मराठी बातम्या  /  निवडणुका  /  BJP Manifesto: मोदींची गॅरंटी! तीन कोटी नवीन घरे, शून्य वीज बिल; भाजपच्या जाहीरनाम्यात नेमकी कोणती आश्वासने? वाचा

BJP Manifesto: मोदींची गॅरंटी! तीन कोटी नवीन घरे, शून्य वीज बिल; भाजपच्या जाहीरनाम्यात नेमकी कोणती आश्वासने? वाचा

Apr 14, 2024, 11:15 AM IST

    • BJP Manifesto: निवडणुकीसाठी भाजपने आपल्या जाहीरनाम्यात अनेक निवडणूक (lok sabha election 2024) आश्वासने दिली आहेत. यामध्ये पीएम सूर्या घरकडून मोफत रेशन, पाणी, गॅस कनेक्शन, शून्य वीज बिल अशा आश्वासनांचा समावेश आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचे संकल्प पत्र; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केला भाजपचा जाहीरनामा

BJP Manifesto: निवडणुकीसाठी भाजपने आपल्या जाहीरनाम्यात अनेक निवडणूक (lok sabha election 2024) आश्वासने दिली आहेत. यामध्ये पीएम सूर्या घरकडून मोफत रेशन, पाणी, गॅस कनेक्शन, शून्य वीज बिल अशा आश्वासनांचा समावेश आहे.

    • BJP Manifesto: निवडणुकीसाठी भाजपने आपल्या जाहीरनाम्यात अनेक निवडणूक (lok sabha election 2024) आश्वासने दिली आहेत. यामध्ये पीएम सूर्या घरकडून मोफत रेशन, पाणी, गॅस कनेक्शन, शून्य वीज बिल अशा आश्वासनांचा समावेश आहे.

BJP Manifesto: भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी आपला जाहिरमाना प्रसिद्ध केला आहे. आत अनेक आश्वासने देण्यात आली आहे. विकसित भारत ते देशात एक निवडणूक, आर्थिक प्रगती, आयुष्मान भारत योजनेचा विस्तार, ३ कोटी घरे, मोफत वीज, पर्यटन विकास या सारख्या अनेक घोषणा जाहीरनाम्यात करण्यात आल्या आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Lok Sabha Elections 2024: पाचव्या टप्प्यातील मतदानाचा प्रचार संपला, महाराष्ट्रात २० मे रोजी शेवटचं मतदान!

Uddhav Thackeray : 'उद्या आरएसएसला संपवायला सुद्धा भाजप मागेपुढे पाहणार नाही'; उद्धव ठाकरेंचा घणाघात

J P Nadda On Rss : भाजप आता सक्षम, आरएसएसची गरज नाही! भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचा मोठा दावा

भाजपला जिथे पराभव दिसतोय, तिथे मतदानाआधीच नागरिकांच्या बोटाला शाई लावली जातेय; उद्धव ठाकरेंचा आरोप

३ कोटी लखपती दीदी तयार करणार

लखपती दीदींच्या नेतृत्वाखाली सरकारने देशातील लाखो महिलांना सक्षम केले असून भविष्यातही ही योजना सुरू राहणार आहे. महिलांसाठी कल्याणकारी योजनांसह महिला सहाय्यक गटांना मदत दिली जाणार आहे. त्यानुसार ३ लाख लखपती दिदी करण्याचे उद्दिष्ट.

गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग आणि स्तनाचा कर्करोग यांसारख्या घातक समस्यांकडेही लक्ष दिले जाणार आहे. सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी स्वच्छतागृहे बांधण्यात येणार आहेत.

