मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Aai Kuthe Kay Karte: ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील ‘हा’ कलाकार घेणार प्रेक्षकांचा निरोप! ‘अनिरुद्ध’ने शेअर केली पोस्ट

Aai Kuthe Kay Karte: ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील ‘हा’ कलाकार घेणार प्रेक्षकांचा निरोप! ‘अनिरुद्ध’ने शेअर केली पोस्ट

Mar 16, 2024, 12:52 PM IST

  • Aai Kuthe Kay Karte Actor Quit Show: ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत इतकं मोठं वळण आलं असताना आता मालिकेतील एक मुख्य कलाकार मालिकेला रामराम म्हणणार आहे.

‘आई कुठे काय करते’ मालिकेतील ‘हा’ कलाकार घेणार प्रेक्षकांचा निरोप

Aai Kuthe Kay Karte Actor Quit Show: ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत इतकं मोठं वळण आलं असताना आता मालिकेतील एक मुख्य कलाकार मालिकेला रामराम म्हणणार आहे.

  • Aai Kuthe Kay Karte Actor Quit Show: ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत इतकं मोठं वळण आलं असताना आता मालिकेतील एक मुख्य कलाकार मालिकेला रामराम म्हणणार आहे.

Aai Kuthe Kay Karte Actor Quit Show: आई कुठे काय करते’ ही मालिका सध्या मालिका विश्वात चांगलीच गाजत आहे. या मालिकेत रोजच काहीना काही नवीन वळण पाहायला मिळत आहे. सध्या मालिकेत अरुंधती आणि आशुतोष यांच्या आयुष्यात एक मोठं वादळ येताना दिसलं आहे. पुन्हा एकदा अरुंधती एकटी पडताना दिसणार आहे. अनिरुद्धशी घटस्फोट घेतल्यानंतर अरुंधतीने आशुतोष केळकर यांच्याशी लग्नगाठ बांधली होती. मात्र, आता तिची ही लग्नगाठ देखील सुटणार आहे. मालिकेत इतकं मोठं वळण आलं असताना आता मालिकेतील एक मुख्य कलाकार मालिकेला रामराम म्हणणार आहे. या मालिकेत ‘अनिरुद्ध’ साकारणाऱ्या अभिनेता मिलिंद गवळी यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Premachi Goshta: मुक्तासमोर आले सागरचे सत्य, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आज काय घडणार?

‘सूर्यकांत कदम परत येतोय!’, अभिनेते भरत जाधव दिसणार मालिकेत, जाणून घ्या कोणत्या

१० फ्लॉप चित्रपटांनंतर राजकुमारचा 'श्रीकांत' ठरतोय हिट, जाणून घ्या चौथ्या दिवसाची कमाई

'३ तास वेगवेगळ्या बूथवर जाऊन नाव शोधले', मतदार यादीतून अभिनेता सुयश टिळकचे नाव गायब

‘आई कुठे काय करते’ या मालिकेत ‘आशुतोष केळकर’ साकारणारा अभिनेता ओमकार गोवर्धन आता मालिकेतून एक्झिट घेणार आहे. ‘अनिरुद्ध’ साकारणाऱ्या अभिनेता मिलिंद गवळी यांनी एक पोस्ट लिहित सोशल मीडियाद्वारे याची माहिती दिली आहे. त्यांनी ओमकारसोबतच्या शूटिंगच्या आठवणी शेअर केल्या आहेत. मिलिंद गवळी यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘ओमकार गोवर्धन याने आशुतोष केळकर या भूमिकेची कात टाकली! तीन साडेतीन वर्षांपूर्वी ‘आई कुठे काय करते’ या मालिकेमध्ये अरुंधती दुसरं लग्न करणार, तिच्या आयुष्यामध्ये एक नवीन कॅरेक्टर इंट्रोड्युस होणार याची उत्सुकता होती. अचानक एक दिवस ओमकार गोवर्धन आणि माझी गाठ आमच्या ‘आई कुठे काय करते’च्या सेटवर जिन्यामध्ये झाली.’

