मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Aai Kuthe Kay Karte: आशुतोष-अरुंधतीच्या नात्याची सुरुवात होणार; अनिरुद्धच्या प्लॅनवर पाणी फिरणार!

Aai Kuthe Kay Karte: आशुतोष-अरुंधतीच्या नात्याची सुरुवात होणार; अनिरुद्धच्या प्लॅनवर पाणी फिरणार!

Jan 22, 2023, 12:47 PM IST

    • Aai Kuthe Kay Karte : अरुंधतीचं आपल्यावर प्रेम आहे आणि ती आपल्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे, हे ऐकून आशुतोष चांगलाच सुखावला आहे.
Aai Kuthe Kay Karte

Aai Kuthe Kay Karte : अरुंधतीचं आपल्यावर प्रेम आहे आणि ती आपल्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे, हे ऐकून आशुतोष चांगलाच सुखावला आहे.

    • Aai Kuthe Kay Karte : अरुंधतीचं आपल्यावर प्रेम आहे आणि ती आपल्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे, हे ऐकून आशुतोष चांगलाच सुखावला आहे.

Aai Kuthe Kay Karte : छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’ सध्या प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. आता आशुतोष आणि अरुंधतीची प्रेमकहाणी बहरताना पाहायला मिळणार आहे. आशुतोष आणि अरुंधती यांचं एकमेकांवर प्रेम आहे. मात्र, त्यांनी आपल्या प्रेमाची कबुली एकमेकांसमोर दिली नव्हती. प्रेम व्यक्त करण्याआधीच दोघांमध्ये अनुष्का नावाची भिंत उभी राहिली होती. मात्र, अनिरुद्धने अनुष्काला सत्य सांगून अरुंधती आणि आशुतोषच्या नात्यात वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आता त्याचा हा प्लॅन चांगलाच फसला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

२५ दिवसांनंतर ‘सोढी’ घरी परतला! नक्की कुठे गेला होता अभिनेता गुरुचरण सिंह?

‘बाजीराव मस्तानी’साठी संजय लीला भन्साळी यांनी अलका कुबल यांना का नाकारलं? अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा!

पुन्हा एकदा ‘सायली’ आणि ‘कला’ने मारली बाजी! पाहा या आठवड्याचा मराठी मालिकांचा TRP Report

‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णी हिला कसा मिळाला होता पहिला चित्रपट? वाचा अभिनेत्रीविषयी काही भन्नाट गोष्टी!

गेल्या काही दिवसांपासून या मालिकेत अरुंधती-आशुतोष-अनुष्का असा प्रेमाचा त्रिकोण पाहायला मिळत होता. अनुष्काचं आशुतोषवर प्रेम असून, तिने आपलं प्रेम व्यक्त देखील केलं होतं. मात्र, आशुतोषने तिचं प्रेम नाकारालं. आशुतोष आणि अरुंधती यांच्यात काय नातं आहे, हे अजून अनुष्काच्या समोर आलं नव्हतं. परंतु, अनिरुद्धच्या प्लॅनमुळे अनुष्कासमोर हे सत्य उघड झालं. अनुष्का जरी आशुतोष आणि अरुंधतीवर नाराज झाली असली, तरी तिने दोघांमधील अव्यक्त प्रेम व्यक्त करण्यासाठी त्यांना बोलतं केलं आहे.

अरुंधतीचं आपल्यावर प्रेम आहे आणि ती आपल्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे, हे ऐकून आशुतोष चांगलाच सुखावला आहे. आता तो अतिशय धाडसाने अरुंधतीला आपलं प्रेम असल्याचं सांगणार आहे. यावेळी तो अरुंधतीला पुष्पगुच्छ देऊन प्रपोज करणार आहे. तर, अरुंधती देखील त्याला होकार देणार आहे. अनिरुद्धने केलेला प्लॅन आता त्याच्यावरच उलटणार आहे.

आपण अनुष्काला अरुंधती-आशुतोषबद्दल सांगितल्यावर आता त्यांच्यात वाद होतील आणि ते एकमेकांपासून दुरावतील असा अंदाज अनिरुद्धने बांधला होता. मात्र, अनुष्काने अरुंधती आणि आशुतोषच्या मार्गातून दूर होता, त्यांना एकत्र आणले आहे. त्यामुळे आता अनिरुद्ध पुढे काय करणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

पुढील बातम्या