मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Abdu Rozik: बिग बॉसच्या ‘मंडली गँग’ची मैत्री तुटली? अब्दू रोझिक आणि एमसी स्टॅन यांच्यातील वाद चर्चेत
Abdu Rozik And MC Stan
Abdu Rozik And MC Stan

Abdu Rozik: बिग बॉसच्या ‘मंडली गँग’ची मैत्री तुटली? अब्दू रोझिक आणि एमसी स्टॅन यांच्यातील वाद चर्चेत

19 March 2023, 9:22 ISTHarshada Bhirvandekar

Abdu Rozik And MC Stan clashes: एमसी स्टॅन आणि अब्दू यांच्यात आता बरेच वाद झाल्याचे म्हटले जात आहे.

Abdu Rozik And MC Stan clashes:बिग बॉस १६’ हा शो संपला असला, तरी अद्यापही याची चर्चा कमी झालेली नाही. या शोमधील स्पर्धकांच्या हाणामारी व्यतिरिक्त आणखी एक गोष्ट प्रेक्षकांच्या लक्षात राहिली ती म्हणजे या शो मधील ‘मंडली गँग’. या सीझनमध्ये मंडली गँगची मैत्री चांगलीच गाजली होती. याच गटातील एमसी स्टॅन हा या शोचा विजेता ठरला होता. एमसी स्टॅनने या सीझन ट्रॉफी जिंकली, तेव्हा ही मंडली गँग देखील या आनंदात सामील झाली होती. मात्र, आता त्यांच्या मैत्रीत वितुष्ट आल्याचे समोर आले आहे. एमसी स्टॅन आणि अब्दू यांच्यात आता बरेच वाद झाल्याचे म्हटले जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

एमसी स्टॅन आणि अब्दू रोजिक यांच्या व्यतिरिक्त, साजिद खान, शिव ठाकरे, अर्चना गौतम, सौंदर्या शर्मा, सुंबुल तौकीर खान आणि निम्रित कौर अहलुवालिया हे कलाकार देखील या मंडली गँगचा एक भाग होते. संपूर्ण सीझनमध्ये या सगळ्यांची मैत्री खूपच गाजली होती. काहीही झाले तरी ते नेहमीच एकमेकांच्या पाठीशी उभे असायचे. मात्र, आता त्यांच्यात वाद निर्माण झाले आहेत. खुद्द अब्दू रोजिक यानेच याला दुजोरा दिला आहे.

सुंबुल तौकीर खान, शिव ठाकरे आणि अब्दू रोजिक नुकतेच एका कार्यक्रमादरम्यान एकत्र दिसले होते. यादरम्यान, मीडियाला मुलाखत देताना, अब्दू यांनी आता ‘मंडली गँग’ची मैत्री संपल्याची पुष्टी केली. इतकेच नाही, तर त्याने यामागचे कारणही सांगितले. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की, एमसी स्टॅन आणि अब्दू रोजिक एक गाणे रेकॉर्ड करणार होते. मात्र, या गाण्यावरून दोघांमध्ये वाद झाला होता. गाणे रेकॉर्ड न होऊ शकल्याने अब्दू एमसी स्टेनवर नाराज असल्याचे बोलले जात आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार अब्दूने म्हटले की, कोणत्याही गाण्यासंदर्भात किंवा स्टॅनसोबत स्टेज शेअर करण्याबाबत आमची कधीही चर्चा झाली नाही. स्टॅन मीडियात काय बोलतोय याची मला कल्पना नाही, असे अब्दू म्हणाला. स्टॅनने गाण्याच्या प्रमोशनसाठी कधीही फोन केला नव्हता, असेही अब्दूने स्पष्ट केले. मात्र, अद्याप एमसी स्टॅनने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

विभाग