Vriral News : गुगल ट्रान्सलेट करणे रेल्वेच्या आले अंगलट! रेल्वे झाली मर्डर एक्सप्रेस; प्रवासी भडकले

तरुणांसाठी स्टार्टअप अन् गुंतवणूक

तरुणांसाठी गुंतवणूक, पायाभूत सुविधा, स्टार्टअप, क्रीडा, उच्च मूल्य सेवा आणि पर्यटनाचे नवीन मार्ग खुले होतील.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू केले जाईल

भाजपने आपल्या ठराव पत्रात आयुष्मान भारत योजनेत ५ लाख रुपयांचे उपचार मोफत मिळतील असे आश्वासन दिले आहे. भविष्यातही ही योजना सुरू राहणार आहे. पारदर्शक परीक्षेमुळे लाखो लोकांना रोजगार मिळाला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू केले जाईल. प्रत्येक नागरिकाला चांगले शिक्षण दिले जाईल.

Iran Israel War : इराणचा इस्रायलवर भीषण हल्ला! तब्बल २०० क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागले! युद्धाचा भडका उडणार

भ्रष्टाचाराविरोधात आणखी कठोर कायदे आणणार

सरकार भ्रष्टाचाराविरुद्धची मोहीम अधिक कठोरपणे राबवली जाईल, असे आश्वासन भाजपने मोदींच्या जाहीरनाम्यात दिले आहे. परफॉर्म, रिफॉर्म आणि ट्रान्सफॉर्मचा मंत्र शासनाच्या प्रत्येक क्षेत्रात लागू केला जाईल.

ई-श्रम योजना

भाजपने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात कामगार, टॅक्सी ड्रायव्हर्स, ऑटो ड्रायव्हर्स, घरगुती कामगार, स्थलांतरित कामगार, ट्रक ड्रायव्हर आणि पोर्टर्स या सर्वांसाठी ई-श्रम कल्याणकारी योजनांचा सुरू केली जाणार असल्याचे म्हटले आहे. 

firing at Salman khan house : अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार, ४ राउंड फायर

भाजपच्या संकल्प पत्रात शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने

शेतकाकाऱ्यांना बियाण्यांपासून ते बाजारपेठेपर्यंत शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर भर दिला जाणार आहे. श्री अन्नचे रूपांतर सुपर फूडमध्ये करण्यात येणार आहे. नॅनो युरिया आणि नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून जमिनीचे संरक्षण केले जाईल. मच्छिमारांसाठीच्या बोटींची तसेच हवामानाची माहिती उपग्रहाद्वारे वेळेत दिली जाईल.  पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सहा हजार रुपयांची वार्षिक आर्थिक मदत देत आहोत. आम्ही आमच्या शेतकऱ्यांना सतत आर्थिक पाठबळ देण्यासाठी वचनबद्ध आहोत.

पीएम फसल विमा योजनेचे बळकटीकरण

जलद आणि अधिक अचूक मूल्यांकन, जलद पेमेंट आणि त्वरित तक्रारीचे निराकरण सुनिश्चित करण्यासाठी आम्ही अधिक तांत्रिक हस्तक्षेपांद्वारे पीएम फसल विमा योजना अधिक मजबूत करू

एमएसपीमध्ये वाढ: प्रमुख पिकांसाठी एमएसपीमध्ये अभूतपूर्व वाढ करणार.  आम्ही एकात्मिक नियोजन आणि कृषी-पायाभूत सुविधा प्रकल्प जसे की साठवण सुविधा, सिंचन, ग्रेडिंग आणि वर्गीकरण युनिट, शीतगृह सुविधा आणि अन्न प्रक्रिया यांच्या समन्वित अंमलबजावणीसाठी कृषी पायाभूत सुविधा अभियान सुरू करणार. 

सिंचन सुविधांचा विस्तार:  पंतप्रधान कृषी सिंचाई योजनेअंतर्गत २५.५ लाख हेक्टर सिंचन क्षमता निर्माण केली आहे. याव्यतिरिक्त,  कार्यक्षम पाणी व्यवस्थापनासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान लागू करण्यासाठी तंत्रज्ञान-सक्षम सिंचन उपक्रम सुरू करणार. 

