मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Ravindra Waikar : बीएमसी भूखंड घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले रवींद्र वायकर यांना शिंदेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी

Ravindra Waikar : बीएमसी भूखंड घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले रवींद्र वायकर यांना शिंदेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी

Apr 30, 2024, 11:43 AM IST

  • Mumbai North West lok Sabha : मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं आमदार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

बीएमसीची फसवणूक केल्याप्रकरणी अडचणीत आलेले रवींद्र वायकर यांना शिंदेंच्या शिवसेनेकडून लोकसभेची उमेदवारी

Mumbai North West lok Sabha : मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं आमदार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

  • Mumbai North West lok Sabha : मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं आमदार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

Mumbai North West Lok Sabha Constituency : जोगेश्वरी येथील एका भूखंड प्रकरणात मुंबई महापालिकेची फसवणूक केल्याप्रकरणी अडचणीत आलेले व नंतर शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेले आमदार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांना मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून महायुतीची उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांची लढत ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्याशी होणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Slow Voting : मुंबईत मतदान संथ गतीनं का झालं? किती ठिकाणी झाला घोळ? अखेर निवडणूक आयोगाचं केलं स्पष्ट

Lok Sabha Election : अखिलेश यांच्या रॅलीत दगडफेक अन् खुर्चीफेक, कार्यकर्ते एकमेकांवर पडले, पोलिसांचा लाठीचार्ज

PM Modi : पंतप्रधान मोदींचा राजकीय उत्तराधिकारी कोण?; खुद्द मोदींनीच भर सभेत सांगितलं! अनेक दिवसांपासून सुरू होती चर्चा

Lok Sabha Election : भांगेत कुंकू, हातात लाल चुडा अन् लाल ड्रेसमध्ये EVM घेऊन जाणारी ही सुंदर मतदान अधिकारी कोण?

महायुतीच्या जागावाटपात मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघ शिंदे यांच्या शिवसेनेकडं आला आहे. तिथं कोणाला उमेदवारी द्यायची यावरून बरेच दिवस खलबतं सुरू होती. अभिनेता गोविंदापासून अनेकांची नावं चर्चेत होती. मात्र, ती मागे पडली. आता वायकर यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली आहे.

रवींद्र वायकर हे काही दिवसांपूर्वीपर्यंत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे अत्यंत विश्वासू समजले जात होते. नगरसेवकपदापासून आमदारकीपर्यंत शिवसेनेत त्यांचा चढत्या क्रमानं प्रवास झाला होता. अनेक वर्षे ते मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी होते. सध्या ते जोगेश्वरी विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत.

काय होते वायकर यांच्यावर आरोप?

जोगेश्वरी येथील भूखंडावर क्रीडा विषयक उपक्रम राबवण्याचा करार वायकर यांनी मुंबई महापालिकेच्या सोबत केला होता. महाविकास आघाडीचं (MVA) सरकार सत्तेवर असताना ही परवानगी देण्यात आली होती. मात्र, वायकर यांनी तिथं हॉटेल उभारलं. त्यामुळं महापालिकेचं ५०० कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा आरोप होता. सार्वजनिक उद्यानासाठी आरक्षित असलेल्या या भूखंडाचा वापर हॉटेल बांधण्यासाठी केल्याप्रकरणी वायकर यांना नोटीस बजावण्यात आली होती.

आर्थिक गुन्हे शाखेनं याच प्रकरणात गुन्हा दाखल केला होता. त्याच आधारावर ईडीनं वायकर यांच्यासह त्यांची पत्नी मनीषा वायकर, व्यावसायिक भागीदार आसू निहलानी, राज लालचंदानी, प्रितपाल बिंद्रा आणि आर्किटेक्ट अरुण दुबे यांच्याविरुद्ध मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. वायकर यांच्या मालमत्तांवर ईडीचे छापेही पडले होते. कालांतरानं वायकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश केला होता.

पुढील बातम्या