Fighter OTT Release: थिएटरमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर आता ‘फायटर’ ओटीटीवर रिलीज होणार! कधी आणि कुठे? वाचा...
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Fighter OTT Release: थिएटरमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर आता ‘फायटर’ ओटीटीवर रिलीज होणार! कधी आणि कुठे? वाचा...

Fighter OTT Release: थिएटरमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर आता ‘फायटर’ ओटीटीवर रिलीज होणार! कधी आणि कुठे? वाचा...

Mar 02, 2024 06:58 PM IST

Fighter Movie OTT Release: थिएटरमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर आता ‘फायटर’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

Fighter Movie OTT Release
Fighter Movie OTT Release

Fighter Movie OTT Release: अभिनेता हृतिक रोशन आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण यांचा ‘फायटर’ हा चित्रपट २५ जानेवारी २०२४ रोजी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला होता. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित ‘फायटर’ या चित्रपटात हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोण यांच्यासोबतच इतर अनेक स्टार्स दिसले होते. बॉक्स ऑफिसवरही हा चित्रपट यशस्वी ठरला होता. थिएटरमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर आता ‘फायटर’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. ‘फायटर’ हा चित्रपट याच महिन्यात म्हणजेच मार्चमध्येच ओटीटीवर रिलीज होणार असल्याचे, म्हटले जात आहे.

नव्या वर्षाची म्हणजेच २०२४ची सुरुवात ‘फायटर’ या चित्रपटाच्या रिलीजने झाली होती. या चित्रपटाला थिएटरमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. पण, अनेकांची हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पाहण्याची संधी हुकली होती. अनेक लोक या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची आतुरतेने वाट बघत होते. आता प्रेक्षकांची हीच प्रतीक्षा या महिन्यात म्हणजेच मार्चमध्ये संपणार आहे. ‘फायटर’ हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रसारित केला जाणार आहे.

Nayanthara Divorce: नयनतारा पतीपासून विभक्त होणार? सोशल मीडियावरूनही अनफॉलो केल्याची चर्चा

'फायटर' ओटीटीवर प्रदर्शित होणार!

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘फायटर’ या चित्रपटाचे ओटीटी अधिकार १५० कोटी रुपयांना विकले गेले आहेत. ‘फायटर’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर होळीच्या वेळी म्हणजेच २४ किंवा २५ मार्च रोजी प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात आहे. नेटफ्लिक्सने या चित्रपटाचे ओटीटी अधिकार विकत घेतले असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, त्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. आता चाहते अधिकृत घोषणेची वाट बघत आहेत.

पुलवामा हल्ला आणि बालाकोट एअर स्ट्राइकवर आधारित कथानक

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘फायटर’ हा चित्रपट २५० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल ३५० कोटी रुपयांची कमाई केली होती. प्रेक्षकांना देखील हा चित्रपट आवडला होता. प्रेक्षकांची मनं जिंकून सिद्धार्थ आनंद पुन्हा एकदा यशस्वी झाला. या चित्रपटात हृतिक रोशन, दीपिका पादुकोण, अनिल कपूर, करण सिंह ग्रोव्हर, अक्षय ओबेरॉय आणि ऋषभ शहानी यांसारखे कलाकार झळकले आहेत. ‘फायटर’ या चित्रपटाचे कथानक २०१९मध्ये झालेल्या पुलवामा हल्ला आणि बालाकोट एअर स्ट्राइकवर आधारित आहे. यामध्ये हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोणच्या ॲक्शन सीनसोबत रोमँटिक सीनही पाहायला मिळाले आहेत.

Whats_app_banner