Maharashtra Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचे संकट कायम आहे. आज देखील राज्याच्या काही भागतात वादळी वाऱ्यासह वीजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात हा पाऊस होणार आहे. पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार मध्य महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात, मराठवाड्यातील बहुतेक सर्व जिल्ह्यांना तर विदर्भातील बुलढाणा, वाशिम व यवतमाळ जिल्ह्यांना आज तर भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया व वाशिम जिल्ह्यांना उद्या व नागपूर जिल्ह्याला आज व उद्या यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार वातावरणाच्या खालच्या थरातील वाऱ्यांची द्रोणीय रेषा आज कोमोरीन एरियावर असलेल्या चक्रीय स्थिती पासून कोकण गोव्यापर्यंत केरळ आणि कर्नाटक वरून जात आहे. तसेच एक पूर्व पश्चिम द्रोणिका रेषा दक्षिण राजस्थान व लगतच्या गुजरातवर असलेल्या चक्रीय स्थिती पासून उत्तर ओडिषा पर्यंत मध्य प्रदेश छत्तीसगड आणि दक्षिण झारखंड वरून जात आहे. बंगालच्या उपसागरावर असलेल्या वाऱ्यांच्या स्थितीमुळे राज्यावर आद्रतेचे प्रमाण वाढले आहे. याचा परिमाण राज्यावर होणार आहे.
महाराष्ट्रात आज मराठवाड्यात तर विदर्भात पुढील तीन दिवस वादळी वाऱ्यासह मेघगर्जना आणि वीजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज मध्य महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्याला, तर मराठवाड्यातील बहुतेक सर्व जिल्ह्यांना तर विदर्भातील बुलढाणा वाशिम व यवतमाळ जिल्ह्यांना आज तर भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया व वाशिम जिल्ह्यांना उद्या व नागपूर जिल्ह्याला आज व उद्या काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात अली आहे.
पुणे आणि परिसरात आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारी अथवा संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. यापुढे आकाश मुख्यतः निरभ्र राहील पुढील काही दिवस कमाल तापमानात दोन ते तीन डिग्री सेल्सिअस पर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने मुंबईसह महाराष्ट्रातील तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे. मुंबईत येत्या काही दिवसांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. १४ ते १७ एप्रिल दरम्यान नवी मुंबई, ठाणे, कल्याण, बदलापूर व कर्जतसह शहर तसेच आसपासच्या भागात तापमान ४१-४३ अंश सेल्सियस पर्यंत वाढण्याची शक्यता आहे.