मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Devoleena Bhattacharjee Post: ‘गोपी बहु’ देवोलीना भट्टाचार्जीने मागितली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदत!

Devoleena Bhattacharjee Post: ‘गोपी बहु’ देवोलीना भट्टाचार्जीने मागितली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदत!

Mar 02, 2024, 07:32 PM IST

  • Devoleena Bhattacharjee Appeals to PM Modi: 'साथ निभाना साथिया' आणि 'बिग बॉस' फेम देवोलीना भट्टाचार्जीने तिच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक पोस्ट पोस्ट शेअर केली आहे.

Actress Devoleena Bhattacharjee

Devoleena Bhattacharjee Appeals to PM Modi: 'साथ निभाना साथिया' आणि 'बिग बॉस' फेम देवोलीना भट्टाचार्जीने तिच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक पोस्ट पोस्ट शेअर केली आहे.

  • Devoleena Bhattacharjee Appeals to PM Modi: 'साथ निभाना साथिया' आणि 'बिग बॉस' फेम देवोलीना भट्टाचार्जीने तिच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक पोस्ट पोस्ट शेअर केली आहे.

Devoleena Bhattacharjee Appeals to PM Modi: ‘साथ निभाना साथिया’ या मालिकेतून ‘गोपी बहु’ बनून घराघरांत पोहोचलेली टीव्ही अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी हिने नुकतीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि भारतीय दूतावासाकडे मदत मागितली आहे. अमेरिकेतून आपल्या मित्राचा मृतदेह भारतात परत आणण्यासाठी देवोलीनाने मदत मागितली आहे. अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जीचा मित्र अमरनाथ घोष याची अमेरिकेतील सेंट लुईसमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. अभिनेत्रीने आता त्याचा मृतदेह भारतात परत आणण्यासाठी भारत सरकारकडे मदत मागितली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये एक वेगळा प्रयोग! "शक्तिमान" चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

प्रत्येक 'चौका'तला राडा प्रेक्षकांना पाहाता येणार घर बसल्या, जाणून घ्या कधी आणि कुठे?

मुक्ताच्या आईचा अपघात करणाऱ्याचे नाव आले समोर, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत काय असेल सागरचे पुढचे पाऊल?

विकेंडला सिनेमा पाहण्यासाठी जाताय? मग जाणून घ्या 'श्रीकांत'ची पहिल्या दिवसाची कमाई

'साथ निभाना साथिया' आणि 'बिग बॉस' फेम देवोलीना भट्टाचार्जीने तिच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक पोस्ट पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने भारत सरकारकडून अमेरिकेतील एका मित्राच्या मृतदेह भारतात परत आणण्यासाठी मदत मागितली आहे. यासाठी तिने मदतीचे आवाहन केले आहे. अभिनेत्रीची ही पोस्ट सध्या खूप व्हायरल होत आहे. इतकेच नाही तर, यूजर्स तिच्या या पोस्टवर कमेंट करून आपल्या प्रतिक्रियाही व्यक्त करत आहेत.

Fighter OTT Release: थिएटरमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर आता ‘फायटर’ ओटीटीवर रिलीज होणार! कधी आणि कुठे? वाचा...

देवोलीना भट्टाचार्जी यांचे पंतप्रधान मोदींना आवाहन

अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी हिने शुक्रवार, १ मार्च रोजी ट्विट केले आणि लिहिले की, 'माझा मित्र अमरनाथ घोष याची मंगळवारी संध्याकाळी सेंट लुईस अकादमी, अमेरिकेजवळ गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्याच्या कुटुंबात तो एकटाच होता. त्याची आई ३ वर्षांपूर्वीच देवाघरी गेली होती. त्याचे वडील लहानपणीच वारले आहेत. त्यची हत्या करणाऱ्या आरोपींचा अद्याप उलगडा झालेला नाही. त्याच्या काही मित्रांशिवाय त्याच्या कुटुंबात कोणीही नाही. तो कोलकाता येथे राहत होता.’

देवोलीना भट्टाचार्जीची पोस्ट झाली व्हायरल

अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जीने पुढे लिहिले की, 'तो एक उत्कृष्ट डान्सर होता, पीएचडी करत होता. कामातून मोकळा होऊन तो इव्हनिंग वॉकसाठी बाहेर पडला होता आणि चालत असताना अचानक एका अज्ञात व्यक्तीने त्याच्यावर गोळी झाडली. अमेरिकेतील काही मित्र त्याचा मृतदेह भारतात घेऊन येण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु अद्याप त्याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. भारतीय दूतावासाने यात आमची मदत करावी. निदान त्याच्या हत्येचे कारण तरी कळायला हवे.’ आता अभिनेत्रीची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील टॅग केले आहे.

पुढील बातम्या