोष्टी!

मीडिया रिपोटर्नुसार, १० जानेवारी रोजी अभिनेता सुधीर वर्मा याने विषारी पदार्थ खाल्ला होता. यानंतर त्याची प्रकृती खालावली होती. वारंगळमध्ये ही घटना घडली होती. यानंतर सुधीर आपल्या नातेवाईकांकडे हैदराबादला निघून गेला होता. आपण विषप्राशन केल्याचे त्याने नातेवाईकांना सांगितले. हे कळताच नातेवाईकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले होते. गेल्या काही दिवसांपासून हैदराबादमधील ओस्मानिया रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते.

ओस्मानिया रुग्णालयात उपचार सुरू असतानाच सुधीर याची प्रकृती आणखी खालावली. यानंतर त्याला २१ जानेवारी रोजी विशाखापट्टणम येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, याच ठिकाणी उपचार घेत असताना २३ जानेवारीला त्याची प्राणज्योत मालवली. सुधीरच्या निधनाची बातमी कळताच चाहत्यांनी त्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहण्यास सुरुवात केली. त्याच्या सहकलाकारांनी देखील अभिनेत्याच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

‘कुंदनपू बोम्मा’ या चित्रपटातून सुधीरच्या कारकिर्दीने यशाचं शिखर गाठलं होतं. या चित्रपटाशिवाय त्याने 'शूटआउट इन अल्लायर'मध्येही दमदार अभिनयाची झलक दाखवली होती. तुनिषाच्या मृत्यूनंतर आणखी एका तरुण अभिनेत्याच्या मृत्यूने मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला आहे.

विभाग

पुढील बातम्या