कृषी उपग्रह प्रक्षेपित करणे: पीक अंदाज, कीटकनाशके वापरणे, सिंचन, मातीचे आरोग्य आणि हवामान अंदाज यासारख्या कृषी संबंधित क्रियाकलापांसाठी  स्वदेशी भारत कृषी उपग्रह प्रक्षेपित करण्यावर भर. 

कामगारांच्या सन्मानाची मोदींची हमी

एमएसएमई, छोटे व्यापारी आणि विश्वकर्मा यांना हमी : ONDC सह लहान व्यापारी आणि MSME चे सक्षमीकरण करणार.  लहान व्यापारी आणि MSME ला ONDC स्वीकारण्यासाठी आणि तंत्रज्ञानाच्या सामर्थ्याचा वापर करून त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी प्रोत्साहित करणार. 

आदिवासी समाजाच्या आरोग्य सेवेसाठी केंद्रित दृष्टीकोन: आदिवासी मुलांमधील कुपोषण दूर करणे आणि आदिवासी भागात मिशन मोडमध्ये काम करणे हे आमचे ध्येय आहे.

भारताची संस्कृती जगासमोर नेली जाईल

तिरुवल्लुवर कल्चर सेंटरच्या माध्यमातून भारताची संस्कृती जगासमोर नेण्याचे आश्वासन भाजपने दिले आहे. उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये भारतातील अभिजात भाषांच्या अभ्यासाची व्यवस्था करण्यात येणार आहे.

२०२५ हे आदिवासी अभिमानाचे वर्ष म्हणून साजरे होणार

भाजपने मोदींच्या हमी अंतर्गत प्रत्येक वंचित घटकाला प्राधान्य देण्याचे ठरवले आहे. २०२५ हे आदिवासी गौरव वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे. या अंतर्गत एकलव्य शाळा, पीएम जनमन, वन उत्पादनांमध्ये मूल्यवर्धन आणि इको टुरिझमला प्रोत्साहन दिले जाणार आहे. ओबीसी, एसी, एसटी जातीतील नागरिकांना जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात सन्मान दिला जाईल.

Maharashtra Weather Update : घराबाहेर पडणार असाल तर छत्री घेऊन बाहेर पडा! आज देखील वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

वन नेशन वन इलेक्शन लागू करणार

भाजपने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात भारतीय न्यायिक संहिता लागू करण्याचे आश्वासन दिले आहे. वन नेशन वन इलेक्शन आणि कॉमन इलेक्टोरल रोल अशी व्यवस्था तयार करण्याचे आश्वासन दिले आहे.

३ कोटी घरे बांधणार

देशात आणखी 3 कोटी नवीन घरे बांधली जातील. सर्व घरांसाठी गॅस पुरवठा हा पाइपलाइन द्वारे केले जाणार आहे.

वीज बिल शून्य करणार

वीज बिल शून्यावर आणण्यासाठी पंतप्रधान सूर्यघर बिलजी योजना सुरू करण्यात येणार आहे. घरात मोफत वीज, तसेच अतिरिक्त विजेचे पैसेही दिले जाणार आहे.

मुद्रा योजनेची मर्यादा २० लाख

मुद्रा योजनेची मर्यादा १० लाखांवरून २० लाख रुपये करण्यात आली आहे. पंतप्रधान आवास योजनेत दिव्यांगांना प्राधान्य दिले जाईल. तृतीय पंथियांना आयुष्मान भारत योजने अंतर्गत आरोग्य सुविधा दिल्या जाणार आहेत.

मोफत रेशन योजना पुढील पाच वर्ष सुरू राहील

मोफत रेशन योजना पुढील पाच वर्ष सुरू ठेवली जाणार असल्याचे भाजपने जाहिरनाम्यात स्पष्ट केले आहे.

