मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Ashneer Grover: भारतपे प्रकरण अंगाशी येणार; ‘शार्क टँक’ फेम अश्नीर ग्रोव्हरविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल!

Ashneer Grover: भारतपे प्रकरण अंगाशी येणार; ‘शार्क टँक’ फेम अश्नीर ग्रोव्हरविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल!

May 12, 2023, 01:51 PM IST

  • Ashneer Grover BharatPe Case: आर्थिक गुन्हे शाखेने फसवणुकीच्या आरोपाखाली अश्नीर ग्रोव्हर आणि त्याच्या कुटुंबाविरुद्ध दिल्लीत गुन्हा दाखल केला आहे.

Ashneer Grover-Madhuri Jain

Ashneer Grover BharatPe Case: आर्थिक गुन्हे शाखेने फसवणुकीच्या आरोपाखाली अश्नीर ग्रोव्हर आणि त्याच्या कुटुंबाविरुद्ध दिल्लीत गुन्हा दाखल केला आहे.

  • Ashneer Grover BharatPe Case: आर्थिक गुन्हे शाखेने फसवणुकीच्या आरोपाखाली अश्नीर ग्रोव्हर आणि त्याच्या कुटुंबाविरुद्ध दिल्लीत गुन्हा दाखल केला आहे.

Ashneer Grover BharatPe Case: ‘शार्क टँक’ फेम उद्योगपती अश्नीर ग्रोव्हर आणि त्याची फिनटेक कंपनी भारतपे यांच्यात सुरू असलेला कायदेशीर वाद आता आणखी चिघळला आहे. आता या प्रकरणात एक नवीन अपडेट समोर आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेने फसवणुकीच्या आरोपाखाली अश्नीर ग्रोव्हर आणि त्याच्या कुटुंबाविरुद्ध दिल्लीत गुन्हा दाखल केला आहे. भारतपेकडून करण्यात आलेल्या तक्रारीच्या आधारे हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

सावनीने आखला नवा डाव! मुक्ता करेल का सागर आणि आदित्यला माफ? 'प्रेमाची गोष्ट'मध्ये काय होणार जाणून घ्या

उत्कर्ष शिंदे आणि गौतमी पाटील यांचा अल्बम पाहिलात का? सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ

अभिनेत्री मलायका अरोराने वांद्रे येथील घर दिले भाडे तत्त्वावर, जाणून घ्या किती आहे भाडे?

Cinema Hall Shut Down : मोठी बातमी! आजपासून दहा दिवस चित्रपटगृहे राहणार बंद, काय आहे कारण? जाणून घ्या

भारतपेचे माजी व्यवस्थापकीय संचालक अश्नीर ग्रोव्हर, त्यांची पत्नी माधुरी जैन ग्रोव्हर आणि दीपक गुप्ता, सुरेश जैन आणि श्वेतांक जैन यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांविरोधात ८१ कोटींच्या फसवणुकीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. अश्नीर ग्रोव्हर आणि भारतपे यांच्यातील हे प्रकरण गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. या आधी देखील अश्नीर ग्रोव्हरचे नाव अनेक वादांमध्ये अडकले होते. यापूर्वी अशनीर ग्रोव्हरने कोटक बँकेच्या कर्मचार्‍यांशी केलेल्या गैरवर्तनाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यानंतर फेब्रुवारी २०२२मध्ये अश्नीर ग्रोव्हरची पत्नी माधुरी जैन यांना हेराफेरीच्या आरोपावरून कंपनीतून काढून टाकण्यात आले.

TMKOC: ते सगळे आरोप खोटे, उलट तीच...; जेनिफर मिस्त्रीच्या आरोपांवर ‘तारक मेहता’चा निर्माता भडकला!

पत्नी माधुरी जैनला काढल्यानंतर अश्नीर ग्रोव्हरने १ मार्च २०२२ रोजी एक पत्र जारी करून कंपनीचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली होती. या दरम्यान अश्नीर ग्रोव्हरची पत्नी माधुरी जैनवर अनेक आरोप सुरू होते. माधुरीने स्वतःच्या खर्चासाठी पैसे उधळले आणि ते कंपनीकडून उकळले. यासाठी त्यांना श्वेतांक जैन याने मदत केली होती. श्वेतांक जैन हा त्यांचा भाऊ असून, त्याचे नाव देखील खटल्यात सामील आहे. माधुरी जैनने कंपनीचा निधी स्वतःच्या वैयक्तिक सौंदर्य उपचारासाठी, इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी करण्यासाठी आणि कुटुंबासह दुबईच्या सहलीसाठी वापरला, असा आरोप आहे.

डिसेंबर २०२२ मध्ये, भारतपेने कंपनीच्या निधीचा प्रचंड गैरवापर केल्याबद्दल अश्नीर ग्रोव्हर, त्यांची पत्नी माधुरी जैन ग्रोव्हर आणि त्यांच्या नातेवाईकांविरुद्ध दिवाणी आणि फौजदारी कारवाई सुरू केली होती. ग्रोव्हर दाम्पत्यावर कंपनीच्या खात्यातून तब्बल ८१ कोटी रुपये बनावट पावत्या बनवून त्यांच्या ओळखीच्या आणि नातेवाईकांच्या खात्यात ट्रान्सफर केल्याचा आरोप आहे. आता त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विभाग

पुढील बातम्या