Vidyadhar Joshi Health: १५ दिवसांच्या अंतराने दोन वेळा कोरोना झाला अन्...; मृत्यूशी झुंज देऊन ‘असे’ परतले विद्याधर जोशी!

ओमकार आणि मिलिंद यांची जुनी ओळख!

पुढे मिलिंद गवळी यांनी लिहिले की, ‘मी ओमकारला पाहिल्या पाहिल्या म्हटलं, अरे आपण तर आधी भेटलो आहोत. गजेंद्र अहिरे यांनी मला एकदा त्याच्या सिनेमाच्या ट्रायल शोसाठी बोलावलं होतं. तो सिनेमा होता निळकंठ मास्तर. त्या ‘निळकंठ मास्तर’च्या भूमिकेमध्ये ओमकार गोवर्धन होता आणि मला त्याचं काम अतिशय आवडलं होतं. तोच मुलगा आता माझ्यासमोर आशुतोष केळकरच्या भूमिकेसाठी ‘आई कुठे काय करते’मध्ये आला होता. मला त्याला बघून आनंद झाला. कारण माझा नमितावर खूप विश्वास आहे. तिचं कास्टिंग कधीच चुकत नाही. मी ओमकारला शुभेच्छा दिल्या आणि त्याला म्हटलं ‘वा मजा येणार आता, मला खात्री आहे तू छानच काम करशील! आणि अगदी तसंच झालं, ओमकारने इतक्या प्रामाणिकपणे, इतक्या छान पद्धतीने आशुतोष केळकर ही भूमिका निभावली, की तो सगळ्यांचा लाडका झाला!’

मला त्याची आठवण येईल!

अनिरुद्ध फेम अभिनेते मिलिंद गवळी यांनी लिहिले की, ‘मी आणि आप्पा ज्या मेकअप रूममध्ये होतो, त्याच मेकअप रूममध्येच ओमकारची सोय करण्यात आली, आणि ओमकार आल्या दिवसापासून त्या मेकअप रूममध्ये फक्त मस्ती आणि हास्यरसाचा वर्षाव झाला. ह्युमर काय असतं हे ओमकारकडून शिकावं, सतत प्रसन्न राहणे, हसत राहणे आणि समोरच्याला हसवत राहणे हा त्याचा हातखंडा.. पण एकदा का स्क्रिप्ट हातात आली की, ती पाठ करायची, त्याच्यावर म्हणून चिंतन करत राहायचं, डोक्यात जितके प्रश्न येतात ते दिग्दर्शकाला विचारून त्याचं निरसन करायचं, एखाद्याचं वाक्य चुकलं, शब्द चुकला किंवा त्याचा अर्थ बदलला, तर प्रथम त्याला ते लक्षात यायचं. पाठांतराच्या बाबतीत त्याचा हात कोणीच धरू शकत नव्हतं, त्याची तर असंख्य सिनेमांची गाणीसुद्धा तोंडपाठ असायची. कधी कधी मेकअप रूममध्ये आप्पा, अनीश आणि त्याच्या त्या गाण्यांच्या मैफिली व्हायच्या. बरेचदा मी पण त्यात सामील व्हायचो. आता आशुतोष केळकर मालिकेत नसणार, याचा मला स्वतःलाच खूप मोठा धक्का बसला आहे, मला माहितीये मी त्याला खूप खूप मिस करणार! जसे लहानाचे एकत्र मोठे झालेले दोन भाऊ अचानक एक अमेरिकेला शिफ्ट व्हायला निघाला की, त्या दुसऱ्या भावाची जी अवस्था होत असेल, तसंच काहीस फिलिंग आहे. पण, त्याचं भाषेवरचं प्रभुत्व, त्याची अभिनयाची जाण आणि त्याचं प्रोफेशनलीझम त्याला आयुष्यामध्ये अजून खूप मोठं करणार अशी माझी खात्री आहे! ओंकारला माझ्या खूप खूप शुभेच्छा.’ अभिनेता ओमकार गोवर्धन याचं पात्र अर्थात आशुतोष केळकर याचा आता मृत्यू होणार आहे.

पुढील बातम्या