मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Akshay Kumar: बॉलिवूडनंतर अक्षय कुमार राजकारणात उतरणार? लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा

Akshay Kumar: बॉलिवूडनंतर अक्षय कुमार राजकारणात उतरणार? लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा

Feb 27, 2024, 08:40 AM IST

  • Akshay Kumar In Politics: अक्षय कुमार राजकारणात सामील झाल्याच्या चर्चा सुरू होताच, सगळे अक्षय कुमार याच्या प्रतिक्रियेची वाट बघत आहेत.

Akshay Kumar In Politics

Akshay Kumar In Politics: अक्षय कुमार राजकारणात सामील झाल्याच्या चर्चा सुरू होताच, सगळे अक्षय कुमार याच्या प्रतिक्रियेची वाट बघत आहेत.

  • Akshay Kumar In Politics: अक्षय कुमार राजकारणात सामील झाल्याच्या चर्चा सुरू होताच, सगळे अक्षय कुमार याच्या प्रतिक्रियेची वाट बघत आहेत.

Akshay Kumar In Politics: बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार बॉलिवूड गाजवल्यानंतर आता राजकारणात उतरणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. अक्षय कुमार राजकारणात एन्ट्री घेणार असल्याच्या चर्चांनी चांगलाच जोर धरला आहे. मनोरंजन विश्व गाजवल्यानंतर कलाकारांनी राजकीय वर्तुळात उडी घेण्याचा ट्रेंड हा तसा नवा नाही. या आधीही अनेक दिग्गज कलाकार राजकारणाच्या क्षेत्रात उतरले आहेत. मात्र, आता अक्षय कुमार राजकारणात सामील झाल्याच्या चर्चा सुरू होताच, सगळे अक्षय कुमार याच्या प्रतिक्रियेची वाट बघत आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

आख्या महाराष्ट्राचा बिहार करुन टाकला; गौतमी पाटील-उत्कर्ष शिंदेच्या गाण्यावर नेटकरी संतापले

मतदान यादीतून नाव डिलिट झाल्यावरही करता येणार मतदान! मराठमोळ्या अभिनेत्रीने सांगितला उपाय

लीला आणि अभिरामच्या लग्नासाठी कालिंदीने केलंय खोटं नाटक! ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये येणार ट्वीस्ट

कलाने घेतला अद्वैतच्या खोलीचा ताबा, 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेच्या आजच्या भागात काय घडणार?

अक्षय कुमारला लोकसभेचे तिकीट मिळणार?

लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी भाजप अभिनेता अक्षय कुमारला तिकीट देऊ शकते, असे बोलले जात आहे. लोकसभा निवडणुकीसाठी दिल्लीत युती करण्यासोबतच आम आदमी पार्टी आणि काँग्रेसमध्येही जागावाटप करण्यात आले आहे. यानंतर भाजपनेही दिल्लीतील जागांचे आकलन सुरू केले आहे. यावेळी काही जागांवर नवे चेहरे पाहायला मिळण्याची शक्यता आहे. खासदारांचा ट्रॅक रेकॉर्ड, एमसीडी निवडणुकीतील पराभव आणि काही महत्त्वाच्या बाबी लक्षात घेऊन भाजप यावेळी दिल्लीतील लोकसभेच्या पाच किंवा कदाचित सातही जागांवर नवे चेहरे उभे करू शकते, अशी चर्चा जोर धरू लागली आहे.

Viral Video: सेल्फी घ्यायला आलेल्या चाहत्यावर भडकले नसीरुद्दीन शाह; व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणतायत...

अभिनेत्याला चांदणी चौकातून मिळू शकते तिकीट!

मीडिया रिपोर्टनुसार, यावेळी दोन जागा महिलांसाठी देखील दिल्या जातील. लोकसभा निवडणुकीसाठी भाजप बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारला तिकीट देऊ शकते, असे म्हटले जात आहे. आप आणि काँग्रेसने दिल्लीत युती तर केलीच पण जागा वाटूनही घेतल्या आहेत. उत्तर पूर्व, पूर्व, चांदणी चौक, उत्तर पश्चिम यासह नवी दिल्लीच्या या सात जागांची सर्वाधिक चर्चा सुरू आहे. विद्यमान खासदार मनोज तिवारी यांना तिसऱ्यांदा तिकीट मिळणार नसल्याचे देखील बोलले जात आहे. तर, चांदनी चौक जागेबाबत अद्याप काहीही निर्णय झालेला नाही.

अक्षय कुमार याला दिल्लीच्या चांदनी चौकातून निवडणूक लढण्याची संधी दिली जाऊ शकते. अक्षय कुमार याच भागात लहानाचा मोठा झाला आहे. त्यामुळे त्याने याच ठिकाणाहून निवडणूक लढवणे हे एखाद्या पक्षासाठी फायदेशीर ठरू शकते. याशिवाय अक्षय कुमार याला भाजप का तिकीट देऊ शकते, याची देखील काही कारण आहेत. अनेकदा तो भाजप नेत्यांसोबत दिसला आहे. त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वैयक्तिकरित्या देखील अनेकदा भेट घेतली आहे. आता या चर्चा अफवा ठरतील की खऱ्या होती, हे येणारी वेळच सांगू शकेल.

विभाग

पुढील बातम्या