मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रीचा झाला अपघात, पीआर टीमने दिली प्रकृतीविषयी माहिती

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रीचा झाला अपघात, पीआर टीमने दिली प्रकृतीविषयी माहिती

Aarti Vilas Borade HT Marathi

Apr 19, 2024, 08:27 AM IST

    • छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेत्रीचा अपघात झाला आहे. आता या अभिनेत्रीची प्रकृती कशी आहे हे जाणून घेण्यासाठी चाहते वाट पाहात आहेत.
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रीचा झाला अपघात, पीआर टीमने दिली प्रकृतीविषयी माहिती

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेत्रीचा अपघात झाला आहे. आता या अभिनेत्रीची प्रकृती कशी आहे हे जाणून घेण्यासाठी चाहते वाट पाहात आहेत.

    • छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेत्रीचा अपघात झाला आहे. आता या अभिनेत्रीची प्रकृती कशी आहे हे जाणून घेण्यासाठी चाहते वाट पाहात आहेत.

छोट्या पडद्यावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीचा अपघात झाला आहे. दिव्यांकासोबत तिचा पती विवेक दहिया देखील होता. त्यांच्या पीआरटीमने रात्री सोशल मीडियाच्या माध्यमातून अपघाताची माहिती दिली आहे. पण टीमने संपूर्ण माहिती दिलेली नाही. दिव्यांकावर उपचार सुरु आहेत असे त्यांनी म्हटले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

दिवाळीच्या मुहूर्तावर होणार पैशांची बरसात! ‘ये रे ये रे पैसा ३’ पुन्हा बॉक्स ऑफिसवर धमाल उडवणार

विनोदाची पातळी इतकी खाली गेलीये? कुशल बद्रिके आणि हेमांगी कवीच्या ‘मॅडनेस मचायेंगे’वर संतापले प्रेक्षक

तेजश्री प्रधानच्या मालिकेने पुन्हा मारली बाजी! जुई गडकरी ठरली नंबर वन! पाहा मराठी मालिकांचा टीआरपी रिपोर्ट

एक-दोन नव्हे, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चा ‘सोढी’ वापरत होता १० बँक अकाऊंट! पोलिसांनी केला नवा खुलासा

पीआर टीमने दिली माहिती

सोपबॉक्स पीआर टीमने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी विवेक दहियाच्या उद्या होणाऱ्या लाइव्ह विषयी माहिती दिली आहे. त्यांनी ते लाइव्ह पुढे ढकलले आहे. याच पोस्टमध्ये त्यांनी पुढे, अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीचा अपघात झाला आहे आणि सध्या रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु आहेत अशी माहिती देण्यात आली. तसेच विवेक तिच्यासोबत रुग्णालयात असल्यामुळे त्याचे लाइव्ह रद्द करण्यात येत आहे असे ते म्हणाले आहेत.
वाचा: ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘ही’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप! कलाकार झाले भावूक

वाचा: 'गुलाबी साडी' गाण्यावर जॉनी लिव्हर यांचा मुलांसोबत भन्नाट डान्स, हटके स्टेप्स पाहून होईल हसू अनावर

काही दिवसांपूर्वी झाली होती सर्जरी

काही दिवसांपूर्वीच दिव्यांकाची लिगामेंट सर्जरी झाली होती. दिव्यांकाने या सर्जरीनंतरचा एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये तिने लिगामेंट सर्जरी तिने लिगामेंट सर्जरी कशी झाली आणइ त्यानंतर ती कशी रिकव्हर होत आहे याविषयी माहिती दिली होती. आता दिव्यांकाचा अपघात झाल्यानंतर ती लवकरात लवकर बरी व्हावी म्हणून चाहते देवाकडे प्रार्थना करत आहे.
वाचा: मुक्ता हिला इंद्राने काढले घराबाहेर, कार्तिकचा डाव त्याच्यावरच उलटणार का? प्रेमाची गोष्ट मालिकेत काय घडणार

दिव्यांकाच्या कामाविषयी

दिव्यांकाने ये दिल चाहे मोअर या मालिकेत काम करत अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर तिने झी टीव्हीवरील बनू मैं तेरी दुल्हन या मालिकेत काम केले. या मालिकेने तिला ओळख मिळवून दिली. या मालिकेतील भूमिकेसाठी पुरस्कार देण्यात आले होते. पण ये है मोहब्बते या मालिकेने दिव्यांकाला प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचवले होते.

विभाग

पुढील बातम्या