मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral news : तब्बल २.३६ लाख रुपयांना विकले गेले केवळ ९ लिंबू! बातमी वाचून व्हाल हैराण

Viral news : तब्बल २.३६ लाख रुपयांना विकले गेले केवळ ९ लिंबू! बातमी वाचून व्हाल हैराण

Mar 28, 2024, 01:51 PM IST

    • Lord Murugan temple : तामिळनाडूच्या विल्लुपुरम जिल्ह्यात असलेल्या मंदिरात भगवान मुरुगनच्या मंदिरात भाल्याला सजवणाऱ्या पवित्र लिंबांनी पुन्हा एकदा लक्ष वेधून घेतले आहे. मंगळवारी झालेल्या लिलावात २.३६ लाख रुपयांत नऊ लिंबांची विक्री झाली.
तब्बल २.३६ लाख रुपयांना विकले गेले केवळ ९ लिंबू! बातमी वाचून व्हाल हैराण

Lord Murugan temple : तामिळनाडूच्या विल्लुपुरम जिल्ह्यात असलेल्या मंदिरात भगवान मुरुगनच्या मंदिरात भाल्याला सजवणाऱ्या पवित्र लिंबांनी पुन्हा एकदा लक्ष वेधून घेतले आहे. मंगळवारी झालेल्या लिलावात २.३६ लाख रुपयांत नऊ लिंबांची विक्री झाली.

    • Lord Murugan temple : तामिळनाडूच्या विल्लुपुरम जिल्ह्यात असलेल्या मंदिरात भगवान मुरुगनच्या मंदिरात भाल्याला सजवणाऱ्या पवित्र लिंबांनी पुन्हा एकदा लक्ष वेधून घेतले आहे. मंगळवारी झालेल्या लिलावात २.३६ लाख रुपयांत नऊ लिंबांची विक्री झाली.

Lord Murugan temple : तामिळनाडूत अनेक मोठे मंदिरे आहेत. या मंदीरात अनेक वर्षांपासूनच्या परंपरा पूर्वापार चालत आहेत. विल्लुपुरम जिल्ह्यात असलेल्या भगवान मुरुगनच्या मंदिरात देखील अशीच एक परंपरा आहे. भगवान मुरुगनचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी येत असतात. विशेषत: वार्षिक पांगुनी उत्तरम उत्सवादरम्यान येथे मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. या ठिकाणी असणाऱ्या पवित्र भाल्याला भाविक लिंबू अर्पण करत असतात. याच लिंबामुळे हे मंदिर पुन्हा चर्चेत आले आहे. देवाला अर्पण करण्यात आलेल्या या लिंबाचे लिलाव करण्यात आले असून ९ लिंबू हे २ लाख ३६ हजारांना भावीकांनी खरेदी केले.

ट्रेंडिंग न्यूज

Fact Check : तामिळनाडूमध्ये पंतप्रधान मोदींचा पुतळा जाळताना द्रमुकच्या कार्यकर्त्यांच्याच लुंगीला लागली आग? वाचा सत्य

bus accident in nuh : देवदर्शनावरून परतणाऱ्या भाविकांच्या बसला भीषण आग, ८ जणांचा होरपळून मृत्यू

Fact Check: कर्नाटकात खुलेआम गोहत्या, व्हायरल व्हिडिओ किती खरा? जाणून घ्या सत्य

Nepal ban Indian Spices : सिंगापूर, हाँगकाँगनंतर आता नेपाळनेही भारतीय मसाल्यांवर घातली बंदी

Tamil Nadu: धक्कादायक! पक्षाने तिकीट नाकारल्याने एमडीएमकेच्या खासदाराचा आत्महत्येचा प्रयत्न; चार दिवसांनी मृत्यू

विल्लुपुरम जिल्ह्यात असलेल्या भगवान मुरुगन हे मंदिर देशात प्रसिद्ध आहेत. हे जागृत देवस्थान असून या ठिकाणी असणाऱ्या देवाच्या भाल्याला लावण्यात येणारया पवित्र लिंबाच्या रसाचे सेवन केल्यास अनेक व्याधी दूर होतात तसेच वंधत्व दूर होण्याचा अनेकांचा समज आहे. या लिंबाचा मंगळवारी देवस्तानाने लिलाव केला. एका भाविकाने देवाचे ९ लिंबू तब्बल २.३६ लाख रुपयांत खरेदी केले. ज्या जोडप्यांना मूल होत नाही, त्यांनी या पाण्याचे सेवन केल्याने त्यांना संतती प्राप्त होते आणि कुटुंबात समृद्धी देखील येते अशी देखील मान्यता आहे. भगवान मुरुगाच्या भाल्याला जोडलेल्या लिंबूमध्ये जादूची शक्ती आहे," असे एका गावकऱ्याने एका स्थानिक वृत्तपत्राला माहिती देतांना सांगितले.

kalyan Crime : मोबाइल चोराला पकडण्यासाठी सिद्धेश्वर एक्स्प्रेसमधून प्रवाशाची उडी; गंभीर जखमी झाल्याने मृत्यू

हे मंदिर विल्लुपुरमच्या तिरुवनेनल्लूर गावात दोन टेकड्यांच्या संगमावर वसलेले आहे. या छोट्या मंदिरात भगवान मुरुगाचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येतात. तसेच संतती प्राप्तीसाठी देखील देवाला साकडे घातले जाते.

या संदर्भात एका भाविकाने सांगितले की, देवाच्या भाल्यावरील लिंबामुळे वंध्यत्व बरे होते. हा ठाम समज असल्यामुळे अपत्यहीन जोडपे हे लिंबू खरेदी करतात. व्यापारी आणि व्यावसायिक त्यांच्या व्यवसायात समृद्धी यावी या साठी देखील देवाचे लिंबू खरेदी करतात. हा उत्सव नऊ दिवस चालतो. मंदिराचा पुजारी रोज एक लिंबू देवाच्या भाल्यातून काढतो. उत्सवाच्या शेवटच्या दिवशी मंदिर व्यवस्थापन या लिंबाचा लिलाव करतात. सणाच्या पहिल्या दिवशी भाल्यावर ठेवलेला लिंबू सर्वात शुभ आणि शक्तिशाली मानला जातो. त्यामुळे हे लिंबू खरेदीसाठी भाविक मोठ्या प्रमाणात बोली लावतात. कुलथूर गावातील एका दाम्पत्याने ५०,५०० रुपयांना लिंबू विकत घेतले. तर देवाच्या ९ लिंबाची विक्री ही २ लाख ३६ लाख रुपयांना झाली.

पुढील बातम्या