मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Sonali Kulkarni: ‘भारतातील मुली आळशी...’ वक्तव्यावर सोनाली कुलकर्णीने मागितली माफी! म्हणाली...
Sonali Kulkarni
Sonali Kulkarni

Sonali Kulkarni: ‘भारतातील मुली आळशी...’ वक्तव्यावर सोनाली कुलकर्णीने मागितली माफी! म्हणाली...

19 March 2023, 13:43 ISTHarshada Bhirvandekar

Sonali Kulkarni Apology: सोनालीने भारतीय मुली आळशी असल्याचे वक्तव्य केले होते. आता तिने तिच्या या वक्तव्यावर माफी मागितली असून, एक निवेदन जारी केले आहे.

Sonali Kulkarni Apology: अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सोनालीने भारतीय मुली आळशी असल्याचे वक्तव्य केले होते. तिचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून ती सतत ट्रोल होत आहे. ट्रोल झाल्यानंतर सोनालीने आता तिच्या या वक्तव्यावर माफी मागितली असून, एक निवेदन जारी केले आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

या निवेदनात सोनालीने लिहिले की, ‘मला मिळालेल्या कमेंट्सने मी भारावून गेले आहे. मी तुम्हा सर्वांचे आणि विशेषत: संपूर्ण प्रेस आणि मीडियाचे आभार मानू इच्छितो. मी स्वतः एक स्त्री असल्यामुळे इतर महिलांना दुखवण्याचा माझा हेतू नव्हता. उलट स्त्री असणं म्हणजे काय, याबाबत मी नेहमीच व्यक्त झाले आहे. माझं कौतुक करण्यासाठी किंवा माझ्यावर टीका करण्यासाठी का होईना पण वैयक्तिकरित्या माझ्यापर्यंत पोहोचल्याबद्दल मी तुम्हा सर्वांची आभारी आहे.’

पुढे तिने लिहिले की, ‘मी माझ्या क्षमतेनुसार केवळ महिलांसोबतच नाही तर संपूर्ण मानवजातीचा विचार करण्याचा, त्यांना पाठिंबा देण्याचा प्रयत्न करत आहे. जेव्हा आपण स्त्रिया शहाणपणाने निर्णय घेऊन योग्य आणि सक्षमपणे पुढे येऊ तेव्हाच अधिक मजबूत होऊ.’ आपल्या वक्तव्याची माफी मागताना सोनाली म्हणाली की, ‘जर नकळत माझ्या बोलण्याने माझे मन दुखावले असेल, तर मी मनापासून माफी मागू इच्छिते. मला या प्रसिद्धीने आनंद मिळत नाही किंवा मला अशा गोष्टींमुळे चर्चेत राहायला आवडत नाही. मी एक कट्टर आशावादी आहे आणि माझा ठाम विश्वास आहे की, आयुष्य खरोखरच सुंदर आहे. या घटनेतून मी खूप काही शिकले आहे.’

एका मुलाखती दरम्यान सोनाली म्हणाली होती की, 'भारतात अनेक मुली आळशी असतात, त्यांना असा बॉयफ्रेंड किंवा नवरा हवा असतो, ज्याच्याकडे चांगली नोकरी आहे, ज्याच्याकडे घर आहे... ज्याला पगार मिळणार याची खात्री आहे. मला तुम्हा सर्वांना सांगायचे आहे की, तुम्ही तुमच्या घरात अशा महिला निर्माण करा, ज्या सक्षम असतील. ज्या स्वत:साठी कमवू शकतील.... ज्या प्रत्येक खर्चात अर्धा वाटा उचलू शकतील.’

विभाग