एआय आणि अवकाश क्षेत्रात भारत अग्रेसर होईल

आगामी काळात भारत अवकाश, AI, क्वांटम, ग्रीन हायड्रोजन, सेमीकंडक्टर आणि EV तंत्रज्ञानात अग्रेसर होईल. भारतात 5G चा विस्तार केला जाईल आणि 6G तंत्रज्ञान विकसित केले जाईल. २०४७ पर्यंत ऊर्जा क्षेत्रात देशाला स्वयंपूर्ण केले जाईल.

रेल्वेतील वेटिंग लिस्टची पद्धत संपवणार; बुलेट ट्रेन कॉरिडॉर तयार करणार

आगामी काळात रेल्वे आणि विमानतळांचा आणखी विकास केला जाईल, असे आश्वासन भाजपने दिले आहे. प्रतीक्षा यादीची पद्धत पूर्णपणे रद्द करण्यात येणार आहे. नवीन विमानतळ, महामार्ग, जल मेट्रोचा विकास केला जाईल. उत्तर-दक्षिण आणि पूर्व भारतात बुलेट कॉरिडॉर तयार केला जाईल.

भारताला जगत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था करणार

भाजपने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात म्हटले आहे की २००४ ते २०१४ पर्यंत भारत देशाची ११ वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होती. मात्र, गेल्या १० वर्षांत भारत ११व्या स्थानावरून पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. या वचनामुळे भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था केली जाणार आहे.

मोदींची गॅरंटी २४ कॅरेट सोन्यासारखी : राजनाथ सिंह 

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, मोदींची हमी २४ कॅरेट सोन्यासारखी आहे. पाच वर्षांपूर्वी २०१९ मध्ये 'निश्चित भारत, सशक्त भारत' या आवाहनासह आम्ही सादर केलेल्या जाहिरनामा'मध्ये अनेक गोष्टी पूर्ण केल्या आहेत. भारताच्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे आणि २०४७ मध्ये विकसित भारत तयार करण्याची कल्पना मांडली होती. याची ब्लू प्रिंट तयार केली. त्याच भावनेने आम्ही ५ वर्षे 'संकल्प' केला होता, मला सांगायला आनंद होत आहे की २०१९ मध्ये आम्ही विकास आणि लोककल्याणाचे जे काही संकल्प केले होते, ते २०२४ पर्यंत आम्ही यशस्वीपणे पूर्ण केले.

मला आनंद आणि समाधान आहे की पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही देशातील जनतेला दिलेली आमची सर्व आश्वासने पूर्ण केली आहेत. या 'संकल्प पत्र'द्वारे , भाजपने स्वाभिमानी आणि सक्षम भारताचा रोडमॅप सादर करण्याबरोबरच देशातील समाजातील प्रत्येक घटकाच्या कल्याणासाठी आणि विकासासाठी आपली बांधिलकी देखील दर्शविली आहे.

जाहीरनामा तयार करण्यासाठी विशेष समिति 

लोकसभा निवडणुकीसाठी मतदान अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेऊन ठेपला आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने शनिवारी स्टार प्रचारकांची यादी देखील जाहीर केली. त्याच वेळी, आज (१४ एप्रिल २०२४) लोकसभा निवडणुकीसाठी भाजप निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहे. भाजपने याला ठराव पत्र म्हटले आहे. या जाहीरनाम्याचा मसुदा तयार करण्यासाठी पक्षाने अलीकडेच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती. समितीने अनेक बैठका घेऊन या जाहिरनाम्याला अंतिम रूप दिले आहे.

केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन, पीयूष गोयल, स्मृती इराणी, धर्मेंद्र प्रधान, अश्विनी वैष्णव, किरण रिजिजू आणि अर्जुनराम मेघवाल यांच्याशिवाय गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि माजी केंद्रीय मंत्री रवींद्रभाई पटेल यांच्यासह एकूण २७ नेते या समितीत सहभागी झाले होते. शंकर प्रसाद हे या समितीचे सदस्य आहेत. निर्मला सीतारामन या समितीच्या निमंत्रक आहेत.

पुढील बातम्या