Nayanthara Vignesh Shivan Separation Rumors: प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा हिच्या वैवाहिक आयुष्यात आता मोठं वादळ आल्याचं म्हटलं जात आहे. अभिनेत्री नयनतारा आणि विग्नेश शिवन यांच्या नात्यात आता सारंकाही आलबेल नसल्याची चर्चा सुरू झाली आहे. लवकरच ही जोडी घटस्फोट घेणार असल्याची अफवा वेगाने पसरत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, असे म्हटले जात आहे की, नयनतारा आणि विग्नेश यांच्या नात्यात कुरबुरी सुरू आहेत. इतकंच नाही तर, त्यांच्या वैवाहिक जीवनात अडथळा निर्माण झाला आहे. यानंतर आता ही जोडी वेगळे होण्याचा विचार करत असल्याच्या बातम्या येत आहेत.
नयनतारा आणि विग्नेश शिवन यांच्या चाहत्यांना हे ऐकून धक्का बसला आहे. मात्र, ही बातमी केवळ अफवा असल्याचे म्हटले जात आहे. या अफवा अचानक कुठून आल्या आणि त्यात किती तथ्य आहे, हे नयनतारा आणि विग्नेशच सांगू शकतात. या दोघांची जोडी खूप पसंत केली जाते. नयनतारा आणि विग्नेशची जोडी सोशल मीडियावर अनेकदा एकमेकांवरील प्रेम व्यक्त करत असते. आता या दोघांबद्दल ही बातमी ऐकून चाहते चांगलेच गोंधळात पडले आहेत.
काही दिवसांपूर्वी ही जोडी सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसली होती. नयनतारा आणि विग्नेशच्या रोमँटिक पोस्ट्सपासून ते त्यांच्या मुलांसोबतच्या फोटोंपर्यंत सगळ्याच पोस्टची जोरदार चर्चा होती. मात्र, आता अचानक त्यांच्या नात्यातील दुरावाच्या या चर्चांनी चांगलाच जोर पकडला आहे. 'जवान' फेम अभिनेत्री नयनतारा आता तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर असे काही लिहिले आहे की, ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. अभिनेत्रीची ही पोस्ट सध्या तिच्या आणि विग्नेशचं नात्यामधील अंतर दर्शवत आहे. या सगळ्यातच नयनतारा हिने विग्नेश शिवन याला सोशल मीडियावरून अनफॉलो केल्याचे म्हटले जात आहे. मात्र, अद्याप तरी असे काही समोर आलेले नाही.
नयनतारा आणि विग्नेश यांच्या लग्नाला फार काळ लोटलेला नाही. दोघांनी २०२२ मध्ये मोठ्या थाटामाटात लग्न केले होते. दोघांची पहिली भेट २०१५मध्ये 'नानुम राउडी'च्या सेटवर झाली होती. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. विग्नेश या चित्रपटाचा दिग्दर्शक होता. जवळपास ६ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर त्यांनी सरोगेसीच्या माध्यमातून जुळ्या मुलांना जन्म दिला होता.
संबंधित बातम्या