मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Vaalvi Box Office Collection: ‘वाळवी’ची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घौडदौड! पाहा कलेक्शन

Vaalvi Box Office Collection: ‘वाळवी’ची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घौडदौड! पाहा कलेक्शन

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 23, 2023 12:20 PM IST

Vaalvi Box Office Collection: ‘वाळवी’ हा मराठी चित्रपट सध्या बॉक्स ऑफिस गाजवत आहे. या चित्रपटात सुबोध भावे, स्वप्नील जोशी, अनिता दाते आणि शिवानी सुर्वे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

Vaalvi
Vaalvi

Vaalvi Box Office Collection: मराठी मनोरंजन विश्वात सध्या अनेक नवनवे प्रयोग होताना पाहायला मिळत आहेत. असाच एक प्रयोग ‘वाळवी’ चित्रपटाच्या निमित्ताने पाहायला मिळाला. या चित्रपटाला प्रेक्षकांकडूनही भरपूर प्रेम मिळत आहे. आता या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरही यशस्वी घौडदौड सुरू झाली आहे. या चित्रपटाला प्रदर्शित होऊन आता ९ दिवस पूर्ण झाले असून, या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आले आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच कल्ला करत आहे.

मराठी चित्रपट सध्या बॉक्स ऑफिस गाजवत आहे. ‘वाळवी’ या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आले आहे. या चित्रपटाने अवघ्या २ आठवड्यांत जवळपास ३ कोटींची कमाई केली आहे. स्वप्नील जोशी आणि सुबोध भावे यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटाने नवव्या दिवशीपर्यंत २.५३ कोटींचा टप्पा पार केला आहे. दोन आठवड्यात या चित्रपटाने चांगली कामगिरी केली आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

‘वाळवी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन परेश मोकाशी यांनी केले आहे. परेश मोकाशी यांची पत्नी आणि अभिनेत्री मधुगंधा कुलकर्णी यांनी ‘वाळवी’ या चित्रपटाचे लेखन सांभाळले आहे. ‘वाळवी’ या चित्रपटात सुबोध भावे, स्वप्नील जोशी, अनिता दाते आणि शिवानी सुर्वे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हटके कथानक आणि कलकारांची फौज यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना आकर्षित करण्यात यशस्वी ठरला आहे.

‘वाळवी’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर देखील प्रमोशनसाठी हटके फंडे वापरले जात आहेत. नुकताच या चित्रपटाचा दुसरा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये स्वप्नील जोशी आणि अनिता दाते एकमेकांच्या डोक्यावर बंदूक धरुन उभे असल्याचे दाखवले होते. हा सगळा स्वप्नील आणि शिवानी सुर्वेचा कट असल्याचे दिसत होते. मात्र, आता प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये स्वप्नील जोशीला गोळी लागल्याचे दाखवण्यात आले आहे. एकंदरीत हा ट्रेलर पाहाता चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत आणखी उत्सुकता आणखी वाढली आहे. प्रेक्षक थिएटरमध्ये जाऊन आवर्जून हा चित्रपट पाहत आहेत.

IPL_Entry_Point