मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Viral Video: बॉलिवूड अभिनेत्रींनंतर आता अक्षय कुमार देखील झाला डीपफेकचा शिकार; व्हायरल होतोय व्हिडीओ!

Viral Video: बॉलिवूड अभिनेत्रींनंतर आता अक्षय कुमार देखील झाला डीपफेकचा शिकार; व्हायरल होतोय व्हिडीओ!

Feb 05, 2024 01:27 PM IST

Akshay Kumar Deep Fake Video Viral: बॉलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अभिनेता अक्षय कुमार देखील डीपफेक व्हिडीओचा शिकार ठरला आहे.

Akshay Kumar Deep Fake Video Viral
Akshay Kumar Deep Fake Video Viral

Akshay Kumar Deep Fake Video Viral: सध्या बॉलिवूडला डीपफेकचं ग्रहण लागलं आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या कलाकारांचे डीपफेक व्हिडीओ समोर येत असतात. आतापर्यंत अनेक अभिनेत्री डीपफेक व्हिडीओंच्या शिकार झाल्या आहेत. मात्र, आता बॉलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अभिनेता अक्षय कुमार देखील डीपफेक व्हिडीओचा बळी ठरला आहे. अक्षय कुमार याचा डीपफेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अक्षय कुमारचा हा व्हिडीओ ‘एआय’ अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून बनवण्यात आला आहे. ओश्सला मीडियावर या व्हिडीओने चांगलाच धुमाकूळ घातला आहे.

बॉलिवूड सेलिब्रिटींचे डीपफेक व्हिडीओ थांबण्याची काही चिन्हे दिसत नाहीत. रश्मिका मंदाना, कतरिना कैफ आणि नोरा फतेहीसह अनेक अभिनेत्रींनंतर आता अभिनेता अक्षय कुमार याचा डीपफेक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हायरल डीपफेक व्हिडीओमध्ये अक्षय कुमार एका ऑनलाइन गेमिंग प्लॅटफॉर्मसाठी जाहिरात करताना दिसला आहे. या व्हिडीओमध्ये स्वतः अक्षय कुमार जाहिरात करताना दिसला आहे. मात्र, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अभिनेत्याशी संबंधित लोकांनी हा व्हिडीओ खोटा असल्याचे म्हटले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Grammys 2024 : थोडक्यात हुकली नरेंद्र मोदी यांची ‘ग्रॅमी’ जिंकण्याची संधी! ‘या’ भारतीय गाण्यानेच दिली मात

अक्षय कुमारच्या व्हिडीओमध्ये नेमकं काय?

या व्हिडीओबद्दल माहिती देताना अक्षयच्या टीमने म्हटले की, 'अक्षय कुमारने अशी कोणतीही जाहिरात केलेली नाही. या व्हिडीओच्या मुख्य स्रोताचा तपास सध्या सुरू आहे. या बनावट सोशल मीडिया हँडल आणि कंपनीविरोधात सायबर तक्रार दाखल करण्यात आली आहे.’ सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या एआय व्हिडीओमध्ये अक्षय म्हणतोय की, 'तुम्हालाही खेळायला आवडते का? मी तुम्हाला हे ॲप डाउनलोड करण्याची आणि एव्हिएटर गेम वापरण्याची शिफारस नक्की करेन. हा जगभरातील लोकप्रिय खेळ आहे, जो प्रत्येकजण खेळत आहे. आपल्याला कॅसिनोविरुद्ध खेळायचे नाही, तर इतर खेळाडूंविरुद्ध खेळायचे आहे. मी स्वत: गेल्या एक महिन्यापासून दररोज प्रत्येक खेळ खेळत आहे.’

अक्षय कुमारने दाखल केली तक्रार

याबद्दल सांगताना अक्षय कुमारच्या टीमने म्हटले की, ‘सदर डीपफेक व्हिडीओ समोर आल्यानंतर अक्षय कुमार याला देखील वाईट वाटले. त्याने आपल्या टीमला या प्रकरणावर लक्ष ठेवून कायदेशीर कारवाई करण्यास सांगितले आहे.’ सध्या अक्षय कुमार त्याच्या आगामी चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त असला, तरी या डीपफेक प्रकरणावर लक्ष ठेवून आहे. या आधी बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही हिचा अशाच एका ब्रँडची जाहिरात करतानाचा डीपफेक व्हिडीओ समोर आला होता. या व्हिडीओमध्ये नोरासारखी दिसणारी एक महिला सेलचे प्रमोशन करताना दिसली होती. तर, रश्मिका मंदाना, कतरिना कैफ, काजोल आणि क्रिकेटर सचिन तेंडुलकरचे डीपफेक व्हिडीओ व्हायरल झाले होते.

WhatsApp channel