Viral Video: सेल्फी घ्यायला आलेल्या चाहत्यावर भडकले नसीरुद्दीन शाह; व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणतायत...
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Viral Video: सेल्फी घ्यायला आलेल्या चाहत्यावर भडकले नसीरुद्दीन शाह; व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणतायत...

Viral Video: सेल्फी घ्यायला आलेल्या चाहत्यावर भडकले नसीरुद्दीन शाह; व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणतायत...

Published Feb 26, 2024 05:07 PM IST

Naseeruddin Shah Viral Video: नसीरुद्दीन शाह यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ते एका चाहत्यावर रागावताना दिसले आहेत.

Naseeruddin Shah Viral Video
Naseeruddin Shah Viral Video

Naseeruddin Shah Viral Video: बॉलिवूड अभिनेते नसीरुद्दीन शाह हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक दिग्गज अभिनेते आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. १९७५मध्ये 'निशांत' या चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह हे नेहमीच आपल्या बेधडक वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. नसीरुद्दीन शाह सध्या त्यांच्या आगामी 'शो टाइम' या सीरिजमुळे चर्चेत आहे. दरम्यान, नसीरुद्दीन शाह यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ते एका चाहत्यावर रागावताना दिसले आहेत. नसीरुद्दीन शाह नुकतेच दिल्ली विमानतळावर स्पॉट झाले होते. हा व्हिडीओ देखील त्या दरम्यानचाच आहे.

अभिनेते नसीरुद्दीन शाह यांची जगभरात एक मजबूत फॅन फॉलोइंग आहे. नसीरुद्दीन शाह सार्वजनिक ठिकाणी स्पॉट होताच त्यांचे चाहते त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी धावपळ करताना दिसतात. सध्या इंटरनेटवर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका चाहत्याने दिल्ली विमानतळावर सेल्फी मागितल्यानंतर नसीरुद्दीन शाह त्याच्यावर चिडलेले पाहायला मिळाले. यावेळी नसीरुद्दीन शाह चाहत्यावर ओरडले आणो त्याला म्हणाले की, ‘तुम्ही एकदाही आम्हाला सोडत नाही, तुम्हाला समजत नाही का?’

Urvashi Rautela Gold Cake: अबब थाटच न्यारा! वाढदिवशी अभिनेत्री उर्वशी रौतेलाने कापला २४ कॅरेट सोन्याचा केक

यानंतर ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह दिल्ली विमानतळावरून रागाने त्यांच्या कारच्या दिशेने जाताना दिसले आहेत. यावेळी त्यांनी आपला चेहरा मास्कने झाकलेला होता आणि त्यांच्या हातात एक पुस्तकही होते. मात्र, आता नसीरुद्दीन शाह यांच्या या वागण्याने नेटकऱ्यांना धक्का बसला आहे. या व्हिडीओवर लोक आपली निराशा व्यक्त करताना दिसत आहेत. या व्हिडीओवर कमेंट करताना एका वापरकर्त्याने म्हटले की, 'अतिशय असभ्य वर्तन.' तर, आणखी काही लोकांनी यावर टीका केली आहे.

नसीरुद्दीन शाह कामात व्यस्त!

अभिनेते नसीरुद्दीन शाह अखेर ‘कुत्ते’ या चित्रपटात झळकले होते. या चित्रपटात तब्बू, अर्जुन कपूर, राधिका मदन, कोंकणा सेन शर्मा आणि कुमुद मिश्रा यांच्या मुख्य भूमिका होत्या. त्यांचा हा चित्रपट गेल्या वर्षी म्हणजेच २०२३मध्ये रिलीज झाला होता. नसीरुद्दीन शाहच्या आगामी वेब सीरिज 'शो टाइम' मध्ये दिसणार आहेत. त्यांची ही नवी वेब सीरिज ८ मार्चपासून डिस्ने+हॉटस्टारवर प्रीमियर होणार आहे. या वेब सीरीजमध्ये इमरान हाश्मी, महिमा मकवाना, मौनी रॉय, राजीव खंडेलवाल, श्रिया सरन आणि विशाल वशिष्ठ यांच्याही भूमिका आहेत.

Whats_app_banner