मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Prajakta Mali: प्राजक्ता माळीचं ‘या’ क्षेत्रात पदार्पण; राज ठाकरेंच्या हस्ते वेबसाईटचं अनावरण!

Prajakta Mali: प्राजक्ता माळीचं ‘या’ क्षेत्रात पदार्पण; राज ठाकरेंच्या हस्ते वेबसाईटचं अनावरण!

Jan 07, 2023, 10:29 AM IST

    • Prajakta Mali new venture: अभिनयासोबतच आपल्या कवितांनी रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने आता एका नव्या क्षेत्रात पदार्पण केलं आहे.
Prajakta Mali new venture

Prajakta Mali new venture: अभिनयासोबतच आपल्या कवितांनी रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने आता एका नव्या क्षेत्रात पदार्पण केलं आहे.

    • Prajakta Mali new venture: अभिनयासोबतच आपल्या कवितांनी रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने आता एका नव्या क्षेत्रात पदार्पण केलं आहे.

Prajakta Mali new venture: आपल्या बहुरंगी अभिनयाने, सूत्रसंचालन, नृत्याने प्रेक्षकांना आपलंस करणाऱ्या प्राजक्ता माळीने अल्पावधीतच आपली एक वेगळी छबी निर्माण केली. 'प्राजक्तप्रभा' या काव्यसंग्रहातून आपल्याला प्राजक्तामध्ये दडलेली एक संवेदनशील कवयित्रीही दिसली. आता प्राजक्ता एका नवीन पर्वाला सुरुवात करत असून, 'प्राजक्तराज' हा पारंपरिक मराठी साज घेऊन ती आपल्या समोर आली आहे. अस्सल मराठमोळ्या अलंकारांची श्रीमंती, पारंपरिक, घरंदाज आभूषणांच्या या नवीन शृंखलेच्या वेबसाईटचे महाराष्ट्राचे नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आणि कला-इतिहासप्रेमी राज ठाकरे यांच्या हस्ते नुकतेच अनावरण करण्यात आले.

ट्रेंडिंग न्यूज

'या' मालिकेत काम करत असताना एकता कपूरच्या सिनेमाने बदलले नुसरत भरुचाचे आयुष्य

निशी आणि नीरजला वेगळं करण्याचा मेघनाचा डाव सफल होणार? ‘सारं काही तिच्यासाठी’मध्ये येणार ट्वीस्ट

अभिरामच्या नावाची हळद अखेर लीलालाच लागणार! ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत आज काय घडणार?

ओटीटीवर पुन्हा 'स्कॅम' होणार! १९९२मध्ये हर्षद मेहता, २००३मध्ये तेलगी; आता २०१०च्या घोटाळ्याची फाईल उघडणार!

या खास सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून महाकादंबरीकार, इतिहास प्रेमी व अभ्यासक विश्वास पाटील उपस्थित होते. महाराष्ट्राच्या विविध भागातील आभूषणे 'प्राजक्तराज'च्या माध्यमातून तीने जगभरातील आभूषणप्रेमींसाठी आणली आहेत.

या वेळी प्राजक्ताला तिच्या नवीन वाटचालीसाठी शुभेच्छा देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले की, ‘प्राजक्ताने प्राजक्तराज हा स्वतःचा जो ब्रँड उभा केला आहे, त्यासाठी तिचे अभिनंदन. तिने जे दागिने दाखवले त्यांची माहिती मलाही नव्हती. तिची या संकल्पनेमागची भावना, हेतू खरंच कौतुकास्पद आहे. आपल्याला आपल्याच काही गोष्टींचा इतिहास माहीत नसतो. प्राजक्ताप्रमाणेच पुढील पिढीही आपला पारंपरिक, मौल्यवान ठेवा, दागिने त्यांच्या पुढील पिढीला सांगण्यासाठी नक्कीच जोपासतील.’

आपल्या या नवीन प्रवासाबद्दल प्राजक्ता माळी म्हणाली की, ‘दागिन्यांचा स्वतःचा ब्रॅण्ड काढेन, हा विचारही कधी मनात नव्हता. भावाच्या लग्नादरम्यान दागिन्यांबाबत काही गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या. एक जाणवले ते म्हणजे आपले पारंपरिक दागिने लोप पावत आहेत. ध्यानीमनी नसतानाही हा नवीन प्रवास सुरू झाला आणि त्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. अनेक तज्ज्ञांची, जाणकारांची मदत घेतली आहे. महाराष्ट्रातील पारंपरिक दागिन्यांचा अस्सलपणा जपण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे.’

पुढे प्राजक्ता म्हणाली की, ‘प्राजक्तराज’ हे नावही अतिशय समर्पक आहे. राजेशाही थाटाचा हा नजराणाच आहे. 'प्राजक्तराज'च्या माध्यमातून तुम्हाला महाराष्ट्रातील अस्सल पारंपरिक दागिने मिळतील. या दागिन्यांवर आधुनिकतेचा साज नसेल आणि हीच 'प्राजक्तराज'ची खासियत असेल. सध्या ही आभूषणे वेबसाईटवर उपलब्ध असली तरी लवकरच काही प्रदर्शनांमध्येही हे अलंकार विक्रीसाठी उपलब्ध होतील, जेणेकरून महाराष्ट्राची संस्कृती कानाकोपऱ्यात पोहोचेल. लवकरच आम्ही पुरुषांसाठीही अलंकार घेऊन येऊ. याशिवाय अनेक कल्पना आहेत, ज्या हळूहळू आपल्या समोर येतीलच. ज्याप्रमाणे तुम्ही माझ्या अभिनयावर, नृत्यावर, कवितासंग्रहावर प्रेम केले, तसेच प्रेम, प्रतिसाद तुम्ही 'प्राजक्तराज'वरही कराल, अशी अपेक्षा बाळगते.

पुढील बातम्या