मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Vedat Marathe Veer Daudale Saat: ‘वेडात मराठे वीर दौडले सात’च्या सेटवर अपघात; तटबंदीवरून कोसळून तरुण जखमी

Vedat Marathe Veer Daudale Saat: ‘वेडात मराठे वीर दौडले सात’च्या सेटवर अपघात; तटबंदीवरून कोसळून तरुण जखमी

Mar 19, 2023, 02:47 PM IST

  • Accident on Vedat Marathe Veer Daudale Saat Set: ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाच्या सेटवर एक मोठा अपघात घडला असून, यात एक तरुण गंभीर जखमी झाला आहे.

Vedat Marathe Veer Daudale Saat

Accident on Vedat Marathe Veer Daudale Saat Set: ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाच्या सेटवर एक मोठा अपघात घडला असून, यात एक तरुण गंभीर जखमी झाला आहे.

  • Accident on Vedat Marathe Veer Daudale Saat Set: ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाच्या सेटवर एक मोठा अपघात घडला असून, यात एक तरुण गंभीर जखमी झाला आहे.

Accident on Vedat Marathe Veer Daudale Saat Set:वेडात मराठे वीर दौडले सात’ या मराठी चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटातून इतिहासातील एक सुवर्णपान उलगडलं जाणार आहे. मात्र, या चित्रपटाच्या सेटवरून आता एक वाईट बातमी समोर येत आहे. या चित्रपटाच्या सेटवर एक मोठा अपघात घडला असून, यात एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. यात तरुणाला गंभीर दुखापत झाली असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या या चित्रपटाचे चित्रीकरण पन्हाळगडावर सुरू होते.

ट्रेंडिंग न्यूज

उत्कर्ष शिंदे आणि गौतमी पाटील यांचा अल्बम पाहिलात का? सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ

अभिनेत्री मलायका अरोराने वांद्रे येथील घर दिले भाडे तत्त्वावर, जाणून घ्या किती आहे भाडे?

Cinema Hall Shut Down : मोठी बातमी! आजपासून दहा दिवस चित्रपटगृहे राहणार बंद, काय आहे कारण? जाणून घ्या

मोडलेला हात घेऊन ऐश्वर्या राय बच्चनचा 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये जलवा, लूक चर्चेत

'वेडात मराठे वीर दौडले सात' या चित्रपटाचे शूटिंग संपल्यानंतर फोटो काढत असताना पन्हाळगडावरील सज्जा कोटीवरून एक तरुण दरीत कोसळला. सेटवरील ही घटना रात्री सव्वानऊच्या सुमारास घडली आहे. या अपघातानंतर तत्काळ बचावकार्य राबवून जखमी तरुणाला दरीतून बाहेर काढण्यात आले. मात्र, सध्या या व्यक्तीची प्रकृती गंभीर असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

नागेश तरडे असे या जखमी तरुणाचे नाव असून, तो या चित्रपटात एका छोट्याशा भूमिकेत झळकणार आहे. मराठी चित्रपट 'वेडात मराठे वीर दौडले सात'चे चित्रीकरण सध्या किल्ले पन्हाळगडावर शूटिंग सुरू आहे. शूटिंग संपल्यानंतर नागेश हा तरुण मावळ्याच्या वेशात स्वतःचे फोटो काढून घेत होता. यावेळी तो फोटो काढण्यासाठी सज्जा कोठीच्या तटबंदीवर चढला. मात्र, फोटो काढत असतानाच पाय घसरून तो दरीत पडला. या अपघातात त्याला गंभीर दुखापत झाली आहे.

मराठी मनोरंजन विश्वात सध्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाची भरपूर चर्चा सुरू आहे. या चित्रपटातून स्वराज्याच्या इतिहासातील एक सुवर्ण पान उलगडलं जाणार आहे. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सात शूरवीर मावळ्यांची कथा पाहायला मिळणार आहे. अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत.

पुढील बातम्या