मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bhagya Dile Tu Mala : ‘माहेरचा चहा’ हातून गेल्यावर कावेरी सुरू करणार नवा व्यवसाय!

Bhagya Dile Tu Mala : ‘माहेरचा चहा’ हातून गेल्यावर कावेरी सुरू करणार नवा व्यवसाय!

Apr 10, 2023, 09:47 AM IST

  • Bhagya Dile Tu Mala Latest Update: ‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेचा चाहता वर्ग दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. या मालिकेचं कथानक देखील अतिशय मनोरंजक वळणावर आलं आहे.

Bhagya Dile Tu Mala

Bhagya Dile Tu Mala Latest Update: ‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेचा चाहता वर्ग दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. या मालिकेचं कथानक देखील अतिशय मनोरंजक वळणावर आलं आहे.

  • Bhagya Dile Tu Mala Latest Update: ‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेचा चाहता वर्ग दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. या मालिकेचं कथानक देखील अतिशय मनोरंजक वळणावर आलं आहे.

Bhagya Dile Tu Mala Latest Update: मालिका विश्वात सध्या काही मालिका अक्षरशः धुमाकूळ घालत आहेत. अशाच मालिकांपैकी एक म्हणजे ‘भाग्य दिले तू मला’. ‘कलर्स मराठी’वरील या मालिकेचा चाहता वर्ग दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. या मालिकेचं कथानक देखील अतिशय मनोरंजक वळणावर आलं आहे. ‘भाग्य दिले तू मला’ मालिकेतील राजवर्धन मोहिते आणि कावेरी ही जोडी देखील प्रेक्षकांची लाडकी जोडी बनली आहे. आता या मालिकेत एक नवं वळण पाहायला मिळणार आहे. ‘माहेरचा चहा’ हातून गेल्यानंतर आता कावेरी मोहित्यांसाठी एक नवा बिझनेस सुरू करणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

नेमकी काय आहे ‘हीरामंडी’तील आदिती राव हैदरीने केलेली ‘गजगामिनी चाल’? कामसूत्राशी आहे कनेक्शन

‘बस करा आता... बंद करा मालिका’; अपर्णा आणि अर्जुनच्या ‘अप्पी आमची कलेक्टर’वर का वैतागले प्रेक्षक?

काय होतास तू... काय झालास तू.... ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम गुरुचरण सिंहची अवस्था बघून चाहते हळहळले!

कान्स फिल्म फेस्टिव्हलमधून परतताच ऐश्वर्या रायच्या हातावर शस्त्रक्रिया होणार! अभिनेत्रीला नेमकं काय झालंय?

‘भाग्य दिले तू मला’ ही रत्नमाला मोहिते नावाच्या एका उद्योजिकेच्या आयुष्याभोवती फिरणारी मालिका आहे. रत्नमाला मोहितेंचा मुलगा राजवर्धन मोहिते हा आपल्या आईसोबत मिळून ‘माहेरचा चहा’ नावाचा एक कॅफे ब्रँड सांभाळत होता. मात्र, अचानक रत्नमाला यांच्या किडन्या निकामी झाल्याने आता आपलं मातृछत्र हरपेल या भ्तीने राजवर्धनने अनेक अविचारी निर्णय घेतले. आपल्या आईला किडनी डोनर मिळावा म्हणून त्याने आपली सगळी संपत्ती पणाला लावली.

अतिशय दुर्मिळ रक्तगट असल्याने रत्नमाला मोहिते यांना कुणीच किडनीदाता मिळत नव्हता. अशावेळी राजवर्धनची मैत्रीण वैदेही त्याच्या मदतीला आली. मात्र, किडनीच्या बदल्यात तिने लग्न करण्याची अट घातली होती. ही अट त्याने मान्य न केल्याने, तिने त्याची सगळी संपत्ती मागून घेतली. आईचा जीव वाचावा म्हणून राजने क्षणाचाही विचार न करता सगळी संपत्ती तिला देऊन टाकली. यामुळे आता तो मात्र पूर्णपणे कफल्लक झाला. कावेरी आणि राज यांचा संसार मोडावा म्हणून वैदेहीने खेळलेली खेळी पूर्णपणे निकामी ठरली.

राज आणि कावेरीच्या यांच्या हातून सगळं निसटलं असलं तरी, त्यांनी पुन्हा एकदा नव्या दमाने आपला संसार सुरू क्कार्ण्याचा निर्णय घेतला आहे. सगळ्यांचा उत्साह वाढवा म्हणून आता कावेरीने पुन्हा एकदा नव्याने एक नवी सुरुवात करायची ठरवलं आहे. आता कावेरी सगळ्यांना सरप्राईज देत छोटीशी चहाची टपरी सुरु केली आहे. गावी देखील कावेरीचं एक छोटसं चहाचं दुकान होतं. कावेरीने केलेली ही नवी सुरुवात आता मोहित्यांच्या आनंदाची नांदी ठरणार का? हे येत्या भागांमध्ये कळणार आहे.

विभाग

पुढील बातम्या