Bastar Movie Review: अदा शर्माच्या अभिनयाने प्रेक्षकांची निराशा! वाचा कसा आहे ‘बस्तर: द नक्षल स्टोरी’
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bastar Movie Review: अदा शर्माच्या अभिनयाने प्रेक्षकांची निराशा! वाचा कसा आहे ‘बस्तर: द नक्षल स्टोरी’

Bastar Movie Review: अदा शर्माच्या अभिनयाने प्रेक्षकांची निराशा! वाचा कसा आहे ‘बस्तर: द नक्षल स्टोरी’

Mar 16, 2024 10:58 AM IST

Bastar The Naxal Story Movie Review In Marathi: ‘द केरळ स्टोरी’मधील अदाचा शर्माचा अभिनय पाहिल्यानंतर प्रेक्षक देखील आतुर झाले होते. चला तर जाणून घेऊया कसा आहे ‘बस्तर: द नक्षल स्टोरी’...

अदा शर्माच्या अभिनयाने प्रेक्षकांची निराशा! वाचा कसा आहे ‘बस्तर: द नक्षल स्टोरी’
अदा शर्माच्या अभिनयाने प्रेक्षकांची निराशा! वाचा कसा आहे ‘बस्तर: द नक्षल स्टोरी’

Bastar: The Naxal Story Movie Review In Marathi: गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत असलेला ‘बस्तर: द नक्षल स्टोरी’ हा चित्रपट अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.  नक्षलवादावर आधारित असलेल्या या चित्रपटात ‘द केरळ स्टोरी’ फेम अभिनेत्री अदा शर्मा मुख्य भूमिकेत दिसली आहे. या चित्रपटात अदा शर्मा हिच्यासोबत काही दिग्गज चेहरे महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसले आहेत. ‘बस्तर’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी या चित्रपटाची बरीच चर्चा झाली होती. पुन्हा एकदा वास्तववादी चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक देखील खूप उत्सुक होते. ‘द केरळ स्टोरी’मधील अदाचा शर्माचा अभिनय पाहिल्यानंतर प्रेक्षक देखील आतुर झाले होते. चला तर जाणून घेऊया कसा आहे ‘बस्तर: द नक्षल स्टोरी’...

काय आहे चित्रपटाचं कथानक?

सुदिप्तो सेन दिग्दर्शित या चित्रपटाची कथा छत्तीसगडच्या बस्तर या जिल्ह्यात घडते. बस्तरमध्ये तिरंगा फडकवल्याबद्दल नक्षलवादी एका व्यक्तीची हत्या करतात. इतकंच नाहीतर, नक्षलवादी त्या व्यक्तीच्या मुलालाही सोबत घेऊन जातात. यानंतर नक्षलवादी तिथे काय काय करता आणि नीरजा माधवन नक्षलवाद संपवण्यासाठी कसा संघर्ष करते, हे चित्रपटात पाहायला मिळत आहे.

Yodha Box Office Collection: रिलीजच्या पहिल्या दिवशीच बॉक्स ऑफिसवर द्यावी लागतेय झुंज! पाहा ‘योद्धा’चे कलेक्शन

कसा आहे हा चित्रपट?

‘बस्तर’ हा चित्रपट नक्षलवादाची सुरुवात दाखवतो. नक्षलवादाचे मूळ आणि त्याचे काय काय परिणाम होतात हे चित्रपटात दाखवण्यात आले आहे. मात्र, काही ठिकाणी चित्रपटातील पात्रांच्या बारकाईकडे दुर्लक्ष केल्यामुळे आणि तर काही ठिकाणी त्यांना अति दाखवल्यामुळे चित्रपटाच्या कथानकाची धार कमी होत जाते. त्यामुळे प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात.

‘बस्तर’मध्ये नक्षलवादी हिंसाचाराच्या परिणामांशी झुंज देणारी आई आणि तिचा मुलगा, राष्ट्रगीत गायल्यामुळे त्यांच्या कुटुंबातील कर्त्या पुरुषाची नक्षलवाद्यांकडून कशी हत्या केली जाते, ते आपल्या डोळ्यांनी पाहतात. या घटनेनंतर ती आई पोलिस दलात भरती होते आणि मुलगा नक्षलवादी होतो. मात्र, त्यावेळी कथेचा वेग इतका वाढतो की, प्रेक्षकांना समजणं कठीण होतं. ‘बस्तर’ हा देशाच्या नक्षलवादाविरुद्धच्या लढ्याचे प्रतिबिंब आहे. परंतु, चित्रपट बारकावे पूर्ण करण्यात अयशस्वी ठरलेला आहे.

कसा आहे कलाकारांचा अभिनय?

या चित्रपटात अदा शर्माच्या अभिनयाने प्रेक्षकांची निराशा केली आहे. याचे कारण चित्रपटातील तिचे पात्र आहे. या पात्रासाठी अदाला योग्य प्रशिक्षण मिळालेले नाही. तिच्या अभिनयात अनेक ठिकाणी कमतरता दिसते. तर, अभिनेत्री इंदिरा तिवारी आणि नमन जैन यांनी नक्षलवाद्यांची क्रूरता पाहणाऱ्या आई आणि मुलाची भूमिका उत्तम साकारली आहे. या दोन्ही पात्रांना अधिकची भूमिका मिळायला हवी होती, असे वाटते. नक्षलवाद्यांचा थरार आणि लोकांचा देशभक्तीभाव यावर प्रकाश टाकण्यात हा चित्रपट यशस्वी ठरला आहे. पण, हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर प्रभाव पाडण्यात अयशस्वी ठरल्याचे चित्र दिसत आहे.

चित्रपट: बस्तर: द नक्षल स्टोरी

दिग्दर्शक: सुदिप्तो सेन

कलाकार: अदा शर्मा, यशपाल शर्मा, रायमा सेन, शिल्पा शुक्ला, सुब्रत दत्ता 

Whats_app_banner